1. 1 परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
|
2. 2 तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.
|
5. 5 जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर. शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो. त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.
|
6. 6 परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द लढ. परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.
|
9. 9 वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर. देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्दयात डोकावून बघू शकतोस.
|
15. 15 ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात. परंतु ते स्वतच्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
|
16. 16 त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल. ते इतरांशी फार निर्दयपणे वागले. त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.
|
17. 17 मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो
|