मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {उपकारस्तुतीचे गीत} [PS] अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; [QBR] हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर. [QBR]
2. परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; [QBR] दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा. [QBR]
3. राष्ट्रात त्याचे गौरव, [QBR] त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा. [QBR]
4. कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. [QBR] सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे. [QBR]
5. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला. [QBR]
6. वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. [QBR] सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत. [QBR]
7. अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; [QBR] परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा. [QBR]
8. परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. [QBR] अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. [QBR]
9. पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. [QBR] हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो. [QBR]
10. राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. [QBR] जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. [QBR] तो सरळपणे लोकांचा न्याय करील. [QBR]
11. आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; [QBR] समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत. [QBR]
12. शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. [QBR] मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील. [QBR]
13. सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे; [QBR] पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; [QBR] तो न्यायीपणाने जगाचा [QBR] व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 96 / 150
स्तोत्रसंहिता 96:163
उपकारस्तुतीचे गीत 1 अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर. 2 परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा. 3 राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा. 4 कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे. 5 कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला. 6 वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत. 7 अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा. 8 परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. 9 पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो. 10 राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. तो सरळपणे लोकांचा न्याय करील. 11 आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत. 12 शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील. 13 सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.
Total 150 अध्याय, Selected धडा 96 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References