1. {परमेश्वर इस्त्राएलाशी विश्वासू आहे} PS परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत.
तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो. |
4. राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे.
तू सरळपणा स्थापिला आहे; तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस. |
6. त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते,
आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले. |
8. हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस.
तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास. |
9. परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा,
आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे. PE |