मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
प्रकटीकरण
1. {#1बलवान दूत व लहानसे पुस्तक } [PS]मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरतांना पाहिला; तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे, पाय अग्निस्तंभासारखे होते,
2. त्याच्याहाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती; त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला;
3. आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले. [PE]
4.
5. [PS]त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो; इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणालीः सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. [PE][PS]ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला,
6. आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटलेः आणखी उशीर होणार नाही;
7. परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गूज पूर्ण होईल. [PE]
8. [PS]स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी जाऊन घे.
9. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, “ती लहान गुंडाळी” मला दे असे म्हटले. तो म्हणाला, “हि घे आणि खाऊन टाक; ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.”
10. तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली व खाऊन टाकली, ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली, तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.
11. तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. [PE]
Total 22 अध्याय, Selected धडा 10 / 22
बलवान दूत व लहानसे पुस्तक 1 मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरतांना पाहिला; तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे, पाय अग्निस्तंभासारखे होते, 2 त्याच्याहाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती; त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला; 3 आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले. 4 5 त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो; इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणालीः सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला, 6 आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटलेः आणखी उशीर होणार नाही; 7 परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गूज पूर्ण होईल. 8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी जाऊन घे. 9 तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, “ती लहान गुंडाळी” मला दे असे म्हटले. तो म्हणाला, “हि घे आणि खाऊन टाक; ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.” 10 तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली व खाऊन टाकली, ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली, तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. 11 तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे.
Total 22 अध्याय, Selected धडा 10 / 22
×

Alert

×

Marathi Letters Keypad References