1. {उपकारस्मरणाचे गीत} [PS] याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; [QBR] आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू. [QBR]
2. उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; [QBR] स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू. [QBR]
3. कराण परमेश्वर महान देव आहे [QBR] आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे. [QBR]
4. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत; [QBR] पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत. [QBR]
5. समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला, [QBR] आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली. [QBR]
6. याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, [QBR] त्याची उपासना करू, त्यास नमन करू; [QBR]
7. कारण तो आपला देव आहे, [QBR] आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. [QBR] आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. [QBR]
8. मरीबा [* कलह] येथल्याप्रमाणे किंवा मस्सा [† परीक्षा] च्या दिवशी रानात केले [QBR] तसे आपली मने कठीण करू नका, [QBR]
9. तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले, [QBR] आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली. [QBR]
10. चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो, [QBR] आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत; [QBR] त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत [‡ त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत] . [QBR]
11. म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की, [QBR] हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत. [PE]