1. {देवाचे राज्य व सामर्थ्य} PS परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो.
अनेक द्वीपसमूह आनंदित होवो. |
2. ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत.
निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत * परमेश्वर नीतीने आणि न्यायाने राज्य करतो . |
7. जे कोरीव मूर्तीची पूजा करतात,
जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा. |
8. सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली,
कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे यहूदाच्या नगरांनी आनंद केला. |
10. जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा,
तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो, आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो. |