मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती }[PS]*शब्बाथ दिवसाचे स्तोत्र *[PE][QS]परमेश्वराची उपकारस्तुती करणे [QE][QS]आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे. [QE]
2. [QS]सकाळी तुझे वात्सल्य, [QE][QS]आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे. [QE]
3. [QS]दहा तारांचे वाद्य, वीणेवर [QE][QS]आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे. [QE]
4. [QS]कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. [QE][QS]तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन. [QE]
5. [QS]हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, [QE][QS]तुझे विचार फार गहन आहेत. [QE]
6. [QS]पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, [QE][QS]किंवा मूर्खाला ती समजत नाहीत, [QE]
7. [QS]दुष्ट गवताप्रमाणे उगवले, [QE][QS]आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; [QE][QS]तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे. [QE]
8. [QS]परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील. [QE]
9. [QS]हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; [QE][QS]सर्व वाईट करणारे विखरले आहेत. [QE]
10. [QS]पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; [QE][QS]मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे. [QE]
11. [QS]माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; [QE][QS]जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे. [QE]
12. [QS]नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, [QE][QS]तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. [QE]
13. [QS]जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; [QE][QS]ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील. [QE]
14. [QS]वृद्धपणातही ते फळ देत राहतील; [QE][QS]ते टवटवीत आणि हिरवे राहतील. [QE]
15. [QS]हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; [QE][QS]तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 92 / 150
देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती 1 शब्बाथ दिवसाचे स्तोत्र परमेश्वराची उपकारस्तुती करणे आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे. 2 सकाळी तुझे वात्सल्य, आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे. 3 दहा तारांचे वाद्य, वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे. 4 कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन. 5 हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत. 6 पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, किंवा मूर्खाला ती समजत नाहीत, 7 दुष्ट गवताप्रमाणे उगवले, आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे. 8 परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील. 9 हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; सर्व वाईट करणारे विखरले आहेत. 10 पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे. 11 माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे. 12 नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. 13 जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील. 14 वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील. 15 हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.
Total 150 अध्याय, Selected धडा 92 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References