1. [QS](तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) माझ्या आईचे स्तनपान केलेल्या [QE][QS]माझ्या बंधूसारखा तू असतास तर किती बरे होते. [QE][QS]तू मला बाहेर भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते [QE][QS]आणि मग माझा कोणीही अपमान केला नसता. [QE]
2. [QS]मी तुला माझ्याबरोबर चालवून आईच्या घरात आणले असते. [QE][QS]तू मला शिकवले असते. [QE][QS]मी तुला मसाला घातलेला द्राक्षरस [QE][QS]आणि माझ्या डाळिंबाचा रस प्यायला दिला असता. [QE]
3. [QS]त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता आणि [QE][QS]त्याचा उजवा हात मला आलिंगन देत असता. [QE]
4. [QS](ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते) यरूशलेमेच्या कन्यांनो, [QE][QS]मी तुम्हास शपथ घालते. [QE][QS]माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. समाधान होईपर्यंत [QE][QS]राहू द्या. [QE]
5. {#1प्रेम मृत्यूसारखे प्रबळ } [QS](यरूशलेमेतील स्त्री बोलते) आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे? [QE][QS](ती तरूण स्त्री आपल्या प्रियकराशी बोलते) मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, [QE][QS]तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले, [QE][QS]तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली. [QE]
6. [QS]तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे, [QE][QS]आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव. [QE][QS]कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे. [QE][QS]त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी, [QE][QS]किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे. [QE]
7. [QS]असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही. [QE][QS]महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही. [QE][QS]जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी, [QE][QS]ती [* तो ]त्यापुढे अगदी तुच्छ होय. [QE]
8. [QS](त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्या विषयी बोलतो) आम्हास एक लहान बहीण आहे, [QE][QS]आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. [QE][QS]आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे? [QE]
9. [QS]ती जर भिंत असती तर, [QE][QS]आम्ही तिच्याभोवती चांदीचा मनोरा उभारला असता. [QE][QS]ती जर दार असती तर, [QE][QS]तिच्या भोवती आम्ही गंधसरूच्या फळ्यांनी झाकले असते. [QE]
10. [QS](ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे बुरूजासारखे होते. [QE][QS]म्हणून मी आपल्या प्रियकराच्या दृष्टीने पूर्ण समाधानी आहे. [QE]
11. [QS](ती तरुणी स्वतःशी बोलते) बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता. [QE][QS]त्याने तो मळा राखणाऱ्यांच्या स्वाधीन केला, [QE][QS]त्याच्या फळांसाठी प्रत्येकाला एक हजार शेकेल द्यावे लागत. [QE]
12. [QS]माझाही एक द्राक्षीचा मळा आहे. तो माझाच आहे तो माझ्यापुढे आहे. [QE][QS]हे शलमोना, त्याचे हजार तुझे होतील, आणि दोनशे जो राखतात त्यांचे होतील. [QE]
13. [QS](स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे.) जी तू बागेत राहतेस. [QE][QS]त्या तुझ्या मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत. [QE][QS]मलाही तो ऐकू दे!
14. (ती तरुण स्त्री तिच्या प्रियकराशी बोलते) माझ्या प्रियकरा त्वरा कर. [QE][QS]सुगंधी झाडांच्या पर्वतावर हरीणासारखा, [QE][QS]तरुण हरीणीच्या पाडसासारखा तू हो.[QE]