मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यशया
1. परमेश्वर म्हणतो, “याकोबाच्या वंशजांनो, माझे ऐका. तुम्ही, जे ‘इस्राएलच्या’ नावाने ओळखले जाता. तुम्ही यहुदाच्या वंशातील आहात. तुम्ही वचने देताना परमेश्वराचे नाव घेता. तुम्ही इस्राएलच्या देवाची स्तुती करता. पण हे तुम्ही सच्चे पणाने आणि खरेपणाने करीत नाही.”
2. हो ते पवित्र नगराचे नागरिक आहेत. ते इस्राएलच्या देवावर अवलंबून राहतात. सर्वशक्तिमान परमेश्वर अशी त्याची ख्याती आहे.
3. “मी तुम्हाला फार पूर्वीच भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दल सांगितले. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगितले आणि अचानक त्या गोष्टी घडवून आणल्या
4. मी तसे केले, कारण तुम्ही हट्टी होतात व ते मला माहीत होते. मी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तुम्ही नकार दिलात. जस्ताप्रमाणे कठीण आणि लोखंडाप्रमाणे न वाकणारा असा तुमचा हट्ट होता.
5. म्हणूनच गोष्टी घडायच्या कितीतरी आधी मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगितले, असे सांगण्याचे कारण हेच की आम्ही आमच्या सामर्थ्यावर हे सर्व केले असे तुम्ही म्हणू नये. ‘आमच्या मूर्तीनी हे सर्व घडवून आणले’ असे तुम्ही म्हणू नये म्हणून मी हे केले.”
6. “तुम्ही काय घडले ते पाहिलेत व ऐकलेत. म्हणून तुम्ही ही वार्ता इतरांना सांगावी. आता मी तुम्हांला माहीत नसलेल्या नवीन गोष्टी सांगीन.
7. ह्या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत. ह्या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत. या आधी तुम्ही कधी या गोष्टींबद्दल ऐकले नसेल. त्यामुळे ‘आम्हांला हे अगोदरच माहीत होते’ असे तुम्ही म्हणू शकणार नाही.
8. “पण जरी मी तुम्हाला भविष्यात घडणार आहे हे सांगितले तरी ते ऐकून घ्यायला तुम्ही अजूनही नकार द्याल. तुम्ही काहीही शिकणार नाही. मी सांगितलेली कोणतीही गोष्ट तुम्ही केव्हाही ऐकली नाही. तुम्ही माझ्याविरूध्द जाल हे मला सुरवातीपासूनच माहीत होते. तुम्ही जन्मल्यापासून माझ्याविरूध्द बंड पुकारले आहे.
9. पण मी सहन करीन. हे मी माझ्यासाठी करीन. तुमच्यावर रागावून तुमचा नाश करीत नाही म्हणून लोक माझी स्तुती करतील. मी केलेल्या प्रतीक्षेबद्दल तुम्ही माझे स्तवन कराल.
10. “पाहा! मी तुम्हांला शुध्द करीन. लोक चांदी शुध्द करण्यासाठी गरम भट्टीचा उपयोग करतात. मी तुम्हांला संकटात टाकून शुध्द करीन.
11. हे मी माझ्यासाठी करीन. मला कमी लेखून तुम्हांला चालणार नाही. माझे वैभव आणि प्रशंसा मी खोट्या देवांच्या वाट्याला जाऊ देणार नाही. माझे नाव मी दूषित का होऊ द्यावे?
12. “याकोबा, माझे ऐक, इस्राएल, मी तुला माझे होण्यासाठी बोलाविले, तेव्हा माझे ऐक. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे.
13. मी माझ्या हाताने पृथ्वी निर्माण केली. माझ्या उजव्या हाताने आकाश निर्माण केले आणि मी जर त्यांना हाक मारली तर ती माझ्यासमोर गोळा होतील.
14. “तुम्ही सगळे इकडे या आणि माझे ऐका. कोणत्याही खोट्या देवाने असे कसे होईल म्हणून तुम्हाला सांगितले का? नाही.” देव इस्राएलवर प्रेम करतो बाबेलबाबत आणि खास्द्यांबाबत देव त्याला पाहिजे ते करील.
15. परमेश्वर म्हणतो, “मी त्याला बोलवीन, असे मी तुम्हाला सांगितले आहे, मी त्याला आणीन आणि मी त्याला यशस्वी करीन.
16. इकडे या आणि माझे ऐका. बाबेल राष्ट्र म्हणून जगायला लागले तेव्हा मी तेथे होतो आणि आरंभापासून मी स्पष्टपणे बोललो का तर लोकांना मी काय म्हणालो ते समजावे.”नंतर यशया म्हणाला, “आता परमेश्वर माझा देव, मला आणि त्याच्या आत्म्याला पुढील गोष्टी सांगायला तुमच्याकडे पाठवितो.
17. मी परमेश्वर तुमचा तारणारा, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो,“मीच परमेश्वर तुमचा देव आहे. मी तुम्हाला सत्कृत्ये करायला शिकवितो. तुम्ही कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मी मार्गदर्शन करतो.
18. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर पूर्ण भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे शांती तुमच्याकडे आली असती, समुद्राच्या परत परत येणाऱ्या लाटांप्रमाणे चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा तुमच्याकडे आल्या असत्या.
19. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर वाळूच्या कणांप्रमाणे खूप संतती तुम्हाला झाली असती आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते.
20. माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खास्दयापांसून पळा, ही वार्ता लोकांना आनंदाने सांगा. जगातील दूरदूरच्या ठिकाणी ही बातमी पोहोचवा. लोकांना सांगा, “परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याची सुटका केली.
21. परमेश्वराने त्याच्या लोकांना वाळवंटातून पार नेले पण ते तहानेलेले राहिले नाहीत का? कारण देवाने आपल्या माणसांसाठी खडकातून पाणी वाहायला लावले. त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले.”
22. पण परमेश्वर म्हणतो, “पाप्यांना शांती मिळणार नाही.”

Notes

No Verse Added

Total 66 अध्याय, Selected धडा 48 / 66
यशया 48:22
1 परमेश्वर म्हणतो, “याकोबाच्या वंशजांनो, माझे ऐका. तुम्ही, जे ‘इस्राएलच्या’ नावाने ओळखले जाता. तुम्ही यहुदाच्या वंशातील आहात. तुम्ही वचने देताना परमेश्वराचे नाव घेता. तुम्ही इस्राएलच्या देवाची स्तुती करता. पण हे तुम्ही सच्चे पणाने आणि खरेपणाने करीत नाही.” 2 हो ते पवित्र नगराचे नागरिक आहेत. ते इस्राएलच्या देवावर अवलंबून राहतात. सर्वशक्तिमान परमेश्वर अशी त्याची ख्याती आहे. 3 “मी तुम्हाला फार पूर्वीच भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दल सांगितले. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगितले आणि अचानक त्या गोष्टी घडवून आणल्या 4 मी तसे केले, कारण तुम्ही हट्टी होतात व ते मला माहीत होते. मी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तुम्ही नकार दिलात. जस्ताप्रमाणे कठीण आणि लोखंडाप्रमाणे न वाकणारा असा तुमचा हट्ट होता. 5 म्हणूनच गोष्टी घडायच्या कितीतरी आधी मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगितले, असे सांगण्याचे कारण हेच की आम्ही आमच्या सामर्थ्यावर हे सर्व केले असे तुम्ही म्हणू नये. ‘आमच्या मूर्तीनी हे सर्व घडवून आणले’ असे तुम्ही म्हणू नये म्हणून मी हे केले.” 6 “तुम्ही काय घडले ते पाहिलेत व ऐकलेत. म्हणून तुम्ही ही वार्ता इतरांना सांगावी. आता मी तुम्हांला माहीत नसलेल्या नवीन गोष्टी सांगीन. 7 ह्या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत. ह्या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत. या आधी तुम्ही कधी या गोष्टींबद्दल ऐकले नसेल. त्यामुळे ‘आम्हांला हे अगोदरच माहीत होते’ असे तुम्ही म्हणू शकणार नाही. 8 “पण जरी मी तुम्हाला भविष्यात घडणार आहे हे सांगितले तरी ते ऐकून घ्यायला तुम्ही अजूनही नकार द्याल. तुम्ही काहीही शिकणार नाही. मी सांगितलेली कोणतीही गोष्ट तुम्ही केव्हाही ऐकली नाही. तुम्ही माझ्याविरूध्द जाल हे मला सुरवातीपासूनच माहीत होते. तुम्ही जन्मल्यापासून माझ्याविरूध्द बंड पुकारले आहे. 9 पण मी सहन करीन. हे मी माझ्यासाठी करीन. तुमच्यावर रागावून तुमचा नाश करीत नाही म्हणून लोक माझी स्तुती करतील. मी केलेल्या प्रतीक्षेबद्दल तुम्ही माझे स्तवन कराल. 10 “पाहा! मी तुम्हांला शुध्द करीन. लोक चांदी शुध्द करण्यासाठी गरम भट्टीचा उपयोग करतात. मी तुम्हांला संकटात टाकून शुध्द करीन. 11 हे मी माझ्यासाठी करीन. मला कमी लेखून तुम्हांला चालणार नाही. माझे वैभव आणि प्रशंसा मी खोट्या देवांच्या वाट्याला जाऊ देणार नाही. माझे नाव मी दूषित का होऊ द्यावे? 12 “याकोबा, माझे ऐक, इस्राएल, मी तुला माझे होण्यासाठी बोलाविले, तेव्हा माझे ऐक. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे. 13 मी माझ्या हाताने पृथ्वी निर्माण केली. माझ्या उजव्या हाताने आकाश निर्माण केले आणि मी जर त्यांना हाक मारली तर ती माझ्यासमोर गोळा होतील. 14 “तुम्ही सगळे इकडे या आणि माझे ऐका. कोणत्याही खोट्या देवाने असे कसे होईल म्हणून तुम्हाला सांगितले का? नाही.” देव इस्राएलवर प्रेम करतो बाबेलबाबत आणि खास्द्यांबाबत देव त्याला पाहिजे ते करील. 15 परमेश्वर म्हणतो, “मी त्याला बोलवीन, असे मी तुम्हाला सांगितले आहे, मी त्याला आणीन आणि मी त्याला यशस्वी करीन. 16 इकडे या आणि माझे ऐका. बाबेल राष्ट्र म्हणून जगायला लागले तेव्हा मी तेथे होतो आणि आरंभापासून मी स्पष्टपणे बोललो का तर लोकांना मी काय म्हणालो ते समजावे.”नंतर यशया म्हणाला, “आता परमेश्वर माझा देव, मला आणि त्याच्या आत्म्याला पुढील गोष्टी सांगायला तुमच्याकडे पाठवितो. 17 मी परमेश्वर तुमचा तारणारा, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो,“मीच परमेश्वर तुमचा देव आहे. मी तुम्हाला सत्कृत्ये करायला शिकवितो. तुम्ही कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मी मार्गदर्शन करतो. 18 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर पूर्ण भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे शांती तुमच्याकडे आली असती, समुद्राच्या परत परत येणाऱ्या लाटांप्रमाणे चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा तुमच्याकडे आल्या असत्या. 19 तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर वाळूच्या कणांप्रमाणे खूप संतती तुम्हाला झाली असती आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते. 20 माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खास्दयापांसून पळा, ही वार्ता लोकांना आनंदाने सांगा. जगातील दूरदूरच्या ठिकाणी ही बातमी पोहोचवा. लोकांना सांगा, “परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याची सुटका केली. 21 परमेश्वराने त्याच्या लोकांना वाळवंटातून पार नेले पण ते तहानेलेले राहिले नाहीत का? कारण देवाने आपल्या माणसांसाठी खडकातून पाणी वाहायला लावले. त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले.” 22 पण परमेश्वर म्हणतो, “पाप्यांना शांती मिळणार नाही.”
Total 66 अध्याय, Selected धडा 48 / 66
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References