मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
1 थेस्सलनीकाकरांस
1. बंधूंनो, तुमचे तुम्हांलाच माहीत आहे की, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही.
2. पण तुम्हाला माहीत आहे की, आम्हांला मागे फिलिप्पै येथे त्रास आणि अपमान सहन करावा लागला. पण देवाच्या साहाय्याने मोठा विरोध झाला असताना देवाकडून येणारी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हांला धैर्य प्राप्त झाले.
3. खरोखर आमची घोषणा आमच्याकडून झालेल्या चुकांमुळे किंवा अशुद्ध हेतूने किंवा भ्रमाने येत नाही.
4. उलट, ज्याप्रमाणे देवाने पसंत केलेले, सुवार्तेचे कार्य सोपविलेले असे आम्ही आहोत म्हणून आम्ही बोलतो. आम्ही मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी नाही, तर देवाला, जो आमच्या उद्दिष्टांची परीक्षा घेतो
5. खरोखर, तुम्हांला माहीत आहे की, आम्ही तुमच्यासमोर खुशामत करणाऱ्या शब्दांनी बोललो नाही, किंवा आमचे उपदेश करणे हे आमचा लोभ झाकण्याचे खोटे कारण नव्हते, कारण देव आमचा साक्षी आहे!
6. किंवा आम्ही लोकांकडून, तुमच्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून सन्मान मिळावा म्हणून अपेक्षा करीत नव्हतो. ख्रिस्ताचे प्रेषित या नात्याने, जरी आम्हांला आमचा अधिकार तुमच्यावर दाखविता आला असता.
7. तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वत:चे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो.
8. कारण आम्हाला तुमच्याविषयी इतके प्रेम वाटले की, आम्ही तुमच्याबरोबर देवाकडून येणारी सुवार्ताच नव्हे तर आमचे स्वत:चे जीवनसुद्धा देण्यास तयार होतो. याचे कारण म्हणजे, तुम्ही आमच्यासाठी प्रिय झाला होता.
9. बंधूंनो, आम्ही देवाकडून आलेली सुवार्ता सांगत असताना, तुम्हाला आठवत असेल की आम्ही रात्रंदिवस किती कष्ट केले. आमचे कष्ट आणि श्रम तुम्ही जाणता ते यासाठी केले की, तुम्ही कोणावरही भार पडू नये.
10. तुम्ही साक्षी आहात आणि देवसुद्धा साक्षी आहे की, आम्ही किती धार्मिकतेने, न्यायाने आणि निर्दोष रीतीने तुम्हा विश्वासणाऱ्यांंबरोबर वागलो.
11. आणि तुम्हाला हे चांगले माहीत आहे की, जसा पिता आपल्या मुलांना वागवितो तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकाला वागविले आहे.
12. अशा प्रकारे आम्ही तुम्हांला उत्तेजन दिले, सांत्वन केले. आणि तुम्हांला साक्ष दिली की, देवाला आवडेल अशा प्रकारे वागा. जो त्याच्यात व गौरवात तुम्हाला बोलावितो.
13. आणि, या कारणासाठी आम्हीसुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला, तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही, तर देवापासून आलेला जसा खरा होता तसाच स्वीकारला. देवाचा संदेश, जो तुम्हा विश्वास णाऱ्यांच्यामध्ये सुद्धा कार्य करीत आहे.
14. कारण बंधूनो, तुम्ही येशूमध्ये देवाच्या ज्या मंडळ्या यहूदीयात आहेत त्याचे अनुकरण करणारे झाला आहात, कारण त्यांनी यहूद्यांच्या हातून जसे दु:ख सोसल, तसेच तुम्ही तुमच्या देशबांधवांकडून दु:ख सोसले.
15. त्यांनी प्रभु येशूला आणि संदेष्ट्यांना मारले, त्यांनी आम्हांला बाहेर हाकलून लावले, ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत.
16. यहूदीतर लोकांचे तारण होण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायला हवे, परंतु ते आम्हांला मना करुन एक प्रकगरे पापच करीत आहेत. ते या पापाद्वारे जे ते नेहमी करीत आले आहेत आपल्या पापाचे माप भरत आले आहेत. आणि आता शेवटी आणि पूर्णतेने देवाचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे.
17. बंधूंनो, आमच्यासाठी, आम्ही तुमच्यापासून थोड्या वेळासाठी वेगळे झालो होतो. आम्ही शरीराने वेगळे झालो होतो, विचाराने नाही आणि आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी फार अधीर झालो होतो. आणि तुम्हांला भेटण्याची फार इच्छा होती.
18. होय, तुमची भेट घेण्याचा खरोखर आम्ही प्रयत्न केला होता. खरोखर मी पौलाने एकदा दोनदा प्रयत्न केला परंतु सैतानाने असे करण्यापासून आम्हाला परावृत केले.
19. शेवटी, जेव्हा आपला प्रभु येशू दुसऱ्यांदा येईल, तेव्हा त्याच्यासमोर उभे राहू तेव्हा आमची आशा, किंवा आनंद किंवा मुकुट काय असेल, ज्याचा आम्हांला अभिमान वाटेल? ते तुम्हीच नाही का?
20. होय, तुम्ही आमचा गौरव व आनंद आहात!
Total 5 अध्याय, Selected धडा 2 / 5
1 2 3 4 5
1 बंधूंनो, तुमचे तुम्हांलाच माहीत आहे की, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही. 2 पण तुम्हाला माहीत आहे की, आम्हांला मागे फिलिप्पै येथे त्रास आणि अपमान सहन करावा लागला. पण देवाच्या साहाय्याने मोठा विरोध झाला असताना देवाकडून येणारी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हांला धैर्य प्राप्त झाले. 3 खरोखर आमची घोषणा आमच्याकडून झालेल्या चुकांमुळे किंवा अशुद्ध हेतूने किंवा भ्रमाने येत नाही. 4 उलट, ज्याप्रमाणे देवाने पसंत केलेले, सुवार्तेचे कार्य सोपविलेले असे आम्ही आहोत म्हणून आम्ही बोलतो. आम्ही मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी नाही, तर देवाला, जो आमच्या उद्दिष्टांची परीक्षा घेतो 5 खरोखर, तुम्हांला माहीत आहे की, आम्ही तुमच्यासमोर खुशामत करणाऱ्या शब्दांनी बोललो नाही, किंवा आमचे उपदेश करणे हे आमचा लोभ झाकण्याचे खोटे कारण नव्हते, कारण देव आमचा साक्षी आहे! 6 किंवा आम्ही लोकांकडून, तुमच्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून सन्मान मिळावा म्हणून अपेक्षा करीत नव्हतो. ख्रिस्ताचे प्रेषित या नात्याने, जरी आम्हांला आमचा अधिकार तुमच्यावर दाखविता आला असता. 7 तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वत:चे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो. 8 कारण आम्हाला तुमच्याविषयी इतके प्रेम वाटले की, आम्ही तुमच्याबरोबर देवाकडून येणारी सुवार्ताच नव्हे तर आमचे स्वत:चे जीवनसुद्धा देण्यास तयार होतो. याचे कारण म्हणजे, तुम्ही आमच्यासाठी प्रिय झाला होता. 9 बंधूंनो, आम्ही देवाकडून आलेली सुवार्ता सांगत असताना, तुम्हाला आठवत असेल की आम्ही रात्रंदिवस किती कष्ट केले. आमचे कष्ट आणि श्रम तुम्ही जाणता ते यासाठी केले की, तुम्ही कोणावरही भार पडू नये. 10 तुम्ही साक्षी आहात आणि देवसुद्धा साक्षी आहे की, आम्ही किती धार्मिकतेने, न्यायाने आणि निर्दोष रीतीने तुम्हा विश्वासणाऱ्यांंबरोबर वागलो. 11 आणि तुम्हाला हे चांगले माहीत आहे की, जसा पिता आपल्या मुलांना वागवितो तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकाला वागविले आहे. 12 अशा प्रकारे आम्ही तुम्हांला उत्तेजन दिले, सांत्वन केले. आणि तुम्हांला साक्ष दिली की, देवाला आवडेल अशा प्रकारे वागा. जो त्याच्यात व गौरवात तुम्हाला बोलावितो. 13 आणि, या कारणासाठी आम्हीसुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला, तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही, तर देवापासून आलेला जसा खरा होता तसाच स्वीकारला. देवाचा संदेश, जो तुम्हा विश्वास णाऱ्यांच्यामध्ये सुद्धा कार्य करीत आहे. 14 कारण बंधूनो, तुम्ही येशूमध्ये देवाच्या ज्या मंडळ्या यहूदीयात आहेत त्याचे अनुकरण करणारे झाला आहात, कारण त्यांनी यहूद्यांच्या हातून जसे दु:ख सोसल, तसेच तुम्ही तुमच्या देशबांधवांकडून दु:ख सोसले. 15 त्यांनी प्रभु येशूला आणि संदेष्ट्यांना मारले, त्यांनी आम्हांला बाहेर हाकलून लावले, ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत. 16 यहूदीतर लोकांचे तारण होण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायला हवे, परंतु ते आम्हांला मना करुन एक प्रकगरे पापच करीत आहेत. ते या पापाद्वारे जे ते नेहमी करीत आले आहेत आपल्या पापाचे माप भरत आले आहेत. आणि आता शेवटी आणि पूर्णतेने देवाचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे. 17 बंधूंनो, आमच्यासाठी, आम्ही तुमच्यापासून थोड्या वेळासाठी वेगळे झालो होतो. आम्ही शरीराने वेगळे झालो होतो, विचाराने नाही आणि आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी फार अधीर झालो होतो. आणि तुम्हांला भेटण्याची फार इच्छा होती. 18 होय, तुमची भेट घेण्याचा खरोखर आम्ही प्रयत्न केला होता. खरोखर मी पौलाने एकदा दोनदा प्रयत्न केला परंतु सैतानाने असे करण्यापासून आम्हाला परावृत केले. 19 शेवटी, जेव्हा आपला प्रभु येशू दुसऱ्यांदा येईल, तेव्हा त्याच्यासमोर उभे राहू तेव्हा आमची आशा, किंवा आनंद किंवा मुकुट काय असेल, ज्याचा आम्हांला अभिमान वाटेल? ते तुम्हीच नाही का? 20 होय, तुम्ही आमचा गौरव व आनंद आहात!
Total 5 अध्याय, Selected धडा 2 / 5
1 2 3 4 5
×

Alert

×

Marathi Letters Keypad References