मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
प्रकटीकरण
1. {सात कर्ण्याचा नाद} [PS] जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला, तेव्हा सुमारे अर्ध्या तासापर्यंत स्वर्गात शांतता होती.
2. नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले. [PE][PS]
3. दुसरा एक देवदूत येऊन, वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या प्रार्थनांसह धुप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता.
4. देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्रजनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला.
5. तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यामध्ये वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूमिकंप झाला.
6. ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजवण्यास तयार झाले. [PE][PS]
7. पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले.
8. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले.
9. समुद्रातील तिसरा भाग जिवंत प्राणी मरण पावले आणि तसेच तिसरा भाग जहाजांचा नाश झाला.
10. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला;
11. त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते. [PE][PS]
12. चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही. [PE][PS]
13. आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार‍! [PE]

Notes

No Verse Added

Total 22 Chapters, Current Chapter 8 of Total Chapters 22
प्रकटीकरण 8:10
1. {सात कर्ण्याचा नाद} PS जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला, तेव्हा सुमारे अर्ध्या तासापर्यंत स्वर्गात शांतता होती.
2. नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले. PEPS
3. दुसरा एक देवदूत येऊन, वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या प्रार्थनांसह धुप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता.
4. देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्रजनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला.
5. तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यामध्ये वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट गर्जना झाल्या, विजा चमकल्या भूमिकंप झाला.
6. ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजवण्यास तयार झाले. PEPS
7. पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच रक्तमिश्रित गारा अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले.
8. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले.
9. समुद्रातील तिसरा भाग जिवंत प्राणी मरण पावले आणि तसेच तिसरा भाग जहाजांचा नाश झाला.
10. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला;
11. त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते. PEPS
12. चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही. PEPS
13. आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार‍! PE
Total 22 Chapters, Current Chapter 8 of Total Chapters 22
×

Alert

×

marathi Letters Keypad References