1. {#1वधूचे विचार } [QS](ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता, [QE][QS]ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो, [QE][QS]त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले; [QE][QS]पण तो मला सापडला नाही. [QE]
2. [QS]मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती, [QE][QS]रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. [QE][QS]मी त्यास शोधले पण मला तो सापडला नाही.
3. शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. [QE][QS]मी त्यांना विचारले, “माझ्या प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?” [QE]
4. [QS]मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. [QE][QS]इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला. [QE][QS]मी त्यास धरले. मी त्यास जाऊ दिले नाही. [QE][QS]मी त्यास माझ्या आईच्या घरी नेले. [QE][QS]जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्यास सोडले नाही. [QE]
5. [QS](ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो, [QE][QS]रानतल्या हरिणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते. [QE][QS]आमचे प्रेम करणे संपत नाही, [QE][QS]तोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणू नका. [QE]
6. {#1वरात } [QS](ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील [QE][QS]सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने [QE][QS]अशी धुराच्या खांबासारखी, [QE][QS]रानातून येणारी ती ही कोण आहे? [QE]
7. [QS]पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे. [QE][QS]त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत, [QE][QS]ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत. [QE]
8. [QS]ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत. [QE][QS]रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला [QE][QS]करायला ते तयार आहेत. [QE]
9. [QS]राजा शलमोनाने स्वत:साठी [QE][QS]लबानोनी लाकडाची पालखी तयार केली. [QE]
10. [QS]त्याचे खांब चांदीचे केले. [QE][QS]पाठ सोन्याची केली. [QE][QS]बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली. [QE][QS]त्याचा अंतर्भाग यरूशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे. [QE]
11. [QS](ती स्त्री यरूशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. [QE][QS]ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, [QE][QS]त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा. [QE][QS]त्या दिवशी तो खूप आनंदी होता. [QE]