1. {#1देवाचे राज्य व सामर्थ्य } [QS]परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो. [QE][QS]अनेक द्वीपसमूह आनंदित होवो. [QE]
2. [QS]ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत. [QE][QS]निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत[* परमेश्वर नीतीने आणि न्यायाने राज्य करतो ]. [QE]
3. [QS]अग्नी त्याच्यापुढे चालतो, [QE][QS]आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो. [QE]
4. [QS]त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; [QE][QS]पृथ्वी हे पाहून थरथर कापली. [QE]
5. [QS]परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर [QE][QS]पर्वत मेणासारखे वितळले. [QE]
6. [QS]आकाशाने, त्याचा न्याय जाहीर केला, [QE][QS]आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले. [QE]
7. [QS]जे कोरीव मूर्तीची पूजा करतात, [QE][QS]जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले. [QE][QS]अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा. [QE]
8. [QS]सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली, [QE][QS]कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे [QE][QS]यहूदाच्या नगरांनी आनंद केला. [QE]
9. [QS]कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस. [QE][QS]तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस. [QE]
10. [QS]जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा, [QE][QS]तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो, [QE][QS]आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो. [QE]
11. [QS]नितीमानासाठी प्रकाश [QE][QS]आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे. [QE]
12. [QS]अहो नितीमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा. [QE][QS]त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या. [QE]