1. 1 परमेश्वराला धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
|
5. 5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
|
6. 6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात. तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
|
12. 12 अब्राहामचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले. ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.
|
19. 19 योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला. परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द झाले.
|
20. 20 तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले. राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुंरुंगातून बाहेर काढले.
|
21. 21 त्याने योसेफला आपल्या घराचा मुख्य नेमले. योसेफने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
|
25. 25 म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले. त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
|
33. 33 देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली. देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
|
36. 36 आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले. देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले.
|
37. 37 नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले. त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली. देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
|
42. 42 देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती. देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.
|
44. 44 देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला. देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
|
45. 45 देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.
|