मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
फिलिप्पैकरांस
1. जर मग ख्रिस्तात तुमच्यामध्ये काही उत्तेजन आहे, जर तुमच्यामध्ये तुमच्या प्रीतितून वाढणारे सांत्वन आहे, जर तुमच्यामध्ये आत्म्यात काही भाग आहे, जर तुमच्यामध्ये जिव्हाळा व कळवळा आहे,
2. तर मला पूर्णपणे आनंदी करा. मी सांगतो की, तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता, एकमेकांविषयी सारखेच प्रेम आहे तर आत्म्यात एक व्हा, आणि एकच उद्देश असू द्या.
3. हेवा किंवा पोकळ व्यर्थ अभिमानाने काहीही करु नका. उलट नम्रतेने एकमेकांना स्वत:पेक्षा चांगले माना.
4. प्रत्येक व्यक्तीने केवळ आपलेच हित पाहू नये, तर प्रत्येकाने दुसऱ्यांचे हितसुद्धा पाहावे.
5. ख्रिस्त येशूच्या ठायी जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या.
6. जरी तो देवाच्या स्वरुपाचा होता तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही.
7. उलट त्याने सर्व काही सोडून दोल, आणि त्याने गुलामाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्याचे रुप धारण केले व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला.
8. त्याने स्वत:ला नम्र केले. आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला. होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला.
9. म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले, व सर्व नावाहून जे नाव श्रष्ठ आहे ते त्याला दिले.
10. यासाठी की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहेत त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावेत.
11. व प्रत्येक जिभेने जाहीर करावे की, “येशू खिस्त हा देव पिता आहे.”
12. म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असतानासुद्धा आज्ञा पाळता तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा.
13. कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो.
14. प्रत्येक गोष्ट तक्रार किंवा भांडण न करता करा, यासाठी की,
15. तुम्ही निर्दोष व शुद्ध असे या कुटिल व विपरीत पिढीतील लोकांमध्ये असावे. आणि त्यांच्यामध्ये अंधाऱ्या जगातील प्रकाशासारखे चमकावे.
16. तुम्ही त्यांना जीवनाचे वजन सांगत असता, माझे शर्यतीत धावणे व्यर्थ झाले नाही असे मला दिसते, यासाठी की ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवशी मला तुमचा अभिमान वाटावा.
17. तुमच्या यज्ञार्पणासमवेत तसेच तुमच्या विश्वासाच्या सेवेसमवेत जरी मी अर्पिला गेलो तरी ते आनंदाने करतो आणि तुमच्या समवेत आनंदी बनतो.
18. त्याच प्रकारे, तुम्हीसुद्धा आनंदी असावे, आणि तुमच्या आनंदात मला सहभागी करावे.
19. पण मला आशा आहे, प्रभु येशूच्या साहाय्यने मी लवकरच तीमथ्यीला तुमच्याकडे पाठवीन यासाठी की, तुमच्याविषयीच्या बातमीने मला उत्तेजन मिळावे.
20. तोच एक आहे ज्याला पाठविण्याची माझी इच्छा आहे कारण माझ्यासारख्याच भावना असणारा दुसरा कोणी माझ्याजवळ नाही आणि त्याला तुमच्या कल्याणाची मनापासून कळकळ आहे.
21. सर्व जण त्यांच्या हिताकडेच लक्ष देतात व ख्रिस्ताच्या हिताकडे लक्ष देत नाहीत.
22. आणि तुम्हांला त्याचा स्वभाव माहीत आहे, सुवार्ता वाढविण्यासाठी जसे मुलगा पित्याची सेवा करतो तशी त्याने त्याच्या योग्यतेने माझ्याबरोबर सेवा केली आहे.
23. त्याला तुमच्याकडे पाठविण्याविषयी मी आशा करीत आहे. माझ्याबाबतीत काय होते ते कळताच त्याला तुमच्याकडे पाठविन.
24. आणि माझा असा विश्वास आहे की, देवाच्या साहाय्याने मला स्वत:लासुद्धा तुमच्याकडे येणे लवकरच शक्य होईल.
25. एपफ्रदीत, जो माझा बंधु आहे. सहकारी व सहशिपाई आहे, त्याला तुमच्याकडे पाठविण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटले, तसेच तो तुमचा प्रतिनिधी आहे जो माझ्या गरजेच्या वेळी मला साहाय्य करतो. मी असे करण्याचे ठरविले आहे कारण तो तुम्हा सर्वांना भेटण्यास आतुर झाला आहे.
26. मी त्याला पाठवितो कारण त्याला तुम्हांला फार भेटावेसे वाटते. तुम्ही तो आजरी असल्याचे जे ऐकले त्यामुळे त्याला काळजी वाटत आहे.
27. तो खरोखरच आजारी होता, अगदी मरणाला टेकला होता, पण देवाने त्याच्यावर करुणा केली; त्याच्यावरच केली असे नाही, तर माझ्यावरही केली; यासाठी की, मला आणखी दु:ख होऊ नये.
28. म्हणून, अधिक अधीरतेने, मी त्याला पाठवित आहे. यासाठी की जेव्हा तुम्ही त्याला पाहाल तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही आनंदी व्हाल आणि मी निश्रिंत असेन.
29. म्हणून, प्रभूमध्ये त्याचे स्वागत करा आणि अशा लोकांचा सन्मान करा, कारण ख्रिस्ताच्या कामासाठी तो जवळजवळ मेला होता.
30. त्याने त्याचे जीवन धोक्यात घातले, यासाठी की, माझी सेवा करण्यात तुमच्या जी उणीव होती ती भरुन काढावी.

Notes

No Verse Added

Total 4 अध्याय, Selected धडा 2 / 4
1 2 3 4
फिलिप्पैकरांस 2:27
1 जर मग ख्रिस्तात तुमच्यामध्ये काही उत्तेजन आहे, जर तुमच्यामध्ये तुमच्या प्रीतितून वाढणारे सांत्वन आहे, जर तुमच्यामध्ये आत्म्यात काही भाग आहे, जर तुमच्यामध्ये जिव्हाळा व कळवळा आहे, 2 तर मला पूर्णपणे आनंदी करा. मी सांगतो की, तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता, एकमेकांविषयी सारखेच प्रेम आहे तर आत्म्यात एक व्हा, आणि एकच उद्देश असू द्या. 3 हेवा किंवा पोकळ व्यर्थ अभिमानाने काहीही करु नका. उलट नम्रतेने एकमेकांना स्वत:पेक्षा चांगले माना. 4 प्रत्येक व्यक्तीने केवळ आपलेच हित पाहू नये, तर प्रत्येकाने दुसऱ्यांचे हितसुद्धा पाहावे. 5 ख्रिस्त येशूच्या ठायी जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या. 6 जरी तो देवाच्या स्वरुपाचा होता तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही. 7 उलट त्याने सर्व काही सोडून दोल, आणि त्याने गुलामाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्याचे रुप धारण केले व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला. 8 त्याने स्वत:ला नम्र केले. आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला. होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला. 9 म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले, व सर्व नावाहून जे नाव श्रष्ठ आहे ते त्याला दिले. 10 यासाठी की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहेत त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावेत. 11 व प्रत्येक जिभेने जाहीर करावे की, “येशू खिस्त हा देव पिता आहे.” 12 म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असतानासुद्धा आज्ञा पाळता तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा. 13 कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो. 14 प्रत्येक गोष्ट तक्रार किंवा भांडण न करता करा, यासाठी की, 15 तुम्ही निर्दोष व शुद्ध असे या कुटिल व विपरीत पिढीतील लोकांमध्ये असावे. आणि त्यांच्यामध्ये अंधाऱ्या जगातील प्रकाशासारखे चमकावे. 16 तुम्ही त्यांना जीवनाचे वजन सांगत असता, माझे शर्यतीत धावणे व्यर्थ झाले नाही असे मला दिसते, यासाठी की ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवशी मला तुमचा अभिमान वाटावा. 17 तुमच्या यज्ञार्पणासमवेत तसेच तुमच्या विश्वासाच्या सेवेसमवेत जरी मी अर्पिला गेलो तरी ते आनंदाने करतो आणि तुमच्या समवेत आनंदी बनतो. 18 त्याच प्रकारे, तुम्हीसुद्धा आनंदी असावे, आणि तुमच्या आनंदात मला सहभागी करावे. 19 पण मला आशा आहे, प्रभु येशूच्या साहाय्यने मी लवकरच तीमथ्यीला तुमच्याकडे पाठवीन यासाठी की, तुमच्याविषयीच्या बातमीने मला उत्तेजन मिळावे. 20 तोच एक आहे ज्याला पाठविण्याची माझी इच्छा आहे कारण माझ्यासारख्याच भावना असणारा दुसरा कोणी माझ्याजवळ नाही आणि त्याला तुमच्या कल्याणाची मनापासून कळकळ आहे. 21 सर्व जण त्यांच्या हिताकडेच लक्ष देतात व ख्रिस्ताच्या हिताकडे लक्ष देत नाहीत. 22 आणि तुम्हांला त्याचा स्वभाव माहीत आहे, सुवार्ता वाढविण्यासाठी जसे मुलगा पित्याची सेवा करतो तशी त्याने त्याच्या योग्यतेने माझ्याबरोबर सेवा केली आहे. 23 त्याला तुमच्याकडे पाठविण्याविषयी मी आशा करीत आहे. माझ्याबाबतीत काय होते ते कळताच त्याला तुमच्याकडे पाठविन. 24 आणि माझा असा विश्वास आहे की, देवाच्या साहाय्याने मला स्वत:लासुद्धा तुमच्याकडे येणे लवकरच शक्य होईल. 25 एपफ्रदीत, जो माझा बंधु आहे. सहकारी व सहशिपाई आहे, त्याला तुमच्याकडे पाठविण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटले, तसेच तो तुमचा प्रतिनिधी आहे जो माझ्या गरजेच्या वेळी मला साहाय्य करतो. मी असे करण्याचे ठरविले आहे कारण तो तुम्हा सर्वांना भेटण्यास आतुर झाला आहे. 26 मी त्याला पाठवितो कारण त्याला तुम्हांला फार भेटावेसे वाटते. तुम्ही तो आजरी असल्याचे जे ऐकले त्यामुळे त्याला काळजी वाटत आहे. 27 तो खरोखरच आजारी होता, अगदी मरणाला टेकला होता, पण देवाने त्याच्यावर करुणा केली; त्याच्यावरच केली असे नाही, तर माझ्यावरही केली; यासाठी की, मला आणखी दु:ख होऊ नये. 28 म्हणून, अधिक अधीरतेने, मी त्याला पाठवित आहे. यासाठी की जेव्हा तुम्ही त्याला पाहाल तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही आनंदी व्हाल आणि मी निश्रिंत असेन. 29 म्हणून, प्रभूमध्ये त्याचे स्वागत करा आणि अशा लोकांचा सन्मान करा, कारण ख्रिस्ताच्या कामासाठी तो जवळजवळ मेला होता. 30 त्याने त्याचे जीवन धोक्यात घातले, यासाठी की, माझी सेवा करण्यात तुमच्या जी उणीव होती ती भरुन काढावी.
Total 4 अध्याय, Selected धडा 2 / 4
1 2 3 4
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References