1. 1 “त्या सर्वशक्तिमान देवाला माणसाच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी कशा माहीत असतात? परंतु त्याच्या भक्तांना मात्र त्याच्याबद्दल काहीच माहीत नसते.”
|
2. 2 “लोक शेतातली हद्द दर्शविणाऱ्या खुणा जास्त जमीन मिळवण्यासाठी सरकवतात. लोक पशूंचे कळप चोरुन दुसऱ्या रानात चरायला नेतात.
|
3. 3 ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात. ते विधवेची गाय पळवून नेतात आणि त्यांच्या ऋणाची ती जोपर्यंत परतफेड करत नाही तोपर्यंत ती गाय आपल्याकडे ठेवून घेतात.
|
4. 4 ते गरीब लोकांना घरादाराशिवाय इकडे तिकडे हिंडायला लावतात. सगळ्या गरीबांना या दुष्टांपासून लपून राहावे लागते.
|
5. 5 “गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते अन्नाच्या शोधात लवकर उठतात. ते मुलाबाळांना अन्न देण्यासाठी रात्रीपर्यंत काम करतात.
|
6. 6 गरीब लोकांना शेतात गवत आणि चारा कापत रात्रीपर्यंत काम करावे लागते. त्यांना श्रीमंतांच्या शेतातली द्राक्षे वेचावी लागतात.
|
7. 7 त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते.
|
8. 8 ते डोंगरावर पावसात भिजतात. थंडीवाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नसते म्हणून ते मोठ्या खडकांना चिकटून बसतात.
|
9. 9 दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आईजवळून घेतात. ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून ठेवून घेतात.
|
10. 10 गरीबांजवळ कपडे नसतात. म्हणून काम करताना ते उघडेच असतात. ते दुष्टांसाठी धान्याच्या पेढं्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात.
|
11. 11 ते आँलिव्हचे तेल काढतात. द्राक्षाचा रस काढतात. व त्यासाठी द्राक्षकुंडात द्राक्षं तुडवतात. परंतु त्यांच्याजवळ मात्र पिण्यासाठी काही नसते.
|
12. 12 शहरात मरायला टेकलेल्या माणसांचे दु:खद रडणे ऐकू येते ते दु:खी कष्टी लोक मदतीसाठी हाका मारतात. परंतु देव ते ऐकत नाही.
|
13. 13 “काही लोक प्रकाशाविरुद्द बंड करतात. देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते. देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही.
|
15. 15 ज्या माणसाला व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो. ‘मला कुणीही बघणार नाही’ असे त्याला वाटते.’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो.
|
16. 16 रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात. पण दिवसा ते स्वत:ला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात.
|
17. 17 त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते. त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते.
|
18. 18 “पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात. त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्ष गोळा करु नयेत म्हणून त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो.
|
19. 19 हिवाळ्यातल्या बफर्पासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. त्याप्रमाणे त्या पापी लोकांना थडग्यात नेले जाते.
|
20. 20 हा दुष्ट माणूस मरेल आणि त्याची आईदेखील त्याला विसरुन जाईल. त्याची प्रेयसी म्हणजे त्याचे शरीर खाणारे किडे असतील. लोक त्याची आठवण ठेवणार नाहीत. त्यामुळे दुष्टपणा लाकडासारखा मोडून पडेल.
|
22. 22 सामर्थ्यवान लोकांना नष्ट करण्यासाठी दुष्ट आपली शक्ती खर्ची घालतात. दुष्ट माणसे सामर्थ्यवान बनू शकतात परंतु त्यांना त्यांच्या आयुष्याची खात्री नसते.
|
23. 23 दुष्टांना थोड्या वेळासाठी सुरक्षित आणि निर्धास्त वाटते. आपण सामर्थ्यवान व्हावे असे त्यांना वाटते.
|
24. 24 दुष्ट लोक थोड्या काळापुरते यशस्वी होतात. परंतु नंतर ते जातात. धान्याप्रमाणे त्यांची कापणी होते, इतर लोकांप्रमाणे दुष्टांनादेखील कापले जाते.
|
25. 25 “या गोष्टी खऱ्या आहेत हे मी शपर्थपूर्वक सांगतो. मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल? मी चुकलो हे कोण दाखवेल?”
|