1. 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोन व त्याची मुले याजक या नात्याने विशेष प्रकारे माझी सेवा करावी यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: अहरोन व त्याची मुले यांनी माझ्या सेवेसाठी याजक या नात्याने त्यांचे समर्पण करण्यासाठी याप्रमाणे विधी करावा: एक गोज्या व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;
|
2. 2 मग मैद्याच्या बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळया व जैतुनाचे तेल लावलेल्या बेखमीर पोळया व जैतुनाचे तेल लावलेल्या बेखमीर चपात्या कराव्यात;
|
3. 3 त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याच प्रमाणे तो गोज्या व ते दोन मेंढे त्याचवेळी अहरोन व त्याची मुले यांच्याकडे द्यावीत;
|
5. 5 याजकाच्या विशेष प्रकारच्या वस्त्रातून अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाबरोवरचा झगा घालावा; त्याला एफोद व न्यायाचा ऊरपट बांधावा आणि बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांधावा;
|
7. 7 नंतर अभिषेकाचे तेल घेऊन ते अहरोनाच्या डोक्यावर ओतावे व त्याला अभिषेक करावा; यावरून अहरोनाला याजकाच्या सेवेसाठी निवडले आहे असे दिसून येईल.
|
9. 9 मग त्यांना कमरबंद बांधावेत व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांना याजकपद मिळेल व ते कायम राहील. ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले यांच्यावर संस्कार करुन तू त्यांना याजक बनवावेस.
|
10. 10 “नंतर तो गोज्या दर्शन मंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत
|
11. 11 मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा; परमेश्वर हे सर्व पाहील.
|
13. 13 मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरवी, काळजाभोंवतीची चरवी आणि दोन्ही गुरदे व त्यांच्या भोवतीची चरबी अशी त्या गोऱ्ह्याच्या शरीरातील सर्व चरबी काढून घ्यावी व गुरदे व तिचा वेदीवर होम करावा.
|
14. 14 नंतर गोऱ्हाचे मांस, कातडे व बाकी राहिलेले शरीर छावणी बाहेर नेऊन आगीत जाळून टाकावे; हा याजकांच्या पाप निवारण्याचा यज्ञ होय.
|
16. 16 आणि त्या मेंढ्याचा वध करावा; त्याच्या रक्तातून थोडेस रक्त घेऊन वेदीच्या चारही बाजूस शिंपडावे.
|
17. 17 मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके ह्यांच्या बरोबर ठेवावेत;
|
18. 18 मग मेंढ्याच्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे परमेश्वराकरिता विशेष होमार्पण होय; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; त्यामुळे परमेश्वराला संतोष होईल.
|
20. 20 मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळया व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या आंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूस शिंपडावे.
|
21. 21 नंतर वेदीवरील थोडे रक्त घेऊन ते अभिषेकाच्या तेलात मिसळावे, व त्यातले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रावर तसेच मुलांवर व त्यांच्या वस्त्रावरही शिंपडावे; त्यामुळे तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्या बरोबर त्याची मुले व त्यांची वस्त्रे शुद्ध होतील, यावरुन अहरोन व त्याची मुले माझे याजक आहेत व ते विशेष वस्त्रे घालून माझी सेवा करतात हे दिसेल.
|
22. 22 “तो मेंढा अहरोनाच्या समर्पण विधीसाठी असल्यामुळे त्याची चरबी, आणि त्याच्या शेपटावरील व आतड्यावरील चरबी ही घ्यावीत;
|
23. 23 त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी
|
24. 24 आणि ते सर्व अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवावे व ते अर्पण म्हणून परमेश्वरासमोर वर धरण्यास त्यांना सांगावे.
|
25. 25 मग त्या सर्व वस्तू अहरोन व त्याच्या मुलांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर व वेदीवर त्यांचा होम करावा; ते परमेश्वराला अर्पिलेले सुवासिक हव्य होय.
|
26. 26 “मग त्या मेंढ्याचे ऊर घेऊन परमेश्वरासमोर विशेष अर्पण म्हणून वर धरावे; मग ते तुझ्याकरिता तुझ्याजवळ ठेव.
|
27. 27 नंतर अहरोन व त्याची मुले ह्यांच्या समर्पण विधीसाठी मारलेल्या मेढ्याचे अर्पिलेले ऊर व मांडी ही अहरोन व त्याच्या मुलांना द्यावी; हे अर्पण त्यांच्यासाठी पवित्र होईल.
|
28. 28 इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे यांना अर्पणाचा हा हिस्सा नेहमी द्यावा; ते जेव्हा परमेश्वराला अर्पणे आणतील तेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाच्या हक्काचा म्हणून राहील; आणि इस्राएल लोक जेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाला देतील तेव्हा ते परमेश्वराला दिलेल्या समर्पणासारखे होईल.
|
29. 29 “अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर सांभाळून ठेवावीत; ती त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावीत, जेव्हा त्यांची याजक म्हणून निवड होईल तेव्हा त्यांनी ती घालावीत.
|
30. 30 अहरोनाच्या जागी त्याचा जो मुलगा याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात जाताना ती वस्त्रे सात दिवस घालावीत.
|
31. 31 महान याजक म्हणून अहरोनाच्या समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे;
|
33. 33 ही अर्पणे त्यांची पवित्र याजकासाठी निवड होण्याच्या वेळी, त्यांचे पाप नाहीसे व्हावे म्हणून वाहिलेली होती, म्हणून ती अर्पणे त्यांनीच खावीत.
|
34. 34 समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यत उरले तर ते जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे; ते फक्त पवित्र ठिकाणी व विशेष वेळी खाण्यासारखे आहे.
|
35. 35 “अहरोन व त्याच्या मुलांनी समर्पण विधीच्या सात दिवसात मी तुला आज्ञा केलेल्या ह्या सर्व गोष्टी कराव्यात.
|
36. 36 त्या सात दिवसात दर दिवशी एक गोज्या मारून अर्पण करावा. अहरोन व त्याच्या मुलांनी केलेल्या पापांच्या प्रायश्चितासाठी-भरपाईसाठी हा होम होय, वेदी शुद्ध करण्यासाठी तिच्यावर जैतुनाचे तेल ओतावे
|
37. 37 सातही दिवस वेदी शुद्ध व पवित्र करावी; ती ह्या दिवसात जास्तीत जास्त पवित्र होईल, इतकी पवित्र की तिला कशाचाही स्पर्श झाला तर तेही पवित्र होईल.
|
40. 40 पहिल्या कोकराच्या अर्पणासोबत आठमापे सपीठपाव हीन -(द्रव पदार्थ मोजण्याचे माप)-द्राक्षारसात मळून अर्पण करावे.
|
41. 41 आणि संध्याकाळी दुसऱ्या कोकराबरोबरही सकाळच्या अर्पणाप्रमाणे आठमापे सपीठ अर्पण करावे व पाव हीन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे; ह्या हव्याच्या मधुर सुवासाने परमेश्वराला संतोष होईल.
|
42. 42 “ह्या सर्व गोष्टीचे अर्पण दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर करीत राहावे; ह्या अर्पणानंतर मी परमेश्वर त्या ठिकाणी भेट देईन व तुमच्याशी बोलेन.
|
44. 44 “ह्याप्रमाणे मी दर्शनमंडप व वेदी पवित्र करीन आणि अहरोन व त्याच्या मुलांना याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून मी त्यांनाही पवित्र करीन.
|
46. 46 आणि लोकांना समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहाता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मीच परमेश्वर त्यांचा देव आहे.”
|