मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
सफन्या
1. {#1यरूशलेमेचे पाप व तिचा उद्धार } [QS]त्या बंडखोर नगरीला [* यरूशलेम ]हाय हाय! ती हिंसेनी भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे. [QE]
2. [QS]तिने परमेश्वराचे वचन ऐकले नाही व त्याची शिकवणही ग्रहण केली नाही. [QE][QS]तीने परमेश्वरावर भरवसा ठेवला नाही व ती तिच्या देवाला शरणही गेली नाही. [QE]
3. [QS]तिच्यामधले सरदार गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. [QE][QS]तिचे न्यायाधीश संध्याकाळच्या वेळचे लांडगे आहेत, जे सकाळपर्यंत कशाचीही नामोनिशाणी ठेवत नाहीत! [QE]
4. [QS]तिचे संदेष्टे उद्धट व अविचारी आहेत. [QE][QS]तिच्या याजकांनी पवित्र गोष्टी अपवित्र केल्या आहेत आणि नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे! [QE]
2. [QS2]परमेश्वर तिच्यामध्ये न्यायी आहे, तो अन्याय करू शकत नाही! [QE][QS2]तो दररोज आपला न्याय उजेडात आणतो! तो प्रकाशात लपवला जाणार नाही, तरीही गुन्हेगारांना लाज वाटत नाही. [QE]
6. [QS]मी राष्ट्रांचा व त्यांच्या किल्ल्यांचा नाश केला आहे. [QE][QS]मी त्यांच्या रस्त्यांचा नाश केला आहे व आता येथून कोणीही जात नाही. [QE][QS]त्यांची शहरे नष्ट झाली, त्यामुळे तिथे कोणीही राहत नाही. [QE]
7. [QS]मी म्हणालो, खचित तू माझे भय धरशील! शिक्षा घेशील, तर तुझ्या संबधाने ज्या सर्व योजना ठरवल्यानुसार तुझे घर नष्ट होणार नाही! पण ते सकाळीच ऊठून आपली सर्व कामे भ्रष्ट करत असत. [QE]
8. {#1विश्वासयोग्य शेष लोक [BR]उत्प. 11:1-9; प्रेषि. 2:1-11 } [QS]ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, “मी लूट करायला ऊठेन तोपर्यंत माझी वाट पाहा, कारण राष्ट्रे एकत्र यावी, राज्ये गोळा करावी, [QE][QS]आणि त्यांच्यावर मी आपला कोप व संतप्त क्रोध ओतावा, [QE][QS]असा मी निश्चय केला आहे, कारण माझ्या क्रोधाच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल. [QE]
9. [QS]त्यानंतर लोकांस मी शुद्ध ओठ देईन, अशासाठी की परमेश्वराच्या नावाला हाक मारताना त्या सर्वांनी खांद्याला खांदा लावून एक होऊन माझी सेवा करावी. [QE]
10. [QS]कूश देशातील नदीपलीकडचे माझे आराधक व माझी विखुरलेली माणसे, मला अर्पणे घेऊन येतील. [QE]
11. [QS]त्या दिवसात तू माझ्याविरूद्ध केलेल्या सर्व कृत्यांची तुला लाज वाटणार नाही, [QE][QS]कारण त्या समयापर्यंत जे तुझ्या वैभवाविषयी अभिमान धरत होते त्यांना मी बाहेर घालवीन, [QE][QS]आणि मग तू माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा गर्विष्ठ असणार नाहीस. [QE]
12. [QS]तुझ्यामध्ये मी फक्त नम्र व दीन लोकांसच राहू देईन, आणि तू परमेश्वराच्या नावात आश्रय घेशील.” [QE]
13. [QS]“इस्राएलमधील उरलेले वाईट कृत्ये करणार नाहीत व खोटे बोलणार नाहीत. [QE][QS]त्यांच्या मुखात कपटी जीभ आढळणार नाही. ते चरुन आडवे पडून राहतील व त्यांना कोणीही त्रास देणार नाही.” [QE]
14. [QS]सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! [QE][QS]यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर! [QE]
15. [QS]कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे; त्यांने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे! [QE][QS]इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची भीती बाळगण्याचे कारण नाही! [QE]
16. [QS]त्या दिवशी ते यरूशलेमेला असे म्हणतील, “घाबरू नको! हे सियोना तुझे हात लटपटू देऊ नको. [QE]
17. [QS]परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील, [QE][QS]तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. [QE][QS]तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील. [QE]
18. [QS]जे लोक सणाच्या वेळेकरता दु:ख करीत आहेत त्यांना मी एकत्र करीन. [QE][QS]मी तुझी निंदा आणि नाश होण्याची भीती तुझ्यापासून दूर करेन. [QE]
19. [QS]त्यावेळी, तुला जे पीडतात त्यांचा मी नायनाट करीन, [QE][QS]जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, आणि ज्यांना घालवून दिले आहे त्यांना गोळा करीन, [QE][QS]आणि ज्या प्रत्येक देशात त्यांची अप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये मी त्यांना प्रशंसा व कीर्ती मिळवून देईन. [QE]
20. [QS]त्यावेळी, मी तुला परत आणीन आणि मी तुम्हा सर्वांना परत एकत्र करीन, [QE][QS]मी तुला पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये प्रसिध्दी व कीर्ती मिळवून देईन. तुझ्या डोळ्यांदेखत मी तुझे भविष्य पुनर्संचयित करीन.” असे परमेश्वर म्हणतो![QE]
Total 3 अध्याय, Selected धडा 3 / 3
1 2 3
यरूशलेमेचे पाप व तिचा उद्धार 1 त्या बंडखोर नगरीला * यरूशलेम हाय हाय! ती हिंसेनी भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे. 2 तिने परमेश्वराचे वचन ऐकले नाही व त्याची शिकवणही ग्रहण केली नाही. तीने परमेश्वरावर भरवसा ठेवला नाही व ती तिच्या देवाला शरणही गेली नाही. 3 तिच्यामधले सरदार गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळच्या वेळचे लांडगे आहेत, जे सकाळपर्यंत कशाचीही नामोनिशाणी ठेवत नाहीत! 4 तिचे संदेष्टे उद्धट व अविचारी आहेत. तिच्या याजकांनी पवित्र गोष्टी अपवित्र केल्या आहेत आणि नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे! 2 परमेश्वर तिच्यामध्ये न्यायी आहे, तो अन्याय करू शकत नाही! तो दररोज आपला न्याय उजेडात आणतो! तो प्रकाशात लपवला जाणार नाही, तरीही गुन्हेगारांना लाज वाटत नाही. 6 मी राष्ट्रांचा व त्यांच्या किल्ल्यांचा नाश केला आहे. मी त्यांच्या रस्त्यांचा नाश केला आहे व आता येथून कोणीही जात नाही. त्यांची शहरे नष्ट झाली, त्यामुळे तिथे कोणीही राहत नाही. 7 मी म्हणालो, खचित तू माझे भय धरशील! शिक्षा घेशील, तर तुझ्या संबधाने ज्या सर्व योजना ठरवल्यानुसार तुझे घर नष्ट होणार नाही! पण ते सकाळीच ऊठून आपली सर्व कामे भ्रष्ट करत असत. विश्वासयोग्य शेष लोक
उत्प. 11:1-9; प्रेषि. 2:1-11

8 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, “मी लूट करायला ऊठेन तोपर्यंत माझी वाट पाहा, कारण राष्ट्रे एकत्र यावी, राज्ये गोळा करावी, आणि त्यांच्यावर मी आपला कोप व संतप्त क्रोध ओतावा, असा मी निश्चय केला आहे, कारण माझ्या क्रोधाच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल. 9 त्यानंतर लोकांस मी शुद्ध ओठ देईन, अशासाठी की परमेश्वराच्या नावाला हाक मारताना त्या सर्वांनी खांद्याला खांदा लावून एक होऊन माझी सेवा करावी. 10 कूश देशातील नदीपलीकडचे माझे आराधक व माझी विखुरलेली माणसे, मला अर्पणे घेऊन येतील. 11 त्या दिवसात तू माझ्याविरूद्ध केलेल्या सर्व कृत्यांची तुला लाज वाटणार नाही, कारण त्या समयापर्यंत जे तुझ्या वैभवाविषयी अभिमान धरत होते त्यांना मी बाहेर घालवीन, आणि मग तू माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा गर्विष्ठ असणार नाहीस. 12 तुझ्यामध्ये मी फक्त नम्र व दीन लोकांसच राहू देईन, आणि तू परमेश्वराच्या नावात आश्रय घेशील.” 13 “इस्राएलमधील उरलेले वाईट कृत्ये करणार नाहीत व खोटे बोलणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जीभ आढळणार नाही. ते चरुन आडवे पडून राहतील व त्यांना कोणीही त्रास देणार नाही.” 14 सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर! 15 कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे; त्यांने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे! इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची भीती बाळगण्याचे कारण नाही! 16 त्या दिवशी ते यरूशलेमेला असे म्हणतील, “घाबरू नको! हे सियोना तुझे हात लटपटू देऊ नको. 17 परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील, तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील. 18 जे लोक सणाच्या वेळेकरता दु:ख करीत आहेत त्यांना मी एकत्र करीन. मी तुझी निंदा आणि नाश होण्याची भीती तुझ्यापासून दूर करेन. 19 त्यावेळी, तुला जे पीडतात त्यांचा मी नायनाट करीन, जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, आणि ज्यांना घालवून दिले आहे त्यांना गोळा करीन, आणि ज्या प्रत्येक देशात त्यांची अप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये मी त्यांना प्रशंसा व कीर्ती मिळवून देईन. 20 त्यावेळी, मी तुला परत आणीन आणि मी तुम्हा सर्वांना परत एकत्र करीन, मी तुला पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये प्रसिध्दी व कीर्ती मिळवून देईन. तुझ्या डोळ्यांदेखत मी तुझे भविष्य पुनर्संचयित करीन.” असे परमेश्वर म्हणतो!
Total 3 अध्याय, Selected धडा 3 / 3
1 2 3
×

Alert

×

Marathi Letters Keypad References