मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली. त्याने माझे ओरडणे ऐकले.
2. परमेश्वराने मला विनाशाच्याखड्यातून उचलले. त्याने मला चिखलातून बाहेर काढले. त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले, त्याने माझे पाय स्थिर केले.
3. परमेश्वराने माझ्या मुखात नवीन गाणे घातले. माझ्या देवाच्या स्तुतीचे गाणे. बरेच लोक माझ्या बाबतीत घडलेल्या घटना बघतील. ते देवाची उपासना करतील, ते देवावर विश्वास ठेवतील.
4. जर एखाद्याचा परमेश्वरावर विश्वास असला तर तो माणूस खरोखरच सुखी होईल. जर तो राक्षसांकडे आणि चुकीच्या देवाकडे वळला नाहीतर तो खरोखरच सुखी होईल.
5. परमेश्वरा, देवा तू खरोखरच आश्र्चर्यजनक गोष्टी केल्या आहेस तू आमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखल्या आहेस. परमेश्वरा, तुझ्यासारखा कुणीही नाही. तू केलेल्या गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगत राहीन, मोजण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत.
6. परमेश्वरा, हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस.तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात. होमार्पणे किंवा पापार्पणे तुला नको असतात.
7. म्हणून मी म्हणालो “बघ, मी येत आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले होते.
8. माझ्या देवा, तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे मी तुझी शिकवण अभ्यासली आहे.
9. मी विजयाची चांगली बातमी मोठ्यासभेत सांगितली. मी माझे तोंड बंद ठेवले नाही. परमेश्वरा, तुला ते माहीत आहे.
10. परमेश्वरा, मी तुझ्या चांगुलपणाबद्दल सांगितले. मी त्या गोष्टी मनात लपवून ठेवल्या नाही. परमेश्वरा, मी लोकांना सांगितले की ते रक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. मी तुझा दयाळूपणा आणि तुझी निष्ठा सभेतल्या लोकांपासून लपवून ठेवली नाही.
11. म्हणून परमेश्वरा तुझी करुणा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. तुझा दयाळूपणा आणि निष्ठा माझे सतत रक्षण करो.”
12. माझ्याभोवती दुष्टांची गर्दी झाली आहे ते मोजण्या न येण्याइतके आहेत. माझ्या पापांनी माझी कोंडी केली आहे. आणि मी त्यांपासून पळू शकत नाही. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा माझी पापे जास्त आहेत. माझे धैर्य नाहीसे झाले आहे.
13. परमेश्वरा, माझ्याकडे धाव घे आणि मला वाचव. परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर.
14. ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर आणि त्यांची निराशा कर. ते लोक मला दु:ख देणार आहेत. त्यांना शरमेने पळून जायला लाव.
15. ते वाईट लोक माझी थट्टा करतात. त्यांना गोंधळायला लावून बोलता येणार नाही असे कर.
16. परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे. त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते.
17. प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.
Total 150 अध्याय, Selected धडा 40 / 150
1 मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली. त्याने माझे ओरडणे ऐकले. 2 परमेश्वराने मला विनाशाच्याखड्यातून उचलले. त्याने मला चिखलातून बाहेर काढले. त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले, त्याने माझे पाय स्थिर केले. 3 परमेश्वराने माझ्या मुखात नवीन गाणे घातले. माझ्या देवाच्या स्तुतीचे गाणे. बरेच लोक माझ्या बाबतीत घडलेल्या घटना बघतील. ते देवाची उपासना करतील, ते देवावर विश्वास ठेवतील. 4 जर एखाद्याचा परमेश्वरावर विश्वास असला तर तो माणूस खरोखरच सुखी होईल. जर तो राक्षसांकडे आणि चुकीच्या देवाकडे वळला नाहीतर तो खरोखरच सुखी होईल. 5 परमेश्वरा, देवा तू खरोखरच आश्र्चर्यजनक गोष्टी केल्या आहेस तू आमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखल्या आहेस. परमेश्वरा, तुझ्यासारखा कुणीही नाही. तू केलेल्या गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगत राहीन, मोजण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत. 6 परमेश्वरा, हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस.तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात. होमार्पणे किंवा पापार्पणे तुला नको असतात. 7 म्हणून मी म्हणालो “बघ, मी येत आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले होते. 8 माझ्या देवा, तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे मी तुझी शिकवण अभ्यासली आहे. 9 मी विजयाची चांगली बातमी मोठ्यासभेत सांगितली. मी माझे तोंड बंद ठेवले नाही. परमेश्वरा, तुला ते माहीत आहे. 10 परमेश्वरा, मी तुझ्या चांगुलपणाबद्दल सांगितले. मी त्या गोष्टी मनात लपवून ठेवल्या नाही. परमेश्वरा, मी लोकांना सांगितले की ते रक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. मी तुझा दयाळूपणा आणि तुझी निष्ठा सभेतल्या लोकांपासून लपवून ठेवली नाही. 11 म्हणून परमेश्वरा तुझी करुणा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. तुझा दयाळूपणा आणि निष्ठा माझे सतत रक्षण करो.” 12 माझ्याभोवती दुष्टांची गर्दी झाली आहे ते मोजण्या न येण्याइतके आहेत. माझ्या पापांनी माझी कोंडी केली आहे. आणि मी त्यांपासून पळू शकत नाही. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा माझी पापे जास्त आहेत. माझे धैर्य नाहीसे झाले आहे. 13 परमेश्वरा, माझ्याकडे धाव घे आणि मला वाचव. परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर. 14 ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर आणि त्यांची निराशा कर. ते लोक मला दु:ख देणार आहेत. त्यांना शरमेने पळून जायला लाव. 15 ते वाईट लोक माझी थट्टा करतात. त्यांना गोंधळायला लावून बोलता येणार नाही असे कर. 16 परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे. त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते. 17 प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.
Total 150 अध्याय, Selected धडा 40 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References