1. (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझे बहिणी, माझे वधू, मी माझ्या बागेत गेलो. [QBR] मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत. [QBR] मी माझा मध मधाच्या पोळ्यासहीत खाल्ला आहे. [QBR] मी माझा द्राक्षरस व दूध प्यालो आहे. [QBR] मित्रांनो, खा. [QBR] माझ्या प्रियांनो; प्या, मनसोक्त प्या.
2. {विरहाग्री} [PS] (ती तरुणी स्वतःशी बोलते) मी झोपलेली आहे. पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे. [QBR] माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो, [QBR] माझे बहिणी, माझ्या प्रिये, माझ्या कबुतरा, माझ्या विमले! माझे डोके दहिवराने ओले झाले आहे. [QBR] माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत. [QBR]
3. (तरुण स्त्री स्वतःशी बोलते) मी माझा पोषाख काढून टाकला आहे. तो पुन्हा मी कसा अंगात घालू? [QBR] मी माझे पाय धुतले आहेत. ते मी कसे मळवू? [QBR]
4. पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला, [QBR] आणि माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले. [QBR]
5. माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले. [QBR] तेव्हा माझ्या हातास [QBR] दाराच्या कडीवरील गंधरस लागला. [QBR] माझ्या बोटांवरून त्याचा द्रव गळत होता. [QBR]
6. मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले. [QBR] पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता. [QBR] तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला. [QBR] मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. [QBR] मी त्यास हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही. [QBR]
7. शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले. [QBR] त्यांनी मला मारले, जखमी केले. [QBR] कोटावरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला. [QBR]
8. (ती स्त्री त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो! मी तुम्हास शपथ घालून सांगते, [QBR] जर तुम्हास माझा प्रियकर सापडला, [QBR] तर कृपाकरून त्यास सांगा की, मी प्रेमामुळे आजारी झाले आहे.
9. {वधूकडून वराची प्रशंसा} [PS] (त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत) अगे स्त्रियांतील सर्वात सुंदरी! [QBR] तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून अधिक चांगला आहे तो कसा काय? [QBR] तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरांत इतरांपेक्षा अधिक ते काय आहे? [QBR]
10. (तरुणी त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहेत) माझा प्रियकर गोरापान व लालबुंद [* शूरवीर] आहे. [QBR] तो दहा हजारात श्रेष्ठ आहे [† त्याच्या समान कोणी नाही] . [QBR]
11. त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे. [QBR] त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंमकावळ्यासारखे काळे आहेत. [QBR]
12. त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत, [QBR] दुधात धुतलेल्या कबुतरासारखे आहेत, कोदंणात जडलेल्या मोलवान खड्यासारखे आहेत. [QBR]
13. त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे, [QBR] सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत, [QBR] अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत. [QBR] त्याचे ओठ कमलपुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो. [QBR]
14. त्याचे हात रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत. [QBR] त्याचे पोट नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंतफलकासारखे आहे. [QBR]
15. त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत. [QBR] त्याचे रुप लबानोनासारखे आहे. ते गंधसरू झाडासारखे उत्कृष्ट आहे. [QBR]
16. होय, यरूशलेमेच्या कन्यांनो, [QBR] माझा प्रियकर हाच माझा सखा आहे. [QBR] त्याची वाणी सर्वांत गोड आहे. [QBR] तो सर्वस्वी सुंदर आहे. [PE]