1. 1 देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले, खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
|
2. 2 देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास आणि तो आम्हाला दिलास तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
|
3. 3 हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही. त्यांच्या कणखर बाहूंनी त्यांना विजयी केले नाही. हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास. देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवडील वाचले का? कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस.
|
11. 11 तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले. तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तता विखरुन टाकले.
|
14. 14 आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत, ज्यांना स्वत चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
|
17. 17 देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.
|
19. 19 परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस, मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस.
|
21. 21 देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात. त्याला आपल्या ह्दयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.
|
22. 22 देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
|