मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वर इस्त्राएलाशी विश्वासू आहे } [QS]परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. [QE][QS]तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो. [QE]
2. [QS]सियोनात परमेश्वर महान आहे; [QE][QS]तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे. [QE]
3. [QS]ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. [QE][QS]तो पवित्र आहे. [QE]
4. [QS]राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. [QE][QS]तू सरळपणा स्थापिला आहे; [QE][QS]तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस. [QE]
5. [QS]परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा [QE][QS]आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. [QE][QS]तो पवित्र आहे. [QE]
6. [QS]त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, [QE][QS]आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. [QE][QS]त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले. [QE]
7. [QS]तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. [QE][QS]त्यांनी त्याच्या आज्ञा [QE][QS]आणि त्याचे नियम पाळले. [QE]
8. [QS]हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. [QE][QS]तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस [QE][QS]तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास. [QE]
9. [QS]परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, [QE][QS]आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, [QE][QS]कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 99 / 150
परमेश्वर इस्त्राएलाशी विश्वासू आहे 1 परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो. 2 सियोनात परमेश्वर महान आहे; तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे. 3 ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे. 4 राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. तू सरळपणा स्थापिला आहे; तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस. 5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे. 6 त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले. 7 तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले. 8 हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास. 9 परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.
Total 150 अध्याय, Selected धडा 99 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References