मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
निर्गम
1. परमेश्वर मोशेला म्हणाला,
2. “इस्राएल लोकांना माझ्यासाठी अर्पणे आणावयास सांग. प्रत्येक माणसाने माझ्यासाठी काय अर्पण आणावयाचे ते मनापासून ठरवून आणावे; ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी.
3. लोकांकडून तू माझ्याकरता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी; सोने, चांदी, पितळ;
4. निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस;
5. लाल रंगविलेली मेढ्यांची कातडी; तहशाची कातडी बाभळीचे लाकूड;
6. दिव्यासाठी जैतूनाचे मसाले;
7. एफोद ह्यांच्यामध्ये खोचण्यासाठी गोमेद नांवाचे रत्न व इतर रत्ने.”
8. परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लोकांनी माझ्यासाठी एक पवित्र निवास मंडप बांधावा म्हणजे मग मी इस्राएल लोकांबरोबर राहीन.
9. तो पवित्र निवास मंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुम्हास दाखवीन. मग तुम्ही, अगदी मी दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच तो बांधावा.
10. “बाभळीच्या लाकडाची एक पेटी किंवा पवित्रकोश तयार करावा; त्याची लांबी पंचेचाळीस इंच, रुंदी सत्तावीस इंच व उंची सत्तावीस इंच असावी.
11. तो आतून बाहेरून सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठकरावा.
12. पवित्रकोश उचलून नेण्यासाठी त्याला सोन्याच्या चार गोल कड्या कराव्यात त्या पवित्रकोशाच्या सोन्याच्या चार गोल कड्या कराव्यात त्या पवित्रकोशाच्या प्रत्येक बाजूला दोन अशा चारही कोपऱ्यांच्या पायावर घट्ट बसवाव्यात
13. मग पवित्रकोश वाहून नेण्याकरता बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढावावेत
14. पवित्रकोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा.
15. पवित्रकोशाचे हे दांडे कड्यात कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊनयेत.”
16. देव म्हणाला, “मी तुला पवित्रकराराचा साक्षपट देईन तो तू पवित्रकोशात ठेवावास.
17. मग शुद्ध सोन्याचे एक झाकण बनवावे; ते पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रूंद असावे;
18. मग सोन्याचे घडीव काम करुन दोन करुब देवदूत करुन ते झाकणाच्या म्हणजे दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत.
19. एक देवदूत एका बाजूला व दुसरा, दुसज्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखण्ड सोन्याचे घडवावेत.
20. त्या दूतांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.
21. “मी तुला पवित्र कराराचा आज्ञापट देईन तो तू पवित्रकोशामध्ये ठेवावा; आणि दयासन त्याच्यावर ठेवावे.
22. मी जेव्हा तुला भेटेन तेव्हा कराराच्या कोशावर ठेवलेल्या देवदतांच्यामधुन मी तुझ्याशी बोलेन; आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.
23. “बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; ते छत्तीस इंच लांब आठरा इंच रूंद व सत्तावीस इंच उंचीचे असावे.
24. ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठकरावा.
25. मग तीन इंच रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा।
26. मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांवर घटृ बसवाव्यात.
27. ह्या कड्या मेजाच्या वरच्या भाग भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी ह्या कड्यांमध्ये दांडे घट्ट बसतील.
28. मेज वाहून नेण्यासाठी बाभळींच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.
29. मेजावरची तबके, चमचे, धूपपात्र, सुरया व कटोरे शुद्ध सोन्याचे बनवावेत; सुरयांचा व कटोऱ्यांचा पेयार्पणे ओतण्यासाठी उपयोग होईल.
30. माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर ठेवावी व ती नेहमी माझ्यापुढे असावी.
31. “मग तू एक दीपवृक्ष तयार कर. शुद्ध सोने वापर व ते ठोकून बैठक व दांडा घडव शुद्ध सोन्यापासून फुले, कव्व्या व पाकळ्या तयार कर. व हे सर्व एकत्र जोडून एकसंध कर.
32. त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात.
33. प्रत्येक शाखेला तीन फुले असावीत; ही फुले, ह्या कव्व्या व पाकव्व्या बदामाच्या झाडावर असताता तशा असाव्यात.
34. ह्या दीपवृक्षावर आणखी चार फुले बनवावीत; ती बदामाच्या झाडावरील, कव्व्या पाकव्व्यासहित असलेल्या फुलाप्रमाणे असावीत.
35. ह्या दीपवृक्षावर दांड्याच्या एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात; जेथे शाखा मुख्य दांड्याला जोडलेली आहे त्या प्रत्येक जोडाखाली कव्व्या व पाकव्व्या सहित एक फूल बनवावे.
36. हे दीपवृक्ष, फुले व फांद्या यांच्या सहीत शुद्ध सोन्याचे घडविले पाहिजे हे सर्व ठोकून व एकत्र जोडून एकसंध केले पाहिजे.
37. मग ह्या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल.
38. दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.
39. हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे पन्नास शेर शुद्ध सोन्याची करावी;
40. आणि मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ह्या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.”
Total 40 अध्याय, Selected धडा 25 / 40
1 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना माझ्यासाठी अर्पणे आणावयास सांग. प्रत्येक माणसाने माझ्यासाठी काय अर्पण आणावयाचे ते मनापासून ठरवून आणावे; ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी. 3 लोकांकडून तू माझ्याकरता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी; सोने, चांदी, पितळ; 4 निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस; 5 लाल रंगविलेली मेढ्यांची कातडी; तहशाची कातडी बाभळीचे लाकूड; 6 दिव्यासाठी जैतूनाचे मसाले; 7 एफोद ह्यांच्यामध्ये खोचण्यासाठी गोमेद नांवाचे रत्न व इतर रत्ने.” 8 परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लोकांनी माझ्यासाठी एक पवित्र निवास मंडप बांधावा म्हणजे मग मी इस्राएल लोकांबरोबर राहीन. 9 तो पवित्र निवास मंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुम्हास दाखवीन. मग तुम्ही, अगदी मी दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच तो बांधावा. 10 “बाभळीच्या लाकडाची एक पेटी किंवा पवित्रकोश तयार करावा; त्याची लांबी पंचेचाळीस इंच, रुंदी सत्तावीस इंच व उंची सत्तावीस इंच असावी. 11 तो आतून बाहेरून सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठकरावा. 12 पवित्रकोश उचलून नेण्यासाठी त्याला सोन्याच्या चार गोल कड्या कराव्यात त्या पवित्रकोशाच्या सोन्याच्या चार गोल कड्या कराव्यात त्या पवित्रकोशाच्या प्रत्येक बाजूला दोन अशा चारही कोपऱ्यांच्या पायावर घट्ट बसवाव्यात 13 मग पवित्रकोश वाहून नेण्याकरता बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढावावेत 14 पवित्रकोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा. 15 पवित्रकोशाचे हे दांडे कड्यात कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊनयेत.” 16 देव म्हणाला, “मी तुला पवित्रकराराचा साक्षपट देईन तो तू पवित्रकोशात ठेवावास. 17 मग शुद्ध सोन्याचे एक झाकण बनवावे; ते पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रूंद असावे; 18 मग सोन्याचे घडीव काम करुन दोन करुब देवदूत करुन ते झाकणाच्या म्हणजे दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत. 19 एक देवदूत एका बाजूला व दुसरा, दुसज्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखण्ड सोन्याचे घडवावेत. 20 त्या दूतांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. 21 “मी तुला पवित्र कराराचा आज्ञापट देईन तो तू पवित्रकोशामध्ये ठेवावा; आणि दयासन त्याच्यावर ठेवावे. 22 मी जेव्हा तुला भेटेन तेव्हा कराराच्या कोशावर ठेवलेल्या देवदतांच्यामधुन मी तुझ्याशी बोलेन; आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन. 23 “बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; ते छत्तीस इंच लांब आठरा इंच रूंद व सत्तावीस इंच उंचीचे असावे. 24 ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठकरावा. 25 मग तीन इंच रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा। 26 मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांवर घटृ बसवाव्यात. 27 ह्या कड्या मेजाच्या वरच्या भाग भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी ह्या कड्यांमध्ये दांडे घट्ट बसतील. 28 मेज वाहून नेण्यासाठी बाभळींच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत. 29 मेजावरची तबके, चमचे, धूपपात्र, सुरया व कटोरे शुद्ध सोन्याचे बनवावेत; सुरयांचा व कटोऱ्यांचा पेयार्पणे ओतण्यासाठी उपयोग होईल. 30 माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर ठेवावी व ती नेहमी माझ्यापुढे असावी. 31 “मग तू एक दीपवृक्ष तयार कर. शुद्ध सोने वापर व ते ठोकून बैठक व दांडा घडव शुद्ध सोन्यापासून फुले, कव्व्या व पाकळ्या तयार कर. व हे सर्व एकत्र जोडून एकसंध कर. 32 त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात. 33 प्रत्येक शाखेला तीन फुले असावीत; ही फुले, ह्या कव्व्या व पाकव्व्या बदामाच्या झाडावर असताता तशा असाव्यात.
34 ह्या दीपवृक्षावर आणखी चार फुले बनवावीत; ती बदामाच्या झाडावरील, कव्व्या पाकव्व्यासहित असलेल्या फुलाप्रमाणे असावीत.
35 ह्या दीपवृक्षावर दांड्याच्या एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात; जेथे शाखा मुख्य दांड्याला जोडलेली आहे त्या प्रत्येक जोडाखाली कव्व्या व पाकव्व्या सहित एक फूल बनवावे. 36 हे दीपवृक्ष, फुले व फांद्या यांच्या सहीत शुद्ध सोन्याचे घडविले पाहिजे हे सर्व ठोकून व एकत्र जोडून एकसंध केले पाहिजे. 37 मग ह्या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल. 38 दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत. 39 हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे पन्नास शेर शुद्ध सोन्याची करावी; 40 आणि मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ह्या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.”
Total 40 अध्याय, Selected धडा 25 / 40
×

Alert

×

Marathi Letters Keypad References