मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
उत्पत्ति
1. काही दिवसानंतर फारोच्या नोकराकडून काही अपराध घडला. हे नोकर म्हणजे एक आचारी व दुसरा प्यालेबरदार हे होते.
2. म्हणून फारो राजा त्यांच्यावर रागावला.
3. तेव्हा फारोने त्यांना योसेफ ज्या तुरुंगात होता त्यातच डांबून टाकले. फारोच्या गारदयाचा सरदार पोटीफर हा त्या तुरुंगाचा मुख्य अधिकारी होता.
4. त्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत तुरुंगात अटकेत राहिले.
5. एके रात्री त्या दोघांही अपराध्यांना एकेक स्वप्न पडले, आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशेष अर्थ होता.
6. दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला तेव्हा ते त्याला दु:खी व चिंतेत असलेले दिसले.
7. तेव्हा योसेफाने त्यांना विचारले, “तुम्ही आज एवढे काळजीत का दिसता?”
8. त्या दोघांनी उत्तर दिले, “आम्हा दोघांना रात्री एक एक स्वप्न पडले; परंतु त्यांचा अर्थ आम्हाला समजत नाही; त्यांचा अर्थ सांगणारा किंवा उलगडा करणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “एकच म्हणजे केवळ देवच स्वप्नांचा अर्थ सांगू शकतो किंवा उलगडा करु शकतो; म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला तुमची स्वप्ने सांगा.”
9. तेव्हा प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात एक द्राक्षवेल पाहिला.
10. त्याला तीन फाटे होते. त्या फाटयांना फुले आली व नंतर त्यातून द्राक्षे तयार झाली असे मी पाहिले.
11. मी फारो राजाचा मद्याचा प्याला धरुन उभा होतो; तेव्हा मी ती द्राक्षे घेऊन त्या प्यालात पिळली; आणि मग द्राक्षारसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.”
12. नंतर योसेफ म्हणाला, “ह्या तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो; ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस.
13. हे तीन दिवस संपण्यापूर्वी फारो राजा तुझ्या अपराधाची तुला क्षमा करील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोचे जे काम करीत होतास तेच काम तू करशील.
14. परंतु तुला तुरुंगातून सोडल्यावर माझी आठवण कर, व माझ्यावर कृपा करुन मला मदत कर. माझ्या संबंधी फारोला सांग म्हणजे मग मी ह्या तुरुंगातून सुटेन.
15. मला माझ्या घरातून व माझ्या मायदेशातून म्हणजे माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे बळजबरीने आणले गेले; वास्तविक मला येथे तुरुंगात अटकेत राहाण्याची शिक्षा मिळावी असा मी कोणाचा काहीच अपराध केला नाही.”
16. आचाऱ्याने पाहिले की दुसऱ्या बंदीवान सेवकाचे स्वप्न चांगले आहे; म्हणून तो योसेफाला म्हणाला, “मला ही एक स्वप्न पडले, ते असे; माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या होत्या.
17. सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी सर्व प्रकारची पक्वाने होती; परंतु त्या पक्वान्नातील पदार्थ पक्षी खात होते.”
18. योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलडून सांगतो त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस.
19. तीन दिवस संपण्याच्या आत फारो राजा तुला या बंदीवासातून सोडवील आणि तुझे शीर उडवून टाकील व तुझे धड झाडाला टांगील; आणि पक्षी तुझ्या धडाचे मांस तोडून खातील.”
20. तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवक वर्गाला एक मेजवानी दिली; त्यावेळी त्याने त्या आचाऱ्याला व प्यालेबरदाराला तुरुंगातून सोडले.
21. फारोने प्यालेबरदाराची सुटका केली व त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने मद्याचा प्याला फारो राजाच्या हातात दिला.
22. परंतु फारोने आचाऱ्याला फाशी दिले.; तेव्हा जे होईल असे योसेफाने सांगितले होते ते थेट तसेच घडून आले.
23. परंतु त्या प्यालेबरदाराने योसेफासंबंधी तो काहीच बोलला नाही. अशा रीतीने त्या प्याले बरदाराला योसेफाविषयी विसर पडला.

Notes

No Verse Added

Total 50 अध्याय, Selected धडा 40 / 50
उत्पत्ति 40:19
1 काही दिवसानंतर फारोच्या नोकराकडून काही अपराध घडला. हे नोकर म्हणजे एक आचारी व दुसरा प्यालेबरदार हे होते. 2 म्हणून फारो राजा त्यांच्यावर रागावला. 3 तेव्हा फारोने त्यांना योसेफ ज्या तुरुंगात होता त्यातच डांबून टाकले. फारोच्या गारदयाचा सरदार पोटीफर हा त्या तुरुंगाचा मुख्य अधिकारी होता. 4 त्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत तुरुंगात अटकेत राहिले. 5 एके रात्री त्या दोघांही अपराध्यांना एकेक स्वप्न पडले, आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा विशेष अर्थ होता. 6 दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला तेव्हा ते त्याला दु:खी व चिंतेत असलेले दिसले. 7 तेव्हा योसेफाने त्यांना विचारले, “तुम्ही आज एवढे काळजीत का दिसता?” 8 त्या दोघांनी उत्तर दिले, “आम्हा दोघांना रात्री एक एक स्वप्न पडले; परंतु त्यांचा अर्थ आम्हाला समजत नाही; त्यांचा अर्थ सांगणारा किंवा उलगडा करणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “एकच म्हणजे केवळ देवच स्वप्नांचा अर्थ सांगू शकतो किंवा उलगडा करु शकतो; म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला तुमची स्वप्ने सांगा.” 9 तेव्हा प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात एक द्राक्षवेल पाहिला. 10 त्याला तीन फाटे होते. त्या फाटयांना फुले आली व नंतर त्यातून द्राक्षे तयार झाली असे मी पाहिले. 11 मी फारो राजाचा मद्याचा प्याला धरुन उभा होतो; तेव्हा मी ती द्राक्षे घेऊन त्या प्यालात पिळली; आणि मग द्राक्षारसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.” 12 नंतर योसेफ म्हणाला, “ह्या तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो; ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस. 13 हे तीन दिवस संपण्यापूर्वी फारो राजा तुझ्या अपराधाची तुला क्षमा करील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोचे जे काम करीत होतास तेच काम तू करशील. 14 परंतु तुला तुरुंगातून सोडल्यावर माझी आठवण कर, व माझ्यावर कृपा करुन मला मदत कर. माझ्या संबंधी फारोला सांग म्हणजे मग मी ह्या तुरुंगातून सुटेन. 15 मला माझ्या घरातून व माझ्या मायदेशातून म्हणजे माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे बळजबरीने आणले गेले; वास्तविक मला येथे तुरुंगात अटकेत राहाण्याची शिक्षा मिळावी असा मी कोणाचा काहीच अपराध केला नाही.” 16 आचाऱ्याने पाहिले की दुसऱ्या बंदीवान सेवकाचे स्वप्न चांगले आहे; म्हणून तो योसेफाला म्हणाला, “मला ही एक स्वप्न पडले, ते असे; माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या होत्या. 17 सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी सर्व प्रकारची पक्वाने होती; परंतु त्या पक्वान्नातील पदार्थ पक्षी खात होते.” 18 योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलडून सांगतो त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस. 19 तीन दिवस संपण्याच्या आत फारो राजा तुला या बंदीवासातून सोडवील आणि तुझे शीर उडवून टाकील व तुझे धड झाडाला टांगील; आणि पक्षी तुझ्या धडाचे मांस तोडून खातील.” 20 तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवक वर्गाला एक मेजवानी दिली; त्यावेळी त्याने त्या आचाऱ्याला व प्यालेबरदाराला तुरुंगातून सोडले. 21 फारोने प्यालेबरदाराची सुटका केली व त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने मद्याचा प्याला फारो राजाच्या हातात दिला. 22 परंतु फारोने आचाऱ्याला फाशी दिले.; तेव्हा जे होईल असे योसेफाने सांगितले होते ते थेट तसेच घडून आले. 23 परंतु त्या प्यालेबरदाराने योसेफासंबंधी तो काहीच बोलला नाही. अशा रीतीने त्या प्याले बरदाराला योसेफाविषयी विसर पडला.
Total 50 अध्याय, Selected धडा 40 / 50
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References