मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
जखऱ्या
1. {#1परमेश्वराने आपल्या लोकांचा केलेला उद्धार } [QS]वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा [QE][QS]आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील, [QE][QS]मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील. [QE]
2. [QS]कारण तेराफिम मुर्तींनी निरर्थक गोष्टी केल्या आहेत, दैवज्ञांनी लबाडीचा दृष्टांत पाहिला आहे; [QE][QS]ते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आणि खोटा धीर देतात; [QE][QS]म्हणून लोक मेंढरांसारखे भटकत आहेत आणि त्यांचा कोणी मेंढपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहेत. [QE]
3. [MS] परमेश्वर म्हणतो, “माझा राग मेंढपाळांवर पेटला आहे; त्यांच्यातील बोकडांना, पुढाऱ्यांना मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वर आपल्या कळपाची, यहूदाच्या घराण्याची, काळजी वाहील, आणि त्याच्या लढाईच्या घोड्यासारखे त्यांना बनवेल.” [ME]
4. [PS]“त्यांच्यातूनच कोनशिला उत्पन्न होईल; त्यांच्यापासूनच खुंट्या तयार होतील; त्यांच्यातूनच युध्दात वापरावयाची धनुष्यही येईल; त्यांच्यातूनच प्रत्येक पुढारी निघेल.
5. ते आपल्या शत्रूचा पराभव, जणू काही रस्त्यातून चिखल तुडवीत जावे, तसा तुडवीत करतील; परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि घोडेस्वारांना अपमानीत करतील.” [PE]
6. [PS]“मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आणि योसेफाच्या घराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पुनःस्थापित करीन आणि त्यांच्यावर दया करीन. आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल.
7. एखाद्या योद्ध्याप्रमाणे एफ्राईम खूश होईल, त्यांचे हृदय द्राक्षरसाने हर्षित होते तसे हर्षित होईल; त्यांचे लोक हे पाहतील आणि ते आनंदीत होतील. परमेश्वराच्याठायी त्यांचे हृदय आनंदीत होईल.” [PE]
8. [PS]“मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन कारण मी त्यांना वाचवीन आणि त्यांची संख्या पूर्वी होती तशीच असंख्य होईल.
9. होय! मी माझ्या लोकांस राष्ट्रां-राष्ट्रांत पांगवीत आलो आहे, पण त्या दूरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील.
10. मी त्यांना मिसरमधून परत आणीन व अश्शूरमधून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना गिलादाच्या व लबानोनाच्या नगरात आणीन. ते त्या जागेत मावणार नाहीत तोपर्यंत मी त्यांना आणीन.” [PE]
11. [PS]ते जाचजुलूमाच्या समुद्रातून जातील; ते गर्जनाऱ्या समुद्राला दबकावतील, ते नाईल नदीला सुकवतील व तिचे सर्व तळ उघडे पाडतील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसराच्या सत्तेचा राजदंड त्यांच्यापासून काढून घेतला जाईल.
12. मी त्यांना सामर्थ्यवान करीन, ते देवासाठी व त्याच्या नावासाठी चालतील, हे परमेश्वराचे वचन होय. [PE]
Total 14 अध्याय, Selected धडा 10 / 14
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
परमेश्वराने आपल्या लोकांचा केलेला उद्धार 1 वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील, मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील. 2 कारण तेराफिम मुर्तींनी निरर्थक गोष्टी केल्या आहेत, दैवज्ञांनी लबाडीचा दृष्टांत पाहिला आहे; ते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आणि खोटा धीर देतात; म्हणून लोक मेंढरांसारखे भटकत आहेत आणि त्यांचा कोणी मेंढपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहेत. 3 परमेश्वर म्हणतो, “माझा राग मेंढपाळांवर पेटला आहे; त्यांच्यातील बोकडांना, पुढाऱ्यांना मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वर आपल्या कळपाची, यहूदाच्या घराण्याची, काळजी वाहील, आणि त्याच्या लढाईच्या घोड्यासारखे त्यांना बनवेल.” 4 “त्यांच्यातूनच कोनशिला उत्पन्न होईल; त्यांच्यापासूनच खुंट्या तयार होतील; त्यांच्यातूनच युध्दात वापरावयाची धनुष्यही येईल; त्यांच्यातूनच प्रत्येक पुढारी निघेल. 5 ते आपल्या शत्रूचा पराभव, जणू काही रस्त्यातून चिखल तुडवीत जावे, तसा तुडवीत करतील; परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि घोडेस्वारांना अपमानीत करतील.” 6 “मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आणि योसेफाच्या घराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पुनःस्थापित करीन आणि त्यांच्यावर दया करीन. आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल. 7 एखाद्या योद्ध्याप्रमाणे एफ्राईम खूश होईल, त्यांचे हृदय द्राक्षरसाने हर्षित होते तसे हर्षित होईल; त्यांचे लोक हे पाहतील आणि ते आनंदीत होतील. परमेश्वराच्याठायी त्यांचे हृदय आनंदीत होईल.” 8 “मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन कारण मी त्यांना वाचवीन आणि त्यांची संख्या पूर्वी होती तशीच असंख्य होईल. 9 होय! मी माझ्या लोकांस राष्ट्रां-राष्ट्रांत पांगवीत आलो आहे, पण त्या दूरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील. 10 मी त्यांना मिसरमधून परत आणीन व अश्शूरमधून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना गिलादाच्या व लबानोनाच्या नगरात आणीन. ते त्या जागेत मावणार नाहीत तोपर्यंत मी त्यांना आणीन.” 11 ते जाचजुलूमाच्या समुद्रातून जातील; ते गर्जनाऱ्या समुद्राला दबकावतील, ते नाईल नदीला सुकवतील व तिचे सर्व तळ उघडे पाडतील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसराच्या सत्तेचा राजदंड त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. 12 मी त्यांना सामर्थ्यवान करीन, ते देवासाठी व त्याच्या नावासाठी चालतील, हे परमेश्वराचे वचन होय.
Total 14 अध्याय, Selected धडा 10 / 14
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
×

Alert

×

Marathi Letters Keypad References