1. {दुर्जनाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे, [QBR] तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज [* आपला क्रोध] प्रगट कर. [QBR]
2. पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ, [QBR] गर्विष्ठांना त्यांचे उचित प्रतिफल दे. [QBR]
3. हे परमेश्वरा, दुष्ट किती काळ, [QBR] दुष्ट किती काळ विजयोत्सव करतील? [QBR]
4. ते बडबड करतात आणि उर्मटपणे बोलतात [QBR] आणि फुशारकी मारतात. [QBR]
5. हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांस चिरडतात; [QBR] जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात. [QBR]
6. ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात, [QBR] आणि ते अनाथांचा खून करतात. [QBR]
7. ते म्हणतात की, परमेश्वर बघणार नाही, [QBR] याकोबाचा देव लक्ष देत नाही. [QBR]
8. अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या; [QBR] मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात? [QBR]
9. ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय? [QBR] ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय? [QBR]
10. जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो. [QBR] तो अज्ञानी असणार का? [QBR]
11. परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो, [QBR] ते भ्रष्ट आहेत. [QBR]
12. हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, [QBR] ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे. [QBR]
13. दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत, [QBR] तू त्यास संकटसमयी विसावा देशील. [QBR]
14. कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही. [QBR]
15. कारण न्याय नितीमानाकडे वळेल; [QBR] आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील. [QBR]
16. माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल? [QBR] अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल? [QBR]
17. जर परमेश्वराने मला मदत केली नसती, [QBR] तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता. [QBR]
18. जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, [QBR] तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो. [QBR]
19. जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते. [QBR]
20. जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट [QBR] योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय? [QBR]
21. ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात, [QBR] आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात; [QBR]
22. परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे, [QBR] आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे. [QBR]
23. त्याने त्यांचा अन्याय त्यांच्यावरच आणला आहे; [QBR] आणि त्यांच्याच दुष्टपणात तो त्यांना नाहीसे करील. [QBR] आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील. [PE]