1. 1 माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.
|
3. 3 देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस. तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.
|
14. 14 देव जनावरांना खाऊ घालण्यासाठी गवत उगवतो. तो वाढवण्यासाठी आपल्याला वनस्पती देतो. त्या वनस्पती आपल्याला जमिनीतून अन्न देतात.
|
15. 15 देव आपल्याला आनंदित करणारा द्राक्षारस देतो. आपली कातडी मऊ करणारे तेल देतो आणि आपल्याला बलवान बनवणारे अन्न देतो.
|
16. 16 लबानोन मधले मोठे देवदार वूक्ष परमेश्वराचे आहेत. परमेश्वराने ती झाडे लावली आणि तो त्यांना लागणारे पाणी देतो.
|
19. 19 देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळते.
|
24. 24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस. तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे. तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
|
25. 25 समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे! आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात. तिथे लहान मोठे प्राणी आहेत. मोजता न येण्याइतके.
|
28. 28 देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस. तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.
|
29. 29 आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात. त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात. ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.
|
30. 30 पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.
|
32. 32 परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते. त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.
|
34. 34 मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते. मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.
|
35. 35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो. दुष्ट लोक कायमचे निघून जावोत. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.
|