मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
ईयोब
1. नंतर ईयोबच्या तीन मित्रांनी ईयोबला उत्तर देणे सोडून दिले. त्यांनी ते सोडून दिले कारण ईयोबला स्वत:च्या निर्दोषपणाविषयी खात्री होती.
2. परंतु तिथे अलीहू नावाचा तरुण मुलगा होता. अलीहू बरखेलचा मुलगा होता. बरखेल बूजचा वंशज होता. अलीहू राम घराण्यातील होता. अलीहू ईयोबवर खूप रागावला. का? कारण ईयोब आपण स्वत: बरोबर आहोत असे म्हणत होता. ईयोब म्हणत होता की आपण देवापेक्षाही अधिक न्यायी आहोत.
3. अलीहू ईयोबच्या तीन मित्रांवरदेखील रागावला. का? कारण ईयोबचे तीन मित्र ईयोबच्या प्रश्रांची उत्तरे देऊ शकले नाहीत. ईयोब चुकला हे ते सिध्द करु शकले नाहीत.
4. अलीहू तिथे सगळ्यांत लहान होता. म्हणून तो सगळ्यांचे बोलणे संपेपर्यत थांबला. नंतर आपण बोलायला सुरुवात करावी असे त्याला वाटले.
5. परंतु नंतर अलीहूला दिसले की ईयोबच्या तीन मित्रांकडे काहीच बोलायचे उरले नाही. म्हणून त्याला राग आला.
6. म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला:“मी खूप तरुण आहे आणि तुम्ही वृध्द आहात. म्हणून तुम्हाला काही सांगायला मी घाबरत होतो.
7. मी माझ्याशीच विचार केला, ‘वृध्दांनी आधी बोलायला पाहिजे. वृध्द खूप वर्ष जगलेले असतात, त्यामुळे ते खूप गोष्टी शिकलेले असतात.’
8. परंतु देवाचा आत्मा लोकांना शहाणे करतो. त्या सर्वशक्तिमान देवाचा ‘नि:श्वास’ लोकांना समजण्यास मदत करतो.
9. केवळ वृध्द माणसेच तेवढी शहाणी नसतात. केवळ वृध्दांनाच चांगले वाईट कळते असे नाही.
10. “तेव्हा कृपा करुन माझे ऐका! मी तुम्हांला माझे विचार सांगतो.
11. मी तुमचे बोलणे संपेपर्यंत धीर धरला. तुम्ही ईयोबला जी उत्तरे दिलीत ती मी ऐकली.
12. तुम्ही ज्या गोष्टी संगितल्या त्या मी लक्षपूर्वक ऐकल्या. तुमच्या पैकी कुणीही ईयोबवर टीका केली नाही. तुमच्यापैकी एकनेही त्याच्या मुद्यांना उत्तरे दिली नाहीत.
13. तुम्ही तिघे तुम्हांला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही. ईयोबच्या मुद्यांना देवानेच उत्तरे दिली पाहिजेत, माणसांनी नाही.
14. ईयोबने त्याचे मुद्दे माझ्यासामोर मांडले नाहीत. म्हणून तुम्ही तिघांनी ज्या मुद्यांचा उपयोग केला त्यांचा उपयोग मी करणार नाही.
15. “ईयोब, हे तिघेही वाद हरले आहेत. त्यांच्या जवळ बोलायला आणखी काही उरले नाही. त्यांच्या जवळ आणखी उत्तरे नाहीत.
16. ईयोब, यांनी तुला उत्तरे द्यावीत म्हणून मी थांबलो होतो. परंतु ते आता गप्प आहेत. त्यांनी तुझ्याशी वाद घालणे आता बंद केले आहे.
17. म्हणून आता मी तुला माझे उत्तर देतो. होय मला काय वाटते ते मी तुला आता सांगतो.
18. मला इतके काही सांगायचे आहे की मी आता फूटून जाईन की काय असे वाटते.
19. मी द्राक्षरसाच्या न फोडलेल्या बाटलीसारखा आहे. द्राक्षरसाच्या नव्या बुधल्याप्रमाणे मी फुटण्याच्या बेतात आहे.
20. म्हणून मला बोललेच पाहिजे तरच मला बरे वाटेल. मी बोलले पाहिजे आणि ईयोबच्या मुद्यांना उत्तरे दिली पाहिजेत.
21. मी इतर कुणाला वागवतो त्याप्रमाणे ईयोबला वागवले पाहिजे. मी त्याच्याशी उगीचच चांगले बोलायचा प्रयत्न करणार नाही. मला जे बोलायला हवे तेच मी बोलेन.
22. एकापेक्षा दुसऱ्याला अधिक चांगले वागवणे मला शक्य नाही. मी जर असे केले तर देव मला शिक्षा करेल.

Notes

No Verse Added

Total 42 अध्याय, Selected धडा 32 / 42
ईयोब 32:30
1 नंतर ईयोबच्या तीन मित्रांनी ईयोबला उत्तर देणे सोडून दिले. त्यांनी ते सोडून दिले कारण ईयोबला स्वत:च्या निर्दोषपणाविषयी खात्री होती. 2 परंतु तिथे अलीहू नावाचा तरुण मुलगा होता. अलीहू बरखेलचा मुलगा होता. बरखेल बूजचा वंशज होता. अलीहू राम घराण्यातील होता. अलीहू ईयोबवर खूप रागावला. का? कारण ईयोब आपण स्वत: बरोबर आहोत असे म्हणत होता. ईयोब म्हणत होता की आपण देवापेक्षाही अधिक न्यायी आहोत. 3 अलीहू ईयोबच्या तीन मित्रांवरदेखील रागावला. का? कारण ईयोबचे तीन मित्र ईयोबच्या प्रश्रांची उत्तरे देऊ शकले नाहीत. ईयोब चुकला हे ते सिध्द करु शकले नाहीत. 4 अलीहू तिथे सगळ्यांत लहान होता. म्हणून तो सगळ्यांचे बोलणे संपेपर्यत थांबला. नंतर आपण बोलायला सुरुवात करावी असे त्याला वाटले. 5 परंतु नंतर अलीहूला दिसले की ईयोबच्या तीन मित्रांकडे काहीच बोलायचे उरले नाही. म्हणून त्याला राग आला. 6 म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला:“मी खूप तरुण आहे आणि तुम्ही वृध्द आहात. म्हणून तुम्हाला काही सांगायला मी घाबरत होतो. 7 मी माझ्याशीच विचार केला, ‘वृध्दांनी आधी बोलायला पाहिजे. वृध्द खूप वर्ष जगलेले असतात, त्यामुळे ते खूप गोष्टी शिकलेले असतात.’ 8 परंतु देवाचा आत्मा लोकांना शहाणे करतो. त्या सर्वशक्तिमान देवाचा ‘नि:श्वास’ लोकांना समजण्यास मदत करतो. 9 केवळ वृध्द माणसेच तेवढी शहाणी नसतात. केवळ वृध्दांनाच चांगले वाईट कळते असे नाही. 10 “तेव्हा कृपा करुन माझे ऐका! मी तुम्हांला माझे विचार सांगतो. 11 मी तुमचे बोलणे संपेपर्यंत धीर धरला. तुम्ही ईयोबला जी उत्तरे दिलीत ती मी ऐकली. 12 तुम्ही ज्या गोष्टी संगितल्या त्या मी लक्षपूर्वक ऐकल्या. तुमच्या पैकी कुणीही ईयोबवर टीका केली नाही. तुमच्यापैकी एकनेही त्याच्या मुद्यांना उत्तरे दिली नाहीत. 13 तुम्ही तिघे तुम्हांला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही. ईयोबच्या मुद्यांना देवानेच उत्तरे दिली पाहिजेत, माणसांनी नाही. 14 ईयोबने त्याचे मुद्दे माझ्यासामोर मांडले नाहीत. म्हणून तुम्ही तिघांनी ज्या मुद्यांचा उपयोग केला त्यांचा उपयोग मी करणार नाही. 15 “ईयोब, हे तिघेही वाद हरले आहेत. त्यांच्या जवळ बोलायला आणखी काही उरले नाही. त्यांच्या जवळ आणखी उत्तरे नाहीत. 16 ईयोब, यांनी तुला उत्तरे द्यावीत म्हणून मी थांबलो होतो. परंतु ते आता गप्प आहेत. त्यांनी तुझ्याशी वाद घालणे आता बंद केले आहे. 17 म्हणून आता मी तुला माझे उत्तर देतो. होय मला काय वाटते ते मी तुला आता सांगतो. 18 मला इतके काही सांगायचे आहे की मी आता फूटून जाईन की काय असे वाटते. 19 मी द्राक्षरसाच्या न फोडलेल्या बाटलीसारखा आहे. द्राक्षरसाच्या नव्या बुधल्याप्रमाणे मी फुटण्याच्या बेतात आहे. 20 म्हणून मला बोललेच पाहिजे तरच मला बरे वाटेल. मी बोलले पाहिजे आणि ईयोबच्या मुद्यांना उत्तरे दिली पाहिजेत. 21 मी इतर कुणाला वागवतो त्याप्रमाणे ईयोबला वागवले पाहिजे. मी त्याच्याशी उगीचच चांगले बोलायचा प्रयत्न करणार नाही. मला जे बोलायला हवे तेच मी बोलेन. 22 एकापेक्षा दुसऱ्याला अधिक चांगले वागवणे मला शक्य नाही. मी जर असे केले तर देव मला शिक्षा करेल.
Total 42 अध्याय, Selected धडा 32 / 42
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References