1. 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर असेन मी तुला फारोसाठी देव असे केले आहे; आणि अहरोन हा तुझा संदेष्टा होईल;
|
2. 2 मी तुला सांगतो ते सर्व तू अहरोनाला सांग; मग माझे सर्व बोलणे तो फारोला सांगेल आणि मग फारो इस्राएल लोकांना हा देश सोडून जाऊ देईल.
|
4. 4 तेव्हा मग मी मिसरच्या लोकांना जबर शिक्षा करीन आणि त्या देशातून माझ्या सर्व लोकांना मी बाहेर काढीन
|
5. 5 तेव्हा मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे मी मिसरच्या लोकांविरुद्ध होईन आणि मग त्यांना कळेल की मी परमेश्वर आहे मग मी माझ्या लोकांना त्यांच्या देशातून बाहेर घेऊन जाईन.”
|
9. 9 “फारो तुम्हाला मी पाठविल्याचा पुरावा म्हणून एखादा चमत्कार करून तुमचे सामर्थ्य दाखविण्या विषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी जमिनीवर टाकण्यास सांग म्हणजे फारोच्या देखत त्या काठीचा साप होईल.
|
10. 10 तेव्हा मोशे व अहरोन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे फारोकडे गेले. अहरोनाने आपली काठी जमिनीवर टाकली. तेव्हा फारो व त्याचे सेवक यांच्या देखत त्या काठीचा साप झाला.
|
11. 11 तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; तेव्हा मिसरच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर अहरोनाप्रमाणे केले.
|
12. 12 त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले परंतु अहरोनाच्या काठीच्या सापाने त्यांचे साप गिळून टाकले.
|
13. 13 तरीही परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठोर झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही व इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
|
15. 15 उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नाईल नदीच्या काठी त्याला भेटाक्यास जा.
|
16. 16 त्याला असे सांग, ‘इब्री म्हणजे इस्राएल लोकांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकांना त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, असे तुला सांगण्यास मला बजावले आहे. आतापर्यंत तू परमेश्वराचे ऐकेले नाहीस.
|
17. 17 तेव्हा परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे त्याला अशावरून कळेल: मी नाईल नदीच्या पाण्यावर ह्या माझ्या हातातील काठीने नडाखा मारीन तेव्हा नदीच्या पाण्याचे रक्त होईल.
|
19. 19 परमेश्वर मोशेला म्हाणाला, “आपली काठी मिसरमधील नद्या, नाले, तलाव व जेथे पाणी भरून ठेवतात त्या जागेवर उगारण्यास अहरोनास सांग म्हणजे त्याने तसे केल्यावर सर्व पाण्याचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात भरलेल्या पाण्याचे देखील रक्त होईल.”
|
20. 20 तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उगारली नाईल नेदीवर मारली. त्याने हे फारो व त्याचे अधिकारी यांच्यासमोर केले. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले.
|
21. 21 नदीतले मासे मेले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकेनात. अवघ्या मिसरभर रक्तच रक्त झाले.
|
22. 22 मिसरच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले.
|
23. 23 मोशे व अहरोन यांनी केलेल्या चमत्काराकडे फारोने लक्ष दिले नाही; तो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला.
|