2. 2 मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”
|
4. 4 तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.
|
5. 5 रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.
|
7. 7 तुम्ही 1000 शत्रूंचा पराभव कराल, तुमचा उजवा हात 10 000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल. तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्शसुध्दा करु शकणार नाहीत.
|
9. 9 का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता. परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे.
|
11. 11 देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.
|
14. 14 परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
|
15. 15 माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो. ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
|