2. 2 उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे मुलगे. ते सर्व आपापल्या घराण्यातली प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत 22,600 इतकी झाली.
|
3. 3 इज्रह्या हा उज्जीचा मुलगा. मिखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे मुलगे. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
|
4. 4 त्यांच्या घराण्यात 36,000 सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन दिसते. बायका आणि मुले पुष्कळ असल्यामुळे यांचे घराणे मोठे होते.
|
7. 7 बेलाला पाच मुलगे होते: एस्बोन, उज्जी, उज्जीयेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात 22,034सैनिक होते असे घराण्याच्या नोंदींवरुन दिसते.
|
9. 9 आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन कळते. त्यांच्याकडे 20,200 सैनिक होते, हे ही त्यावरुन कळते.
|
11. 11 यदीएलचे मुलगे हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे 17,200 सैनिक युध्दाला तयार होते.
|
14. 14 मनश्शेचे वंशज खालील प्रमाणे:मनश्शे आणि त्याची अरामी दासी यांना अस्रीएल नावाचा मुलगा होता. माखीर हाही आणखी एक मुलगा होता. माखीर म्हणजे गिलादचा बाप.
|
15. 15 हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका बाईशी माखीरने लग्न केले. तिचे नाव माका. माखीरच्या बहिणीचे ही नाव माका होते. या माकाचे दुसरे नाव सलाफहाद होते. हिला फक्त मुलीच झाल्या.
|
16. 16 माखीरची बायको माका हिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या (माखीरच्या) भावाचे नाव शेरेश. शेरेशचे मुलगे ऊलाम आणि रेकेम.
|
21. 21 एलादाचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा जाबाद. जाबादचा मुलगा शुथेलह.गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरे मेंढरे चोरुन नेत होते.
|
22. 22 एजेर आणि एलद हे एफ्राईमचे मुलगे होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
|
23. 23 मग एफ्राईमचा बायकोशी संबंध येऊन त्याची बायको गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. एफ्राईमने या मुलाचे नाव बरीया ठेवले. घरात आधी वाईट घडून गेल्यामुळे त्याने हे नाव ठेवले.
|
24. 24 एफाईमच्या मुलीचे नाव शेरा. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि खालचे आणि वरचे उज्जनशेरा ही बांधली.
|
28. 28 एफ्राईमच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्या ठिकाणी ते राहत होते: बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान; र्पार्मिला गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी थेट अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.
|
29. 29 मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा मुलगा योसेफ याचे वंशज राहत होते.
|
40. 40 हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते गुणसंपन्न शूर योध्दे होते. त्यांच्या वंशावळीच्या नोंदीप्रमाणे 26,000 लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.
|