मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वर इस्त्राएलाशी विश्वासू आहे} [PS] परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. [QBR] तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो. [QBR]
2. सियोनात परमेश्वर महान आहे; [QBR] तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे. [QBR]
3. ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. [QBR] तो पवित्र आहे. [QBR]
4. राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. [QBR] तू सरळपणा स्थापिला आहे; [QBR] तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस. [QBR]
5. परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा [QBR] आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. [QBR] तो पवित्र आहे. [QBR]
6. त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, [QBR] आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. [QBR] त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले. [QBR]
7. तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. [QBR] त्यांनी त्याच्या आज्ञा [QBR] आणि त्याचे नियम पाळले. [QBR]
8. हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. [QBR] तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस [QBR] तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास. [QBR]
9. परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, [QBR] आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, [QBR] कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 99 / 150
स्तोत्रसंहिता 99:10
परमेश्वर इस्त्राएलाशी विश्वासू आहे 1 परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो. 2 सियोनात परमेश्वर महान आहे; तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे. 3 ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे. 4 राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. तू सरळपणा स्थापिला आहे; तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस. 5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे. 6 त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले. 7 तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले. 8 हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास. 9 परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 99 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References