मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
रोमकरांस
1. {#1इस्राएली लोकांच्या अविश्वासाबद्दल पौलाचे दुःख } [PS]मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे
2. की, मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे.
3. कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन.
4. ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत.
5. पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन. [PE]
6. {#1देवाने दिलेली वचने व्यर्थ झाली नाहीत [BR]उत्प. 25:19-23 } [PS]पण देवाचे वचन, जणू व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत,
7. आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले आहेत असे नाही; तर ‘इसहाकालाच तुझे संतान म्हणले जाईल’ असे वचन आहे;
8. म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत.
9. कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’
10. आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी,
11. आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्‍याच्या इच्छेप्रमाणे,
12. तिला सांगण्यात आले होते की, ‘मोठा धाकट्याची सेवा करील.’
13. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला.’ [PE]
14. {#1देव अन्यायी नाही } [PS]मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो.
15. कारण तो मोशेला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन.’
16. तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे.
17. म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, ‘मी तुला ह्यासाठी मोठे केले की, तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजविले जावे.’
18. म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठिण करतो. [PE]
19. {#1देव सर्वाधिपती आहे } [PS]तू ह्यावर म्हणशील की, तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे?
20. पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्‍याला म्हणू शकेल?
21. कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय?
22. मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले,
23. आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
24. त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत. [PE]
25. [QS]कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की, [QE][QS]‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन, [QE][QS]आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन. [QE]
26. [QS]आणि असे होईल की त्यांना ज्याठिकाणी, तुम्ही माझी प्रजा नाही, असे म्हणले होते, [QE][QS]तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल.’ [QE]
27. [PS]यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की, ‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली, तरी एक अवशेष वाचवला जाईल.
28. कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’
29. आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे, [PE][QS]सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर [QE][QS]आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो. [QE]
30. {#1नीतिमत्त्व प्राप्त न होण्याचे कारण } [PS]मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे.
31. पण जे इस्राएल नीतिमत्त्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत.
32. आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले.
33. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, [PE][QS]‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो. [QE][QS]आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’ [QE]
Total 16 अध्याय, Selected धडा 9 / 16
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16
इस्राएली लोकांच्या अविश्वासाबद्दल पौलाचे दुःख 1 मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे 2 की, मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे. 3 कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन. 4 ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत. 5 पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन. देवाने दिलेली वचने व्यर्थ झाली नाहीत
उत्प. 25:19-23

6 पण देवाचे वचन, जणू व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत, 7 आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले आहेत असे नाही; तर ‘इसहाकालाच तुझे संतान म्हणले जाईल’ असे वचन आहे; 8 म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत. 9 कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’ 10 आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी, 11 आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्‍याच्या इच्छेप्रमाणे, 12 तिला सांगण्यात आले होते की, ‘मोठा धाकट्याची सेवा करील.’ 13 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला.’ देव अन्यायी नाही 14 मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो. 15 कारण तो मोशेला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन.’ 16 तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे. 17 म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, ‘मी तुला ह्यासाठी मोठे केले की, तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजविले जावे.’ 18 म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठिण करतो. देव सर्वाधिपती आहे 19 तू ह्यावर म्हणशील की, तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे? 20 पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्‍याला म्हणू शकेल? 21 कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय? 22 मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले, 23 आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय? 24 त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत. 25 कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की, ‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन, आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन. 26 आणि असे होईल की त्यांना ज्याठिकाणी, तुम्ही माझी प्रजा नाही, असे म्हणले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल.’ 27 यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की, ‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली, तरी एक अवशेष वाचवला जाईल. 28 कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’ 29 आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे, सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो. नीतिमत्त्व प्राप्त न होण्याचे कारण 30 मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे. 31 पण जे इस्राएल नीतिमत्त्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत. 32 आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले. 33 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’
Total 16 अध्याय, Selected धडा 9 / 16
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16
×

Alert

×

Marathi Letters Keypad References