मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
लेवीय
1. मग अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपआपली धुपाटणी घेतली व त्यात वेगळ्या अग्नीने धूप पेटवला; परंतु मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी अग्नीचा उपयोग न करता वेगव्व्याच अग्नीचा उपयोग केला;
2. म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.
3. मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे; मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांना समजलेच पाहिजे.”‘ तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.
4. अहरोनाचा चुलता उज्जिएल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन मुलगे होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “ह्या पवित्र स्थानाच्या पुढच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”
5. तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.
6. मोशेने अहरोन व त्याचे मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्यांना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;
7. पण तुम्ही दर्शनमंडपाच्याबाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.
8. मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला,
9. “जेव्हा तू व तुझे मुलगे तुम्ही दर्शनमंडपात जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधि आहे.
10. तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जणावा;
11. आणि परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांना शिकवावे.”
12. मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार ह्या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, “परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे;
13. परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हव्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.
14. “त्याप्रमाणे तू, तुझे मुलगे, व तुझ्या मुली ह्यांनी, ओवळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.
15. ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी अणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”
16. मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्याला कळाले; तेव्हा अहरोनाचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला,
17. “तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हांला दिले होते;
18. त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागीं बसून अवश्य खावयाचे होते.”
19. परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वराला ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
20. मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.

Notes

No Verse Added

Total 27 अध्याय, Selected धडा 10 / 27
लेवीय 10:59
1 मग अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपआपली धुपाटणी घेतली व त्यात वेगळ्या अग्नीने धूप पेटवला; परंतु मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी अग्नीचा उपयोग न करता वेगव्व्याच अग्नीचा उपयोग केला; 2 म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले. 3 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे; मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांना समजलेच पाहिजे.”‘ तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला. 4 अहरोनाचा चुलता उज्जिएल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन मुलगे होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “ह्या पवित्र स्थानाच्या पुढच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.” 5 तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते. 6 मोशेने अहरोन व त्याचे मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्यांना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा; 7 पण तुम्ही दर्शनमंडपाच्याबाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली. 8 मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, 9 “जेव्हा तू व तुझे मुलगे तुम्ही दर्शनमंडपात जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधि आहे. 10 तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जणावा; 11 आणि परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांना शिकवावे.” 12 मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार ह्या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, “परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे; 13 परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हव्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा. 14 “त्याप्रमाणे तू, तुझे मुलगे, व तुझ्या मुली ह्यांनी, ओवळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे. 15 ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी अणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.” 16 मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्याला कळाले; तेव्हा अहरोनाचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला, 17 “तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हांला दिले होते; 18 त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागीं बसून अवश्य खावयाचे होते.” 19 परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वराला ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!” 20 मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.
Total 27 अध्याय, Selected धडा 10 / 27
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References