मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
दानीएल
1. नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षांत काही स्वप्ने पडली. त्या स्वप्नांमुळे तो काळजीत पडला व त्याची झोप उडाली.
2. म्हणून त्याने त्याच्या ज्ञानी माणसांना बोलावून घेतले. हे ज्ञानी स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आणि भविष्यात काय घडेल, हे सांगण्यासाठी मंत्र-तंत्र करीत व ताऱ्यांचे निरीक्षण करीत. ह्या लोकांनी राजाला काय स्वप्न पडले आहे, ते सांगावे, अशी राजाची इच्छा होती. मग ते लोक राजाच्या समोर येऊन उभे राहिले.
3. राजा त्यांना म्हणाला, मला पडलेल्या स्वप्नामुळे मी चिंतेत पडलो आहे. मला स्वप्नाचा अर्थ समजावून घ्यायचा आहे.
4. मग खास्दी अरामी भाषेत राजाला म्हणाले, राजा, चिरंजीव हो! आम्ही तुझे सेवक आहोत. कृपा करून आम्हाला तुझे स्वप्न सांग, म्हणजे मग आम्ही तुला त्याचा अर्थ सागू.
5. तेव्हा नबुखद्नेस्सर राजा त्यांना म्हणाला, नाही! तुम्हीच मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. तुम्ही हे सांगितले नाही, तर तुमचे तुकडे करण्याचा हुकूम मी देईन. एवढेच नाही तर तुमच्या घरांची राखरांगोळी करीन.
6. पण तुम्ही मला माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितलात, तर मी तुम्हाला भेटी, बक्षिसे देईन. तुमचा सन्मान करीन. तेव्हा आता माझे स्वप्न व त्याचा अर्थ सांगा.
7. ते ज्ञानी लोक पुन्हा राजाला म्हणाले,”कृपा करून बस आम्हाला तुझे स्वप्न सांग म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
8. मग नबुखद्नेस्सर उत्तरला, तुम्ही वेळ काढीत आहात, हे मला कळले आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कळला, असे मला वाटते.
9. तुम्ही मला माझे स्वप्न सांगितले नाहीत तर तुम्हाला शिक्षा होणार, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणून तुम्ही सर्व एक होऊन माझ्याशी खोटे बोलत आहात. तुम्ही वेळकाढूपणा करू पाहत आहात. मी तुम्हाला सांगितलेले विसरेन अशी आशा तुम्ही धरून आहात. पण आता आधी मला माझे स्वप्न सांगा. तुम्ही मला स्वप्न सांगू शकलात,तर तुम्ही त्याचा खूरा अर्थही सांगू शकाल हे मला पटेल.
10. खास्दी राजाला म्हणाले,”राजा, तू जे मागत आहेस, ते देऊ शकणारा एकही माणूस या पृथ्वीवर नाही. अजूनपर्यंत कोणत्याही राजाने, ज्ञानी वा मात्रिक अथवा खास्दी याच्याजवळ अशा प्रकारची मागणी केलेली नाही. अगदी मोठ्या व सामर्थ्यवान राजांनीसुध्दा ज्ञानी माणसांकडे असे काही, कधीही मागितलेले नाही.
11. राजा, अशक्य गोष्ट करण्यास सांगत आहे. फक्त दैवतंच राजाला त्याचे स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकतात. पण दैवत माणसांमध्ये राहात नाहीत.
12. हे बोलणे ऐकून राजाचा पारा चढला. मग त्याने बाबेलमधील सर्व ज्ञानी माणसांना ठार करण्याचा हुकूम दिला.
13. राजाच्या हुकूमाची दवंडी पिटविण्यात आली. सर्व ज्ञानी माणसे ठार केली जाणार होती. राजाचे लोक दानीएलला व त्याच्या मित्रांना ठार मारण्यासाठी त्यांचा तपास करण्यासाठी गेले.
14. अर्योक शिपायांचा म्होरक्या होता. तोच बाबेलमधील ज्ञानी माणसांना ठार मारणार होता. पण दानीएल त्याच्याशी चातुर्याने व विनयाने बोलला.
15. दानीएल अर्योकला म्हणाला राजाने अशी कडक शिक्षा का ठोठावली”? मग अर्योकने राजाच्या स्वप्नाची सर्व हकिगत वर्णन केली. मग दानीएलला सर्व समजले.
16. सर्व हकिगत समजताच दानीएल नबुखद्नेस्सर राजाकडे गेला व त्याने राजाजवळ थोडा वेळ मागितला. मग तो राजाला त्याचे स्वप्न व त्या स्वप्नाचा अर्थ सांगणार होता.
17. मग दानीएल त्याच्या घरी गेला. हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्या आपल्या मित्रांना त्याने सर्व हकिगत सांगितली.
18. दानीएलाने आपल्या मित्रांना स्वर्गातील देवाची प्रार्थना करण्यास सांगितले. दानीएलने त्यांना प्रार्थना करण्यास सांगितले कारण त्यामुळे देव त्यांच्यावर कृपा करील व हे रहस्य समजण्यास मदत करील. मग तो व त्याचे मित्र, बाबेलच्या इतर ज्ञानी माणसाबरोबर मारले जाणार नाहीत, असे त्याला वाटले.
19. रात्री, देवाने दानीएलला दृष्टान्त देऊन सर्व रहस्य उलगडून सांगितले. मग दानीएलने स्वर्गातील देवाचे स्तुतिस्तोत्र गायले. तो म्हणाला,
20. “सदासर्वकाळ देवाच्या नावाची स्तुती करा. सामर्थ्य व ज्ञान त्याच्यापाशीच आहे.
21. तो काळ आणि ऋ तू बदलतो. आणि राजेही बदलतो. तोच राजांना सत्ता देतो. आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो. लोकांनी शहाणे व्हावे म्हणून तो त्यांना शहाणपण देतो, त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून तो त्यांना सर्व गोष्टी शिकू देतो.
22. समजण्यास अतिशय कठीण असलेली, गुप्त रहस्ये त्याला माहीत असतात. प्रकाश त्याच्याबरोबर असल्यामुळे, अंधारात आणि गुप्त जागी काय आहे ते त्याला कळते.
23. माझ्या पूर्वजांच्या देवा, मी कृतज्ञ आहे, मी तुझी स्तुती करतो. तू मला ज्ञान व शक्ती दिलीस. मी विचारलेल्या गोष्टी सांगितल्यास. तूच मला राजाच्या स्वप्नाबद्दल सांगितलेस.”
24. मग दानीएल अर्योककडे गेला. नबुखद्नेस्सर राजाने.बाबेलमधील ज्ञानी माणसांना ठार मारण्याच्या काम अर्योकचीच निवड केली होती. दानीएल त्याला म्हणाला, बाबेलमधील ज्ञानी माणसांना मारू नको. मला राजाकडे घेऊन चल! मी राजाला, त्याचे स्वप्न व त्याचा अर्थ, सांगीन.
25. मग अर्योकने ताबडतोब दानीएलला राजाकडे नेले. अर्योक राजाला म्हणाला, महाराजांना त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकणारा एकजण मला यहूदातील कैद्यां मध्ये सापडला आहे.
26. राजाने दानीएलला (बेलशटस्सरला) प्रश्न केला, तू मला माझे स्वप्न व त्याचा अर्थ सागू शक तोस का?
27. दानीएलने उत्तर दिले राजा, नबुखद्नेस्सर, तू विचारलेली गुप्त गोष्ट ज्ञानी किवा मांत्रिक अथवा खास्दी कोणीच सांगू शकणार नाही.
28. पण अशा रहस्यमय गोष्टी स्वर्गातील देवच सांगतो. पुढे काय घडणार हे दाखविण्यासाठीच नबुखद्नेस्सर राजाला देवाने स्वप्नात पाडले. तू झोपला असताना पुढील गोष्टी स्वप्नात पाहिल्यास.
29. राजा, तू तुझ्या शय्येवर झोपला होतास. मग तू भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबंद्दल विचार करायला लागलास. देव लोकांना रहस्ये सांगू शकतो त्याने तुला भविष्यात काय घडणार ते दाखविले.
30. देवाने मलाही ते रहस्य सांगितले. का? मी इतरांपेक्षा ज्ञानी आहे म्हणून नव्हे, तर तुला त्याचा अर्थ कळावा आणि तुझ्या मनात काय विचार येऊन गेले ते तुला समजावे, म्हणूनच देवाने मला हे रहस्य सांगितले.
31. राजा, तू स्वप्नात तुझ्यासमोर एक प्रचंड, चकचकीत, मनावर छाप पाडणारा पुतळा पाहिलास. त्याच्याकडे बघताच कोणाचेही डोळे आश्चर्याने विस्फारावे असा तो होता.
32. (32-33) पुतव्व्याचे डोके शुध्द सोन्याचे होते. छाती आणि हात चांदीचे होते पोट व वरील पायाच्या बाकीचा भाग काशाचा होता. खालील पायाचा भाग लोखंडाचा होता. ह्या पुतव्व्याची पावले लोखंड व माती यांची होती.
33.
34. तू पुतव्व्याकडे बघत असतानाच एक कापलेला दगड तुला दिसला. तो दगड कोणा माणसाने छेदलेला नव्हता. मग तो दगड (हवेतून गेला) आणि पुतव्व्याच्या लोखंड व माती यांनी बनेलेल्या पायावर आदळला.त्याने पावलांचा चक्काचूर केला.
35. त्यानंतर एकदमचलोखंड माती, काशे, चांदी, सोने ह्यांचा चुरा झाला तो चुरा उन्हाळ्यातील खळ्यातील फोलकटाप्रमाणे वाऱ्याने दूरवर उडवला गेला. मागे काहीच उरले नाही. तेथे पुतळा होता हे कोणलाही खरे वाटले नसते. मग पुतव्व्यावर आदळणाऱ्या दगडाचा मोठा पर्वत झाला व त्याने सर्व पृथ्वी व्यापली.
36. हेच तुझे स्वप्न होते. आता आम्ही राजाला त्या स्वप्नाचा अर्थ सांगतो.
37. राजा तू सर्वांमध्ये मोठा राजा आहेस. स्वर्गातल्या देवाने तुला राज्य, सत्ता, सामर्थ्य व वैभव दिले आहे.
38. देवाने तुझ्याहाती नियंत्रण दिले आहे. म्हणून तू माणसे, हिंस्र प्राणी, पक्षी ह्यावर काबू ठेवतोस. ते जेथे कोठे असतील तेथे त्यांच्यावर देवाने तुझी सत्ता ठेवली आहे. नबुखद्नेस्सर राजा, तूच त्या पुतव्व्याचे सोन्याचे डोके आहेस.
39. तुझ्यानंतर येणारे राज्य म्हणजेच पुतव्व्याचा चांदीचा भाग, हे राज्य तुझ्या राज्याएवढे श्रेष्ठ नसेल. नंतर, तिसरे राज्य पृथ्वीवर सत्ता गाजवेल हा काशाचा भाग होय.
40. मग चौथे राज्य येईल ते लोखंडाप्रमाणे मजबुत असेल. ज्याप्रमाणे लोखंड वस्तूचे तुकडे करते, चुरा करते, त्याप्रमाणे ते इतर सर्व राज्यांचा चक्काचूर करील.
41. पुतव्व्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा बनलेला होता, असे तुला दिसले. ह्याचा अर्थ चौथ्या राज्यात भाग असतील. तू लोखंड मातीत मिसळलेले पाहिलेस. म्हणजेच त्या राज्याला थोडे लोखंडासारखे बळ असेल.
42. पुतव्व्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. म्हणजेच चौथे राज्य काही प्रमाणात लोखंडासारखे बळकट तर काही प्रमाणात मातीसारखे दुर्बळ, कच्चे असेल.
43. तू लोखंडात माती मिसळलेली पाहिलेस पण लोखंड व माती यांचे एकजीव मिश्रण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे चौथ्या राज्यात वेगवेगळे लोक असतील त्यांची एकी होणार नाही.
44. चौथ्या राजाच्या कारकिर्दीत, स्वर्गातला देव आणखी एक राज्य निर्माण करील. ते कायमचे राहील. त्याचा कधीही नाश होणार नाही. ते दुसऱ्या घराण्याकडे सोपविता येणार नाही. हे राज्य इतर राज्यांना चिरडून टाकील, त्यांचा शेवट करील पण ते राज्य सदासर्वकाळ टिकून राहील.
45. राजा तू पर्वेंतातून एक दगड छेदलेला पाहिलास. पण तो कोणा माणसाने छेदलेला नव्हता. त्या दगडाने लोखंड, मैंती, काशे चांदी सोने यांचा चुराडा केला. ह्यातून देवाने तुला भविष्यात घडणाऱ्या घटनाच दाखविल्या आहेत. स्वप्न खरे आहे व त्याच्या अर्थावरही तू विश्वास ठेऊ शकतोस.
46. मग नबुखद्नेस्सर राजाने दानीएलापुढे नमन केले. क्ष्याने दानीएलची स्तुती केली. दानीएलाच्या सन्मानार्थ त्याला भेट व धूप देण्याचा त्याने हुकूम दिला.
47. मग राजा दानीएलला म्हणाला,” तुझा देव अती महत्वाचा व सामर्थ्यशाली आहे, ह्याची मला खात्री पटली. तो परमेश्वरच राजांचा राजा आहे, तो लोकांना अज्ञात गोष्टी सांगतो, हे खरेच आहे म्हणून तू रहस्याचा उलगडा करून देऊ शकलास.
48. मग राजाने दानीएलला राज्यात महत्वाचे अधिकारपद दिले. त्याने त्याला बहुमोल भेटी दिल्या. राजांने बाबेलच्या परगण्याची सत्ता दानीएलकडे सोपविली. त्याने सर्व ज्ञानी माणसांचा प्रमुख म्हणून दानीएलची नेमणूक केली.
49. मग शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांची बाबेल परगण्याचे मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची विनंती दानीएलने राजाला केली व राजाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले. दानीएल स्वत: राजाचा महत्वाचा व जवळचा माणूस बनला.
Total 12 अध्याय, Selected धडा 2 / 12
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
1 नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षांत काही स्वप्ने पडली. त्या स्वप्नांमुळे तो काळजीत पडला व त्याची झोप उडाली. 2 म्हणून त्याने त्याच्या ज्ञानी माणसांना बोलावून घेतले. हे ज्ञानी स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आणि भविष्यात काय घडेल, हे सांगण्यासाठी मंत्र-तंत्र करीत व ताऱ्यांचे निरीक्षण करीत. ह्या लोकांनी राजाला काय स्वप्न पडले आहे, ते सांगावे, अशी राजाची इच्छा होती. मग ते लोक राजाच्या समोर येऊन उभे राहिले. 3 राजा त्यांना म्हणाला, मला पडलेल्या स्वप्नामुळे मी चिंतेत पडलो आहे. मला स्वप्नाचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. 4 मग खास्दी अरामी भाषेत राजाला म्हणाले, राजा, चिरंजीव हो! आम्ही तुझे सेवक आहोत. कृपा करून आम्हाला तुझे स्वप्न सांग, म्हणजे मग आम्ही तुला त्याचा अर्थ सागू. 5 तेव्हा नबुखद्नेस्सर राजा त्यांना म्हणाला, नाही! तुम्हीच मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. तुम्ही हे सांगितले नाही, तर तुमचे तुकडे करण्याचा हुकूम मी देईन. एवढेच नाही तर तुमच्या घरांची राखरांगोळी करीन. 6 पण तुम्ही मला माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितलात, तर मी तुम्हाला भेटी, बक्षिसे देईन. तुमचा सन्मान करीन. तेव्हा आता माझे स्वप्न व त्याचा अर्थ सांगा. 7 ते ज्ञानी लोक पुन्हा राजाला म्हणाले,”कृपा करून बस आम्हाला तुझे स्वप्न सांग म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” 8 मग नबुखद्नेस्सर उत्तरला, तुम्ही वेळ काढीत आहात, हे मला कळले आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कळला, असे मला वाटते. 9 तुम्ही मला माझे स्वप्न सांगितले नाहीत तर तुम्हाला शिक्षा होणार, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणून तुम्ही सर्व एक होऊन माझ्याशी खोटे बोलत आहात. तुम्ही वेळकाढूपणा करू पाहत आहात. मी तुम्हाला सांगितलेले विसरेन अशी आशा तुम्ही धरून आहात. पण आता आधी मला माझे स्वप्न सांगा. तुम्ही मला स्वप्न सांगू शकलात,तर तुम्ही त्याचा खूरा अर्थही सांगू शकाल हे मला पटेल. 10 खास्दी राजाला म्हणाले,”राजा, तू जे मागत आहेस, ते देऊ शकणारा एकही माणूस या पृथ्वीवर नाही. अजूनपर्यंत कोणत्याही राजाने, ज्ञानी वा मात्रिक अथवा खास्दी याच्याजवळ अशा प्रकारची मागणी केलेली नाही. अगदी मोठ्या व सामर्थ्यवान राजांनीसुध्दा ज्ञानी माणसांकडे असे काही, कधीही मागितलेले नाही. 11 राजा, अशक्य गोष्ट करण्यास सांगत आहे. फक्त दैवतंच राजाला त्याचे स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकतात. पण दैवत माणसांमध्ये राहात नाहीत. 12 हे बोलणे ऐकून राजाचा पारा चढला. मग त्याने बाबेलमधील सर्व ज्ञानी माणसांना ठार करण्याचा हुकूम दिला. 13 राजाच्या हुकूमाची दवंडी पिटविण्यात आली. सर्व ज्ञानी माणसे ठार केली जाणार होती. राजाचे लोक दानीएलला व त्याच्या मित्रांना ठार मारण्यासाठी त्यांचा तपास करण्यासाठी गेले. 14 अर्योक शिपायांचा म्होरक्या होता. तोच बाबेलमधील ज्ञानी माणसांना ठार मारणार होता. पण दानीएल त्याच्याशी चातुर्याने व विनयाने बोलला. 15 दानीएल अर्योकला म्हणाला राजाने अशी कडक शिक्षा का ठोठावली”? मग अर्योकने राजाच्या स्वप्नाची सर्व हकिगत वर्णन केली. मग दानीएलला सर्व समजले. 16 सर्व हकिगत समजताच दानीएल नबुखद्नेस्सर राजाकडे गेला व त्याने राजाजवळ थोडा वेळ मागितला. मग तो राजाला त्याचे स्वप्न व त्या स्वप्नाचा अर्थ सांगणार होता. 17 मग दानीएल त्याच्या घरी गेला. हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्या आपल्या मित्रांना त्याने सर्व हकिगत सांगितली. 18 दानीएलाने आपल्या मित्रांना स्वर्गातील देवाची प्रार्थना करण्यास सांगितले. दानीएलने त्यांना प्रार्थना करण्यास सांगितले कारण त्यामुळे देव त्यांच्यावर कृपा करील व हे रहस्य समजण्यास मदत करील. मग तो व त्याचे मित्र, बाबेलच्या इतर ज्ञानी माणसाबरोबर मारले जाणार नाहीत, असे त्याला वाटले. 19 रात्री, देवाने दानीएलला दृष्टान्त देऊन सर्व रहस्य उलगडून सांगितले. मग दानीएलने स्वर्गातील देवाचे स्तुतिस्तोत्र गायले. तो म्हणाला, 20 “सदासर्वकाळ देवाच्या नावाची स्तुती करा. सामर्थ्य व ज्ञान त्याच्यापाशीच आहे. 21 तो काळ आणि ऋ तू बदलतो. आणि राजेही बदलतो. तोच राजांना सत्ता देतो. आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो. लोकांनी शहाणे व्हावे म्हणून तो त्यांना शहाणपण देतो, त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून तो त्यांना सर्व गोष्टी शिकू देतो. 22 समजण्यास अतिशय कठीण असलेली, गुप्त रहस्ये त्याला माहीत असतात. प्रकाश त्याच्याबरोबर असल्यामुळे, अंधारात आणि गुप्त जागी काय आहे ते त्याला कळते. 23 माझ्या पूर्वजांच्या देवा, मी कृतज्ञ आहे, मी तुझी स्तुती करतो. तू मला ज्ञान व शक्ती दिलीस. मी विचारलेल्या गोष्टी सांगितल्यास. तूच मला राजाच्या स्वप्नाबद्दल सांगितलेस.” 24 मग दानीएल अर्योककडे गेला. नबुखद्नेस्सर राजाने.बाबेलमधील ज्ञानी माणसांना ठार मारण्याच्या काम अर्योकचीच निवड केली होती. दानीएल त्याला म्हणाला, बाबेलमधील ज्ञानी माणसांना मारू नको. मला राजाकडे घेऊन चल! मी राजाला, त्याचे स्वप्न व त्याचा अर्थ, सांगीन. 25 मग अर्योकने ताबडतोब दानीएलला राजाकडे नेले. अर्योक राजाला म्हणाला, महाराजांना त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकणारा एकजण मला यहूदातील कैद्यां मध्ये सापडला आहे. 26 राजाने दानीएलला (बेलशटस्सरला) प्रश्न केला, तू मला माझे स्वप्न व त्याचा अर्थ सागू शक तोस का? 27 दानीएलने उत्तर दिले राजा, नबुखद्नेस्सर, तू विचारलेली गुप्त गोष्ट ज्ञानी किवा मांत्रिक अथवा खास्दी कोणीच सांगू शकणार नाही. 28 पण अशा रहस्यमय गोष्टी स्वर्गातील देवच सांगतो. पुढे काय घडणार हे दाखविण्यासाठीच नबुखद्नेस्सर राजाला देवाने स्वप्नात पाडले. तू झोपला असताना पुढील गोष्टी स्वप्नात पाहिल्यास.
29 राजा, तू तुझ्या शय्येवर झोपला होतास. मग तू भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबंद्दल विचार करायला लागलास. देव लोकांना रहस्ये सांगू शकतो त्याने तुला भविष्यात काय घडणार ते दाखविले.
30 देवाने मलाही ते रहस्य सांगितले. का? मी इतरांपेक्षा ज्ञानी आहे म्हणून नव्हे, तर तुला त्याचा अर्थ कळावा आणि तुझ्या मनात काय विचार येऊन गेले ते तुला समजावे, म्हणूनच देवाने मला हे रहस्य सांगितले. 31 राजा, तू स्वप्नात तुझ्यासमोर एक प्रचंड, चकचकीत, मनावर छाप पाडणारा पुतळा पाहिलास. त्याच्याकडे बघताच कोणाचेही डोळे आश्चर्याने विस्फारावे असा तो होता. 32 (32-33) पुतव्व्याचे डोके शुध्द सोन्याचे होते. छाती आणि हात चांदीचे होते पोट व वरील पायाच्या बाकीचा भाग काशाचा होता. खालील पायाचा भाग लोखंडाचा होता. ह्या पुतव्व्याची पावले लोखंड व माती यांची होती. 33 34 तू पुतव्व्याकडे बघत असतानाच एक कापलेला दगड तुला दिसला. तो दगड कोणा माणसाने छेदलेला नव्हता. मग तो दगड (हवेतून गेला) आणि पुतव्व्याच्या लोखंड व माती यांनी बनेलेल्या पायावर आदळला.त्याने पावलांचा चक्काचूर केला. 35 त्यानंतर एकदमचलोखंड माती, काशे, चांदी, सोने ह्यांचा चुरा झाला तो चुरा उन्हाळ्यातील खळ्यातील फोलकटाप्रमाणे वाऱ्याने दूरवर उडवला गेला. मागे काहीच उरले नाही. तेथे पुतळा होता हे कोणलाही खरे वाटले नसते. मग पुतव्व्यावर आदळणाऱ्या दगडाचा मोठा पर्वत झाला व त्याने सर्व पृथ्वी व्यापली. 36 हेच तुझे स्वप्न होते. आता आम्ही राजाला त्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. 37 राजा तू सर्वांमध्ये मोठा राजा आहेस. स्वर्गातल्या देवाने तुला राज्य, सत्ता, सामर्थ्य व वैभव दिले आहे. 38 देवाने तुझ्याहाती नियंत्रण दिले आहे. म्हणून तू माणसे, हिंस्र प्राणी, पक्षी ह्यावर काबू ठेवतोस. ते जेथे कोठे असतील तेथे त्यांच्यावर देवाने तुझी सत्ता ठेवली आहे. नबुखद्नेस्सर राजा, तूच त्या पुतव्व्याचे सोन्याचे डोके आहेस. 39 तुझ्यानंतर येणारे राज्य म्हणजेच पुतव्व्याचा चांदीचा भाग, हे राज्य तुझ्या राज्याएवढे श्रेष्ठ नसेल. नंतर, तिसरे राज्य पृथ्वीवर सत्ता गाजवेल हा काशाचा भाग होय. 40 मग चौथे राज्य येईल ते लोखंडाप्रमाणे मजबुत असेल. ज्याप्रमाणे लोखंड वस्तूचे तुकडे करते, चुरा करते, त्याप्रमाणे ते इतर सर्व राज्यांचा चक्काचूर करील. 41 पुतव्व्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा बनलेला होता, असे तुला दिसले. ह्याचा अर्थ चौथ्या राज्यात भाग असतील. तू लोखंड मातीत मिसळलेले पाहिलेस. म्हणजेच त्या राज्याला थोडे लोखंडासारखे बळ असेल. 42 पुतव्व्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. म्हणजेच चौथे राज्य काही प्रमाणात लोखंडासारखे बळकट तर काही प्रमाणात मातीसारखे दुर्बळ, कच्चे असेल. 43 तू लोखंडात माती मिसळलेली पाहिलेस पण लोखंड व माती यांचे एकजीव मिश्रण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे चौथ्या राज्यात वेगवेगळे लोक असतील त्यांची एकी होणार नाही. 44 चौथ्या राजाच्या कारकिर्दीत, स्वर्गातला देव आणखी एक राज्य निर्माण करील. ते कायमचे राहील. त्याचा कधीही नाश होणार नाही. ते दुसऱ्या घराण्याकडे सोपविता येणार नाही. हे राज्य इतर राज्यांना चिरडून टाकील, त्यांचा शेवट करील पण ते राज्य सदासर्वकाळ टिकून राहील. 45 राजा तू पर्वेंतातून एक दगड छेदलेला पाहिलास. पण तो कोणा माणसाने छेदलेला नव्हता. त्या दगडाने लोखंड, मैंती, काशे चांदी सोने यांचा चुराडा केला. ह्यातून देवाने तुला भविष्यात घडणाऱ्या घटनाच दाखविल्या आहेत. स्वप्न खरे आहे व त्याच्या अर्थावरही तू विश्वास ठेऊ शकतोस. 46 मग नबुखद्नेस्सर राजाने दानीएलापुढे नमन केले. क्ष्याने दानीएलची स्तुती केली. दानीएलाच्या सन्मानार्थ त्याला भेट व धूप देण्याचा त्याने हुकूम दिला. 47 मग राजा दानीएलला म्हणाला,” तुझा देव अती महत्वाचा व सामर्थ्यशाली आहे, ह्याची मला खात्री पटली. तो परमेश्वरच राजांचा राजा आहे, तो लोकांना अज्ञात गोष्टी सांगतो, हे खरेच आहे म्हणून तू रहस्याचा उलगडा करून देऊ शकलास. 48 मग राजाने दानीएलला राज्यात महत्वाचे अधिकारपद दिले. त्याने त्याला बहुमोल भेटी दिल्या. राजांने बाबेलच्या परगण्याची सत्ता दानीएलकडे सोपविली. त्याने सर्व ज्ञानी माणसांचा प्रमुख म्हणून दानीएलची नेमणूक केली. 49 मग शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांची बाबेल परगण्याचे मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची विनंती दानीएलने राजाला केली व राजाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले. दानीएल स्वत: राजाचा महत्वाचा व जवळचा माणूस बनला.
Total 12 अध्याय, Selected धडा 2 / 12
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
×

Alert

×

Marathi Letters Keypad References