मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
स्तोत्रसंहिता
1. देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन.
2. देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो. मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो. तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस. आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस.
3. देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली आणि तू मला होकार दिलीस. तू मला शक्ती दिलीस.
4. परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील तेव्हा ते तुझी स्तुती करतील.
5. ते परमेश्वराच्या पध्दतीचे गुणगान करतील कारण परमेश्वराची महिमा अगाध आहे.
6. देव फार म्हत्वाचा आहे पण तो दुबळड्यालोकांचा कैवारी आहे गर्विष्ठ लोक काय करतात ते देवाला माहीत आहे परंतु तो त्यांच्यापासून दूर राहातो.
7. देवा, मी जर संकटात सापडलो तर मला जिवंत ठेव. जर माझे शत्रू माझ्यावर रागावले तर त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
8. परमेश्वरा, तू कबूल केलेल्या वस्तू मला दे. परमेश्वरा, तुझे खरे प्रेम सदैव असते. परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस, आता आम्हाला सोडू नकोस.
Total 150 अध्याय, Selected धडा 138 / 150
1 देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन. 2 देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो. मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो. तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस. आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस. 3 देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली आणि तू मला होकार दिलीस. तू मला शक्ती दिलीस. 4 परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील तेव्हा ते तुझी स्तुती करतील. 5 ते परमेश्वराच्या पध्दतीचे गुणगान करतील कारण परमेश्वराची महिमा अगाध आहे. 6 देव फार म्हत्वाचा आहे पण तो दुबळड्यालोकांचा कैवारी आहे गर्विष्ठ लोक काय करतात ते देवाला माहीत आहे परंतु तो त्यांच्यापासून दूर राहातो.
7 देवा, मी जर संकटात सापडलो तर मला जिवंत ठेव. जर माझे शत्रू माझ्यावर रागावले तर त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
8 परमेश्वरा, तू कबूल केलेल्या वस्तू मला दे. परमेश्वरा, तुझे खरे प्रेम सदैव असते. परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस, आता आम्हाला सोडू नकोस.
Total 150 अध्याय, Selected धडा 138 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References