मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1उपकारस्तुतीचे गीत [BR]1 इति. 16:23-33 } [QS]अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; [QE][QS]हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर. [QE]
2. [QS]परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; [QE][QS]दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा. [QE]
3. [QS]राष्ट्रात त्याचे गौरव, [QE][QS]त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा. [QE]
4. [QS]कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. [QE][QS]सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे. [QE]
5. [QS]कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला. [QE]
6. [QS]वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. [QE][QS]सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत. [QE]
7. [QS]अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; [QE][QS]परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा. [QE]
8. [QS]परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. [QE][QS]अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. [QE]
9. [QS]पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. [QE][QS]हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो. [QE]
10. [QS]राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. [QE][QS]जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. [QE][QS]तो सरळपणे लोकांचा न्याय करील. [QE]
11. [QS]आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; [QE][QS]समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत. [QE]
12. [QS]शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. [QE][QS]मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील. [QE]
13. [QS]सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे; [QE][QS]पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; [QE][QS]तो न्यायीपणाने जगाचा [QE][QS]व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 96 / 150
उपकारस्तुतीचे गीत
1 इति. 16:23-33

1 अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर. 2 परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा. 3 राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा. 4 कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे. 5 कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला. 6 वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत. 7 अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा. 8 परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. 9 पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो. 10 राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. तो सरळपणे लोकांचा न्याय करील. 11 आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत. 12 शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील. 13 सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.
Total 150 अध्याय, Selected धडा 96 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References