1.
2. [PS]मी परमपवित्रस्थानातून एक मोठी वाणी ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा आणि देवाच्या रागाच्या या सात वाट्या पृथ्वीवर ओता.” [PE]
3. [PS]मग पहिला देवदूत गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली आणि ज्या लोकांवर त्या पशूचे चिन्ह होते व जे त्याच्या मूर्तीला नमन करीत असत त्यांना अतिशय कुरूप आणि त्रासदायक फोड आले. [PE]
4. [PS]नंतर, दुसऱ्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली आणि त्याचे मरण पावलेल्या मनुष्याच्या रक्तासारखे रक्त झाले आणि समुद्रात जगणारे सर्व जीव मरण पावले. [PE][PS]तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झऱ्यांवर ओतली, “आणि त्यांचे रक्त झाले”
5. आणि माझ्या कानी आले की, जलाशयांचा देवदूत म्हणाला, [PE][QS]तू जो पवित्र आहेस आणि होतास तो तू नीतिमान आहेस, [QE][QS2]कारण तू असा न्याय केलास. [QE]
6. [QS]कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त पाडले, आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलेस; [QE][QS]कारण ते याच लायकीचे आहेत. [QE]
7. [PS]वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की, [PE][QS]हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत. [QE]
8. [PS]चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि त्यास लोकांस अग्नीने जाळून टाकण्याची परवानगी देण्यात आली होती.
9. लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही. [PE]
10. [PS]पाचव्या देवदूताने आपली वाटी त्या पशूच्या राजासनावर ओतली आणि त्याचे राज्य अंधकारमय झाले, आणि त्या क्लेशांत लोकांनी आपल्या जीभा चावल्या;
11. त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे स्वर्गीय देवाची निंदा केली आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नाही. [PE]
12.
13. [PS]सहाव्या देवदूताने आपली वाटी महान फरात नदीवर ओतली आणि पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार व्हावा म्हणून तिचे पाणी आटवले गेले. [PE][PS]आणि मी बघितले की, त्या अजगराच्या मुखातून, त्या पशूच्या मुखातून आणि त्या खोट्या संदेष्ट्यांच्या मुखातून बेडकांसारखे तीन अशुद्ध आत्मे बाहेर आले.
14. कारण हे चमत्कार करणारे दुष्ट आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या, त्या महान दिवसाच्या लढाईसाठी सर्व जगातल्या राजांना एकत्र जमवायला त्यांच्याकडे जात आहेत. [PE]
15.
16. [PS] [SCJ]पाहा, मी चोरासारखा येतो; जो जागृत राहतो आणि आपली वस्त्रे संभाळतो तो धन्य होय! नाही तर, तो उघडा फिरेल आणि ते त्याची लज्जा पाहतील.[SCJ.] [PE]
17. [PS]आणि त्यांनी त्यांना हर्मगिदोन असे इब्री भाषेत नाव असलेल्या एका ठिकाणी एकत्र जमवले. [PE][PS]सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली व परमेश्वराच्या भवनामधून, राजासनाकडून एक मोठा आवाज आला; तो म्हणाला, “झाले.”
18. आणि विजांचे लखलखाट, आवाज व गडगडाट होऊन मोठा भूकंप झाला, पृथ्वीवर लोक झाल्यापासून कधी झाला नव्हता इतका मोठा भूकंप झाला,
19. त्या महान नगरीचे तीन भाग झाले; राष्ट्रांची नगरे पडली आणि ती महान बाबेल, तिला त्याच्या कोपाच्या संतापाचा द्राक्षरसाचा प्याला द्यावा, म्हणून देवासमोर स्मरणात आणली गेली.
20. आणि प्रत्येक बेट पळून गेले व डोंगर कोठेच आढळले नाहीत.
21. आणि एक मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून खाली लोकांवर पडल्या; आणि त्या गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्यांची पीडा फार मोठी होती. [PE]