मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
जखऱ्या
1. देवाचा संदेश. एक शोकसंदेश हद्राख देश आणि त्या देशाची राजधानी दिमिष्क यांच्याबद्दल परमेश्वराचा संदेश: “इस्राएलमधील वंशांनाच फक्त देवाचे ज्ञान आहे असे नाही. प्रत्येकजण त्याच्याकडे मदतीची अपेक्षा करतो.
2. हद्राखच्या सीमेवर हमाथ आहे. सोर व सीदोन हीही सीमेवर आहेत. (येथील लोक बुध्दिवान आहेत.) आणि त्यांच्या विरुध्द हा संदेश आहे.
3. सोरची बांधणी किल्लयाप्रमाणे आहे. तेथील लोकांनी प्रचांड चांदीचा साठा केला आहे. त्याच्याकडे धुळीसारखी चांदी व मातीसारखे सोने आहे.
4. पण परमेश्वर, आमचा प्रभू ते सर्व घेईल. तो त्या नगराच्या शक्तिशाली आरमाराचा नाश करील आणि ते नगर आगीत भस्मसात करील.
5. “हे सर्व अष्कलोनचे लोक पाहतील आणि भयभीत होतील. गज्जाचे लोक भीतीने थरथर कापतील आणि एक्रोनचे लोक हे सर्व बघून आपल्या सर्व आशा सोडून देतील. राज्यामध्ये राजा राहणार नाही.
6. अश्दोदच्या लोकांना आपले खरे जन्मदाते कोण ह्याचा पत्ता लागणार नाही. गर्विष्ठ पलिष्ट्यांचा मी पूर्णपणे नाश करीन.
7. ते, यापुढे, रक्ताने माखलेले ताजे मांस वा निषिध्द अन्न खाणार नाहीत. वाचलेले, थोडेफार पलिष्टे माझ्या लोकांत सामील होतील आणि यहूदातील आणखी एक घराणे म्हणून राहतील. एक्रोनचे लोक यबूश्यासारखेच माझ्या माणसांत मिसळून जातील. मी माझ्या देशाचे रक्षण करीन.
8. माझ्या देशातून मी शत्रू - सैन्याला जाऊ देणार नाही. शत्रूंकडून माझ्या लोकांना इजा पोहचवू देणार नाही. कारण माझ्या लोकांनी पूर्वी किती यातना भोगल्या आहेत ते मी स्वत: पाहिले आहे.”
9. सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे.
10. राजा म्हणतो, “मी एफ्राईममधील रथांचा आणि यरुशलेममधील घोडदळाचा नाश केला. युध्दात वापरलेले धनुष्य - बाण मोडून टाकले.” राजा शांतीची वार्ता राष्ट्रांना देईल. तो राजा समुद्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व पृथ्वीवर सर्वदूरपर्यंत राज्य करील.
11. यरुशलेम, तुझ्या करारारवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आम्ही रक्त वापरले. म्हणून मी जमिनीतील खळग्यात बंदिस्त असलेल्या तुझ्या लोकांना मुक्त करतो.
12. कैद्यांनो, घरी जा! आता तुमच्याकडे आशा करण्यासारखे काहीतरी आहे. मी तुमच्याकडे येत आहे. हे मी आता तुम्हाला सांगतो:
13. यहूदा, मी तुझा धनुष्यासारखा उपयोग करीन. एफ्राईमचा उपयोग मी बाणांसारखा करीन. इस्राएल, ग्रीसशी लढण्यासाठी मी तुमचा उपयोग दणकट तलवारीसारखा करीन.
14. परमेश्वर त्यांना दर्शन देईल आणि विजेप्रमाणे आपले बाण सोडील. परमेश्वराने, माझ्या प्रभुने, तुतारी फुंकताच वाळवंटातील वाळूच्या वादळाप्रमाणे सैन्य हल्ला करील.
15. सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या सैन्याचे रक्षण करील. दगड व गोफणीचा उपयोग करुन ते शत्रूचा पराभव करतील. ते त्यांच्या शत्रू - सैन्याचे रक्त सांडतील. मद्याप्रमाणे शत्रूच्या रक्ताचे पाट वाहतील. ते रक्त, वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडलेल्या रक्ताप्रमाणे असेल.
16. त्यावेळी, मेंढपाळ जसे आपल्या मेंढ्यांचे रक्षण करतो, तसे परमेश्वर देव आपल्या लोकांचे रक्षण करील. आपले लोक त्याला मूल्यवान वाटतील. ते त्याला त्याच्या जमिनीवर चमकणाऱ्या रत्नांप्रमाणे वाटतील.
17. सर्व काही चांगले आणि सुंदर होईल. सर्वत्र आश्चर्यकारक पीक येईल. पण हे पीक फक्त अन्नधान्य व मद्य देणारे नसेल तर तरुण - तरुणींचे असेल.

Notes

No Verse Added

Total 14 अध्याय, Selected धडा 9 / 14
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
जखऱ्या 9:12
1 देवाचा संदेश. एक शोकसंदेश हद्राख देश आणि त्या देशाची राजधानी दिमिष्क यांच्याबद्दल परमेश्वराचा संदेश: “इस्राएलमधील वंशांनाच फक्त देवाचे ज्ञान आहे असे नाही. प्रत्येकजण त्याच्याकडे मदतीची अपेक्षा करतो. 2 हद्राखच्या सीमेवर हमाथ आहे. सोर व सीदोन हीही सीमेवर आहेत. (येथील लोक बुध्दिवान आहेत.) आणि त्यांच्या विरुध्द हा संदेश आहे. 3 सोरची बांधणी किल्लयाप्रमाणे आहे. तेथील लोकांनी प्रचांड चांदीचा साठा केला आहे. त्याच्याकडे धुळीसारखी चांदी व मातीसारखे सोने आहे. 4 पण परमेश्वर, आमचा प्रभू ते सर्व घेईल. तो त्या नगराच्या शक्तिशाली आरमाराचा नाश करील आणि ते नगर आगीत भस्मसात करील. 5 “हे सर्व अष्कलोनचे लोक पाहतील आणि भयभीत होतील. गज्जाचे लोक भीतीने थरथर कापतील आणि एक्रोनचे लोक हे सर्व बघून आपल्या सर्व आशा सोडून देतील. राज्यामध्ये राजा राहणार नाही. 6 अश्दोदच्या लोकांना आपले खरे जन्मदाते कोण ह्याचा पत्ता लागणार नाही. गर्विष्ठ पलिष्ट्यांचा मी पूर्णपणे नाश करीन. 7 ते, यापुढे, रक्ताने माखलेले ताजे मांस वा निषिध्द अन्न खाणार नाहीत. वाचलेले, थोडेफार पलिष्टे माझ्या लोकांत सामील होतील आणि यहूदातील आणखी एक घराणे म्हणून राहतील. एक्रोनचे लोक यबूश्यासारखेच माझ्या माणसांत मिसळून जातील. मी माझ्या देशाचे रक्षण करीन. 8 माझ्या देशातून मी शत्रू - सैन्याला जाऊ देणार नाही. शत्रूंकडून माझ्या लोकांना इजा पोहचवू देणार नाही. कारण माझ्या लोकांनी पूर्वी किती यातना भोगल्या आहेत ते मी स्वत: पाहिले आहे.” 9 सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे. 10 राजा म्हणतो, “मी एफ्राईममधील रथांचा आणि यरुशलेममधील घोडदळाचा नाश केला. युध्दात वापरलेले धनुष्य - बाण मोडून टाकले.” राजा शांतीची वार्ता राष्ट्रांना देईल. तो राजा समुद्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व पृथ्वीवर सर्वदूरपर्यंत राज्य करील. 11 यरुशलेम, तुझ्या करारारवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आम्ही रक्त वापरले. म्हणून मी जमिनीतील खळग्यात बंदिस्त असलेल्या तुझ्या लोकांना मुक्त करतो. 12 कैद्यांनो, घरी जा! आता तुमच्याकडे आशा करण्यासारखे काहीतरी आहे. मी तुमच्याकडे येत आहे. हे मी आता तुम्हाला सांगतो: 13 यहूदा, मी तुझा धनुष्यासारखा उपयोग करीन. एफ्राईमचा उपयोग मी बाणांसारखा करीन. इस्राएल, ग्रीसशी लढण्यासाठी मी तुमचा उपयोग दणकट तलवारीसारखा करीन. 14 परमेश्वर त्यांना दर्शन देईल आणि विजेप्रमाणे आपले बाण सोडील. परमेश्वराने, माझ्या प्रभुने, तुतारी फुंकताच वाळवंटातील वाळूच्या वादळाप्रमाणे सैन्य हल्ला करील. 15 सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या सैन्याचे रक्षण करील. दगड व गोफणीचा उपयोग करुन ते शत्रूचा पराभव करतील. ते त्यांच्या शत्रू - सैन्याचे रक्त सांडतील. मद्याप्रमाणे शत्रूच्या रक्ताचे पाट वाहतील. ते रक्त, वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडलेल्या रक्ताप्रमाणे असेल. 16 त्यावेळी, मेंढपाळ जसे आपल्या मेंढ्यांचे रक्षण करतो, तसे परमेश्वर देव आपल्या लोकांचे रक्षण करील. आपले लोक त्याला मूल्यवान वाटतील. ते त्याला त्याच्या जमिनीवर चमकणाऱ्या रत्नांप्रमाणे वाटतील. 17 सर्व काही चांगले आणि सुंदर होईल. सर्वत्र आश्चर्यकारक पीक येईल. पण हे पीक फक्त अन्नधान्य व मद्य देणारे नसेल तर तरुण - तरुणींचे असेल.
Total 14 अध्याय, Selected धडा 9 / 14
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References