1. [QS](यरूशलेमेतील स्त्री तरुणीशी बोलत आहे) स्त्रियांतील सर्वात सुंदरी! [QE][QS]तुझा प्रियकर कोठे गेला आहे? [QE][QS]तुझा प्रियकर कोणत्या दिशेने गेला आहे म्हणजे, [QE][QS]तुझ्याबरोबर आम्ही त्यास शोधावयाला येऊ? [QE]
2. [QS](ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) माझा प्रियकर आपल्या बागेत सुगंधी झाडांच्या वाफ्यांकडे, [QE][QS]बागेत आपला कळप चारायला [QE][QS]आणि कमळे वेचण्यास गेला आहे. [QE]
3. [QS]मी आपल्या प्रियकराची आहे. तो प्रियकर माझा आहे. [QE][QS]तो आपला कळप कमलपुष्पात चारत आहे. [QE]
4. {#1वराकडून वधूची प्रशंसा } [QS](स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझ्या प्रिये, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर आहेस. [QE][QS]यरूशलेमेसारखी सुरूप आहेस. [QE][QS]ध्वजा फडकिवणाऱ्या सेनेसारखी भयंकर आहेस. [QE]
5. [QS]तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव, [QE][QS]त्यांनी मला घाबरे केले आहे. [QE][QS]जो शेरडांचा कळप गिलाद पर्वताच्या बाजूवर बसला आहे [QE][QS]त्यासारखे तुझे केस आहेत. [QE]
6. [QS]ज्या मेंढ्या धुतल्या जाऊन वरती आल्या आहेत, [QE][QS]ज्यांतल्या प्रत्येकीला जुळे आहे, [QE][QS]आणि ज्यांतली कोणी पिल्ले वेगळी झाली नाही, [QE][QS]त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत. [QE]
7. [QS]तुझ्या बुरख्याच्या आत तुझी कानशिले [QE][QS]डाळिंबाच्या फोडींसारखी आहेत. [QE]
8. [QS](स्त्रीचा प्रियकर स्वतःशीच बोलतो) साठ राण्या आणि ऐंशी उपपत्नी, [QE][QS]आणि अगणित कुमारी असतील. [QE]
9. [QS]पण माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट एकच आहे, [QE][QS]ती तिच्या आईची एकुलती एक विशेष मुलगी आहे, [QE][QS]आपल्या जननीची आवडती आहे. माझ्या नगरातील कन्यांनी तिला पाहिले आणि तिला आशीर्वादित म्हटले, [QE][QS]राण्यांनी आणि उपपत्नींनीसुध्दा तिची स्तुती केली. [QE]
10. [QS]ती पहाटेप्रमाणे चमकते आहे, [QE][QS]ती चंद्रासारखी सुंदर आहे. [QE][QS]सूर्यासारखी तेजस्वी आहे; [QE][QS]आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. ती पूर्णपणे आकर्षित करून घेणारी कोण आहे? [QE]
11. [QS]खोऱ्यातील हिरवीगार झाडेझुडपे बघायला, [QE][QS]द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की काय, [QE][QS]डाळिंबांना फुले आले आहेत की काय, [QE][QS]ते बघायला मी आक्रोडाच्या मळ्यातून गेले. [QE]
12. [QS]मी खूप आनंदीत होते, [QE][QS]जसे मला राजपुत्राच्या रथात बसवले होते. [QE]
13. [QS](त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री, [QE][QS]मागे फिर, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू, [QE][QS](ती तरुण स्त्री प्रियकराला म्हणते) त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता? [QE][QS]जसे मी दोन नृत्य करणाऱ्याच्या रांगेत नृत्य करत आहे काय? [QE]