1. {#1दुर्जनाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना } [QS]हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे, [QE][QS]तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज[* आपला क्रोध ] प्रगट कर. [QE]
2. [QS]पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ, [QE][QS]गर्विष्ठांना त्यांचे उचित प्रतिफल दे. [QE]
3. [QS]हे परमेश्वरा, दुष्ट किती काळ, [QE][QS]दुष्ट किती काळ विजयोत्सव करतील? [QE]
4. [QS]ते बडबड करतात आणि उर्मटपणे बोलतात [QE][QS]आणि फुशारकी मारतात. [QE]
5. [QS]हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांस चिरडतात; [QE][QS]जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात. [QE]
6. [QS]ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात, [QE][QS]आणि ते अनाथांचा खून करतात. [QE]
7. [QS]ते म्हणतात की, परमेश्वर बघणार नाही, [QE][QS]याकोबाचा देव लक्ष देत नाही. [QE]
8. [QS]अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या; [QE][QS]मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात? [QE]
9. [QS]ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय? [QE][QS]ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय? [QE]
10. [QS]जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो. [QE][QS]तो अज्ञानी असणार का? [QE]
11. [QS]परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो, [QE][QS]ते भ्रष्ट आहेत. [QE]
12. [QS]हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, [QE][QS]ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे. [QE]
13. [QS]दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत, [QE][QS]तू त्यास संकटसमयी विसावा देशील. [QE]
14. [QS]कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही. [QE]
15. [QS]कारण न्याय नितीमानाकडे वळेल; [QE][QS]आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील. [QE]
16. [QS]माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल? [QE][QS]अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल? [QE]
17. [QS]जर परमेश्वराने मला मदत केली नसती, [QE][QS]तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता. [QE]
18. [QS]जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, [QE][QS]तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो. [QE]
19. [QS]जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते. [QE]
20. [QS]जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट [QE][QS]योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय? [QE]
21. [QS]ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात, [QE][QS]आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात; [QE]
22. [QS]परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे, [QE][QS]आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे. [QE]
23. [QS]त्याने त्यांचा अन्याय त्यांच्यावरच आणला आहे; [QE][QS]आणि त्यांच्याच दुष्टपणात तो त्यांना नाहीसे करील. [QE][QS]आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील. [QE]