15. 15 यहूदा आणि यरुशलेम यांचा परमेश्वराने पाडाव केला तेव्हा यहोसादाकला परागंदा व्हावे लागले. या लोकांना युध्दकैदी म्हणून दुसऱ्या देशात जावे लागले. परमेश्वराने हे सर्व नबुखद्नेस्सरच्या हातून घडवले.
|
19. 19 महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे.लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. वडलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
|
29. 29 मरारीचे मुलगे याप्रमाणे: मरारीचा मुलगा महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा मुलगा शिमी. शिमीचा उज्जा.
|
32. 32 पवित्र निवास मंडपात हे लोक गायनसेवा करीत. यरुशलेममध्ये शलमोनाने परमेश्वराचे मंदिर उभारले तोपर्यंत त्यांनी ही सेवा केली. आपल्या कामाच्या नियमानुसार ते वागत.
|
33. 33 गायनसेवा करणाऱ्यांची नावे अशी:कहाथ धराण्यातील वंशज: हेमान हा गवई. हा योएलचा मुलगा. योएल शमुवेलचा मुलगा.
|
39. 39 आसाफ हेमानचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा मुलगा. बरेख्या शिमाचा मुलगा.
|
44. 44 मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा मुलगा. किशी अब्दीचा मुलगा. अब्दी मल्लूखचा मुलगा.
|
48. 48 हेमान आणि आसाफ यांचे नातलग हे लेवी घराण्यातील होते. मंदिराच्या पवित्र निवासमंडपात काम करायला लेवींची निवड झाली होती. पवित्र निवासमंडप म्हणजे देवाचे घरच.
|
49. 49 होम करायच्या आणि धूप जाळायच्या वेदींवर धूप जाळायची परवानगी मात्र फक्त अहरोनच्या वंशजातील लोकांनाच होती. अहरोनचे हे वंशज देवाच्या अत्यंत पवित्र गाभाऱ्यात नेमलेले सर्व काम करत. इस्राएली लोकांना प्रायश्र्चित्त देऊन शुध्द करण्याचे समारंभही ते करत. मोशे याने सांगितलेले नियम आणि विधी ते पाळत. मोशे देवाचा सेवक होता.
|
50. 50 अहरोनचे वंशज पुढीलप्रमाणे: अहरोनचा मुलगा एलाजार. एलाजारचा मुलगा फिनहास. फिनहासचा मुलगा अबीशूवा.
|
54. 54 अहरोनचे वंशज राहत त्या ठिकाणांची माहिती अशी. त्यांना दिलेल्या जमिनीवर त्यांनी त्यांच्या वसत्या उभारल्या. कहथ कुटुंबांना त्या जमिनीतील पहिला वाटा मिळाला.
|
57. 57 अहरोनच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखोरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
|
60. 60 बन्यामीनच्या वंशातील लोकांना गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली.कहथच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
|
62. 62 गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
|
63. 63 मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
|
65. 65 यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठया टाकून, लेवी वंशजांना ती ती नगरे देण्यात आली.
|
69. 69 अयालोन आणि गथ-रिम्मोन हीही नगरे आसपासच्या जमिनीसकट त्यांना मिळाली. एफ्राईमच्या डोंगराळ भागातील ही गावे होत.
|
70. 70 मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे शिवारांसकट कहाथच्या वंशाच्या लोकांना दिली.
|
71. 71 गर्षोमच्या वंशजांना बाशानमधील गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या शिवारासकट, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
|
72. 72 त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या शिवारासकट इस्साखारच्या वंशजांकडून मिळाली.
|
76. 76 गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही शिवारासकट नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोन वंशाला मिळाली.
|
77. 77 आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या घराण्याकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
|
78. 78 या खेरीज मरारींना वाळवंटातील बेसेर, याजा, कदेमोथ, मेखाथ ही नगरे भोवतालच्या शिवारांसकट, रऊबेनी लोकांकडून मिळाली. हे रऊबेनी यार्देन नदीच्या पूर्वेला, यरीहोजवळ, राहत असत.
|
80. 80 मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलादमधील रामोथ, महनाइम, हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या शिवारासकट मिळाली.
|