3. 3 तुझ्या अत्तराचा खूप चांगला वास येत आहे, पण तुझे नाव मात्र उत्तम अत्तरापेक्षाही गोड आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
|
4. 4 मला तुझ्याबरोबर ने. आपण पळून जाऊ.राजाने मला त्याच्या खोलीत नेले.आम्ही आनंदोत्सव करु आणि तुझ्यासाठी आनंदित होऊ. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे हे लक्षात ठेव. तरुणी तुझ्यावर योग्य कारणासाठी प्रेम करतात.
|
6. 6 मी किती काळी आहे, सूर्याने मला किती काळे केले आहे याकडे बघू नका. माझे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी माझ्यावर त्यांच्या द्राक्षांच्या मळ्याची काळजी घ्यायची सक्ती केली. त्यामुळे मला स्वत:चीकाळजी घेता आली नाही.
|
7. 7 मी माझ्या आत्म्यासकट तुझ्यावर प्रेम करते. मला सांग: तू तुझ्या मेंढ्यांना कुठे खायला दिलेस? तू त्यांना दुपारी कुठे विश्रांती घेऊ दिलीस? मी तुझ्याबरोबर यायला हवे. नाही तर मी तुझ्या मित्रांच्या मेंढ्यांची काळजी घेणारी, अशी भाडोत्री स्त्रीसारखी ठरेन
|
8. 8 तू खूप सुंदर स्त्री आहेस. काय करायचे ते तुला नक्कीच माहीत आहे. मेंढ्यांच्या मागे मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूंजवळ खाऊ घाल.
|
9. 9 फारोचा रथ ओढणाऱ्या घोड्यांना घोडीजशी उद्दीपित करते त्यापेक्षाही जास्त तू मला उद्दीपित करतेस.त्या घोडड्यांच्या चेहेऱ्यांच्या बाजूंवर आणि गळ्यात सुंदर अलंकार आहेत.
|
10. 10 हे तुझ्यासाठी केलेले अलंकार: डोक्याभोवतीचा सोन्याचा पट्टा आणि चांदीच्या हार. तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत. तुझा गळा चांदीच्या अलंकारांनी सुंदर दिसत आहे.
|
13. 13 माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या सुंगधी द्रव्याच्या पिशवीसारखा आहे
|