मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यिर्मया
1. सिद्कीया यहूदाचा राजा होता त्याच्या कारकिर्दीचा दहाव्या वर्षीयिर्मयाला परमेश्वराकडून एक संदेश आला. सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे दहावे वर्ष म्हणजेच नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष होय.
2. त्यावेळी बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला होता आणि यिर्मया चौकीदारांच्या पहाऱ्यात असलेल्या यहूदाच्या राजवाड्याच्या चौकात कैद केला गेला होता.
3. (3-4) (यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला यिर्मयाने केलेले भविष्यकथन आवडले नाही. म्हणून त्याने यिर्मयाला कैद केले होते. यिर्मयाने सांगितले होते “परमेश्वर म्हणतो, ‘मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन. नबुखद्नेस्सर ही नगरी जिंकेल यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या सैन्यापासून पळून जाऊ शकणार नाही. त्याला बाबेलच्या राजाच्या ताब्यात दिले जाईल सिद्कीया बाबेलच्या राजाशी प्रत्यक्ष समोरासमोर बोलेल.
4.
5. बाबेलचा राजा सिद्कीयाला बाबेलला नेईल. मी त्याला शिक्षा करेपर्यत तो तेथेच राहील.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. ‘तुम्ही जर बाबेलच्या सैन्याबरोबर युद्ध केलेत, तरी तुम्ही त्यात विजयी होणार नाही.”.)
6. यिर्मया कैदेत असताना म्हणाला, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे.
7. यिर्मया, तुझे काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल लवकरच तुझ्याकडे येईल आणि तुला म्हणेल ‘अनाथोथजवळचे माझे शेत, यिर्मया, तू विकत घे. तू माझा अगदी निकटचा नातेवाईक असल्याने, तूच ते विकत घे. तो तुझाच हक्क आणि तुझीच जबाबदारी आहे.’
8. “मग परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच घडले. माझा चुलतभाऊ हानामेल पहारेकऱ्यांच्या चौकात मला भेटला आणि म्हणाला, ‘यिर्मया, अनाथोथ गावाजवळचे माझे शेत तू विकत घे. अनाथोथ हे गाव बन्यामीनच्या कुळाच्या मालकीच्या प्रदेशात होते. तूच ते तुझ्यासाठी विकत घे. कारण ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा तुझा हक्क आणि जबाबदारी आहे.’“तेव्हा मला कळले की हाच देवाचा संदेश होता. देवाचा संदेश असाच आहे हे मला माहीत होतेच.
9. म्हणून मी माझा चुलतभाऊ हानामेल याच्याकडून ते शेत विकत घेतले. त्याबद्दल मी त्याला 17 चांदीची नाणीदिली.
10. मी खरेदीखतावर सही केली आणि त्याची एक मोहोरबंद प्रत माझ्याजवळ ठेवली काही लोकांना साक्षीला ठेवून मी सर्व गोष्टी केल्या, मी ताजव्यात चांदी मोजली.
11. मग मी माझ्याजवळची मोहोरबंद खरेदीखताची प्रत आणि दुसरी उघडी प्रत अशा दोन्ही प्रती घेतल्या व.
12. त्या बारुखला दिल्या, बारुख हा नरीयाचा व नरीया हा महसेयाचा मुलगा होता. मोहोरबंद खरेदीखतात खरेदीच्या सर्व शर्ती नमूद केलेल्या होत्या. माझा चुलत भाऊ हानामेल व इतर साक्षीदार तेथे असतानाच मी खरेदीखत बारुखला दिले. त्यावर इतर साक्षीदारांनीही सह्या केल्या. ते खरेदीखत मी बारुखला देताना चौकात बसलेल्या यहूदाच्या पुष्कळ लोकांनी पाहिले.
13. “लोक सर्व पाहत असतानाच, मी बारुखला म्हणालो,
14. “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘खरेदीखताच्या, मोहोरबंद व उघड, अशा दोन्ही प्रती मातीच्या मडक्यात ठेव म्हणजे त्या दीर्घ काळ चांगल्या टिकून राहतील.
15. सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “भविष्यकाळात माझी माणसे इस्राएलमध्ये पुन्हा एकदा घरे, शेते आणि द्राक्षमळे विकत घेतील.”
16. “नरीयाचा मुलगा बारुख ह्याला खरेदीखत दिल्यावर मी परमेश्वराची प्रार्थना केली. मी म्हणालो,
17. “परमेश्वर देवा, तू आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आणि पसरलेल्या हातामुळे तू ते निर्माण केलेस. तुला आश्र्चर्य कारक वाटण्याजोगे काहीही नाही. तुला काहीही असाध्य नाही.
18. परमेश्वर, तू हजारो लोकांची निष्ठा सांभाळणारा व त्यांच्यावर कृपा करणारा आहेस. पण तूच वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना करतोस. सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यवान देवा, तुझे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.
19. परमेश्वर, फार मोठ्या योजना आखतो आणि त्या पार पाडतो. लोक करीत असलेली प्रत्येक कृती तू पाहतोस. तू सत्कृत्ये करणाऱ्यांना बक्षिस देतोस व दुष्कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतोस. म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे फळ देतोस.
20. परमेश्वरा, तू मिसर देशात अद्भुत चमत्कार केलास. आजपावेतोसुद्धा तू अद्भूत चमत्कार केले आहेस. तू हे चमत्कार इस्राएलमध्ये तर केलेच पण जेथे जेथे लोक आहेत तेथे तेथे केलेस. त्यामुळेच तुझी कीर्ती झाली.
21. परमेश्वरा, अद्भूत चमत्कारांच्याआधारे तू इस्राएलच्या लोकांना मिसरमधून बाहेर आणलेस. ह्या गोष्टी तू स्वत:च्या सामर्थ्यवान हाताच्या बळावर केल्यास. तुझे सामर्थ्य विस्मयकारक आहे.!
22. “परमेश्वरा, ही भूमी तू इस्राएलच्या लोकांना दिलीस. फार पूर्वी हीच भूमी तू त्यांच्या पूर्वजांना द्यायचे कबूल केले होतेस. ही फार चांगली भूमी आहे. ह्या चांगल्या भूमीवर अनेक चांगल्या गोष्टी आहेत.
23. इस्राएलचे लोक ह्या देशात आले आणि त्यांनी तो देश आपल्या मालकीचा केला. पण त्या लोकांनी तुझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी तुझ्या शिकवणुकीचा स्वीकार केला नाही. तुझ्या आज्ञेप्रमाणे ते वागले नाहीत. म्हणून तू इस्राएलच्या लोकांच्याबाबत भयंकर गोष्टी घडवून आणल्यास.
24. “आणि आता, शत्रूने नगरीला वेढा घातला आहे. यरुशलेमची तटबंदी ओलांडून जाण्यासाठी व नगरी हस्तगत करण्यासाठी ते उतरंडी रचीत आहेत. युद्ध उपासमार व भयंकर रोगराई यांच्या जोरावर बाबेलचे सैन्य यरुशलेम नगरीचा पराभव करील. आता बाबेलचे सैन्य यरुशलेमवर हल्ला करीत आहे. परमेश्वरा, असे होईल असे तू म्हणाला होतास आणि पाहा आता तसेच घडत आहे.
25. “परमेश्वरा, माझ्या स्वामी, त्या सर्व वाईट गोष्टी घडत आहेत. पण तू मला सांगत आहेस, “यिर्मया, चांदी देऊन शेत विकत घे आणि खरेदीचे साक्षीदार म्हणून काही लोकांना निवड’ बाबेलचे सैन्य नगरी जिंकण्याच्या बेतात असताना, तू मला हे सांगत आहेस. मी माझा पैसा अशा रीतीने वाया का घालवावा?”
26. मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला.
27. “यिर्मया, मी परमेश्वर आहे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाचा मी देव आहे. यिर्मया, मला काहीच अशक्य नाही, हे तुला माहीत आहेच.”
28. परमेश्वर असेही म्हणाला, “मी लवकरच यरुशलेम नगरी बाबेलचे सैन्य आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्यांच्या ताब्यात देईन. ते सैन्य नगरी जिंकेल.
29. बाबेलच्या सैन्याने नगरीवर हल्ला करण्यास अगोदरच सुरवात केली आहे. ते लवकरच नगरीत प्रवेश करतील व आग लावतील. ते नगरी बेचिराख करतील. यरुशलेममधील लोकांनी घरांच्या धाब्यावर दैवत बआल याला नैवेद्य दाखवून मला संतापवले. लोकांनी इतर मूर्तीना पेये अर्पण केली. बाबेलचे सैन्य ती सर्व घरे जाळून टाकेल.
30. मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांवर नजर ठेवली. ते करीत असलेली प्रत्येक गोष्ट वाईट आहे. ते लहान असल्यापासून दुष्कृत्ये करीत आहेत. इस्राएलच्या लोकांनी मला फार संतापविले. त्यांनी स्वत:च्या हाताने तयार केलेल्या मूर्तींची पूजा केल्याने मला अतिशय राग आला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
31. “यरुशलेमच्या उभारणीपासून आतापर्यंत ह्या नगरीतल्या लोकांनी मला संतापविले आहे. त्यांनी मला इतके संतापविले की मला ती नगरी नजरे पुढून नाहीशी केलीच पाहिजे.
32. इस्राएल व यहूदा येथील लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी यरुशलेमचा नाश करीन. लोक, त्यांचे राजे, नेते, त्यांचे याजक आणि संदेष्टे, यहूदातील व यरुशलेममधील लोक यांनी मला फार संतापविले आहे.
33. “त्या लोकांनी मदतीसाठी माझ्याकडे यावे पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली. मी त्यांना शिकविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकले नाही. मी त्यांना नीती शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी लक्ष दिले नाही.
34. त्या लोकांनी त्यांच्या मूर्ती तयार केल्या, मला त्या मूर्तीची चीड येते. त्यानी त्या मूर्ती माझ्या नावावर असलेल्या मंदिरात ठेवल्या. त्यामुळे माझे मंदिर ‘अपवित्र झाले.
35. “बेन-हिन्नोमच्या दरीत त्यांना बआल या दैवतासाठी उच्चस्थाने बांधली. ही पूजास्थाने त्यांनी आपल्या मुलामुलींना जाळून मोलेखला बआलबळी देण्यासाठी बांधली. अशा भयंकर गोष्टी करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. यहूदातील लोक अशा भयंकर गोष्टी करतील, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते.
36. “तुम्ही लोक म्हणत आहात ‘बाबेलचा राजा यरुशलेम जिंकेल ह्या नगरीचा पराभव करण्यासाठी तो युद्ध, उपासमार आणि भयंकर रोगराई ह्यांचा उपयोग करील’ पण परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो,
37. “मी इस्राएल व यहूदा यामधील लोकांना त्यांचा देश सोडण्यास बळजबरीने भाग पाडले आहे. मी त्यांच्यावर भयंकर रागावलो आहे. पण मी त्यांना या ठिकाणी परत आणीन. मी त्यांना जेथे जेथे जायला भाग पाडले, तेथून तेथून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना येथे परत आणीन. मी त्यांना शांततेत व सुखरुप राहू देईन.
38. इस्राएलमधील आणि यहूदातील लोक माझे होतील आणि मी त्यांचा देव होईन.
39. त्यांनी खरोखरच एक व्हावे म्हणून मी त्यांच्या मनात तशी इच्छा उत्पन्न करीन. त्यांच्या आयुष्यभर माझ्या उपासनेची खरोखरीची इच्छा हेच त्यांचे एकमेव ध्येय असेल. माझी उपासना आणि आदर केल्याने त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे खरोखरच भले होईल.
40. “‘यहूदातील आणि इस्राएलमधील लोकांबरोबर मी एक करार करीन. तो करार चिरंतन राहील. ह्या कराराप्रमाणे, मी ह्या लोकांकडे कधी पाठ फिरविणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी चांगला वागेन. मी त्यांना माझा आदर करायची भावना देईन. मग ते माझ्यापासून कधीही दूर जाणार नाहीत.
41. ते मला प्रसन्न ठेवतील. त्यांचे भले करण्यात मला मौज वाटेल. मी त्यांना ह्या भूमीत रुजवीन आणि वाढवीन. मी माझ्या अंत:करणापासून हे करीन.”‘
42. परमेश्वर असे म्हणतो, “मी इस्राएलमधील आणि यहूदातील लोकांवर मोठे अरिष्टही आणीन. मी त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचे कबूल केले आहे.
43. तुम्ही लोक म्हणत आहात, ‘ही जमीन म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी मनुष्यप्राणी वा पशू नाहीत. बाबेलच्या सैन्याने या देशाचा पराभव केला.’ पण भविष्यकाळात, ह्या देशात लोक पुन्हा एकदा शेते खरेदी करतील.
44. लोक आपले धन वापरुन शेते खरेदी करतील. ते करारावर सह्या करतील आणि ते मोहोरबंद करतील. लोक खरेदीखतांवर सह्या करतील, तेव्हा इतर लोक साक्षी असतील. बन्यामीनच्या देशात, लोक पुन्हा जमीन विकत घेतील, यरुशलेम भोवतीच्या प्रदेशातील जमीन ते खरेदी करतील. यहूदातील शहरांत ते शेते विकत घेतील. त्याचप्रमाणे लोक डोगराळ प्रदेश पश्र्चिमेकडील डोंगरपायथा व दक्षिणेकडील वाळवंट येथेही लोक जमीन विकत घेतील. मी तुमच्या लोकांना परत घरी आणीन. मग असे घडून येईन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

Notes

No Verse Added

Total 52 अध्याय, Selected धडा 32 / 52
यिर्मया 32:34
1 सिद्कीया यहूदाचा राजा होता त्याच्या कारकिर्दीचा दहाव्या वर्षीयिर्मयाला परमेश्वराकडून एक संदेश आला. सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे दहावे वर्ष म्हणजेच नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष होय. 2 त्यावेळी बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला होता आणि यिर्मया चौकीदारांच्या पहाऱ्यात असलेल्या यहूदाच्या राजवाड्याच्या चौकात कैद केला गेला होता. 3 (3-4) (यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला यिर्मयाने केलेले भविष्यकथन आवडले नाही. म्हणून त्याने यिर्मयाला कैद केले होते. यिर्मयाने सांगितले होते “परमेश्वर म्हणतो, ‘मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन. नबुखद्नेस्सर ही नगरी जिंकेल यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या सैन्यापासून पळून जाऊ शकणार नाही. त्याला बाबेलच्या राजाच्या ताब्यात दिले जाईल सिद्कीया बाबेलच्या राजाशी प्रत्यक्ष समोरासमोर बोलेल. 4 5 बाबेलचा राजा सिद्कीयाला बाबेलला नेईल. मी त्याला शिक्षा करेपर्यत तो तेथेच राहील.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. ‘तुम्ही जर बाबेलच्या सैन्याबरोबर युद्ध केलेत, तरी तुम्ही त्यात विजयी होणार नाही.”.) 6 यिर्मया कैदेत असताना म्हणाला, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे. 7 यिर्मया, तुझे काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल लवकरच तुझ्याकडे येईल आणि तुला म्हणेल ‘अनाथोथजवळचे माझे शेत, यिर्मया, तू विकत घे. तू माझा अगदी निकटचा नातेवाईक असल्याने, तूच ते विकत घे. तो तुझाच हक्क आणि तुझीच जबाबदारी आहे.’ 8 “मग परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच घडले. माझा चुलतभाऊ हानामेल पहारेकऱ्यांच्या चौकात मला भेटला आणि म्हणाला, ‘यिर्मया, अनाथोथ गावाजवळचे माझे शेत तू विकत घे. अनाथोथ हे गाव बन्यामीनच्या कुळाच्या मालकीच्या प्रदेशात होते. तूच ते तुझ्यासाठी विकत घे. कारण ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा तुझा हक्क आणि जबाबदारी आहे.’“तेव्हा मला कळले की हाच देवाचा संदेश होता. देवाचा संदेश असाच आहे हे मला माहीत होतेच. 9 म्हणून मी माझा चुलतभाऊ हानामेल याच्याकडून ते शेत विकत घेतले. त्याबद्दल मी त्याला 17 चांदीची नाणीदिली. 10 मी खरेदीखतावर सही केली आणि त्याची एक मोहोरबंद प्रत माझ्याजवळ ठेवली काही लोकांना साक्षीला ठेवून मी सर्व गोष्टी केल्या, मी ताजव्यात चांदी मोजली. 11 मग मी माझ्याजवळची मोहोरबंद खरेदीखताची प्रत आणि दुसरी उघडी प्रत अशा दोन्ही प्रती घेतल्या व. 12 त्या बारुखला दिल्या, बारुख हा नरीयाचा व नरीया हा महसेयाचा मुलगा होता. मोहोरबंद खरेदीखतात खरेदीच्या सर्व शर्ती नमूद केलेल्या होत्या. माझा चुलत भाऊ हानामेल व इतर साक्षीदार तेथे असतानाच मी खरेदीखत बारुखला दिले. त्यावर इतर साक्षीदारांनीही सह्या केल्या. ते खरेदीखत मी बारुखला देताना चौकात बसलेल्या यहूदाच्या पुष्कळ लोकांनी पाहिले. 13 “लोक सर्व पाहत असतानाच, मी बारुखला म्हणालो, 14 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘खरेदीखताच्या, मोहोरबंद व उघड, अशा दोन्ही प्रती मातीच्या मडक्यात ठेव म्हणजे त्या दीर्घ काळ चांगल्या टिकून राहतील. 15 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “भविष्यकाळात माझी माणसे इस्राएलमध्ये पुन्हा एकदा घरे, शेते आणि द्राक्षमळे विकत घेतील.” 16 “नरीयाचा मुलगा बारुख ह्याला खरेदीखत दिल्यावर मी परमेश्वराची प्रार्थना केली. मी म्हणालो, 17 “परमेश्वर देवा, तू आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आणि पसरलेल्या हातामुळे तू ते निर्माण केलेस. तुला आश्र्चर्य कारक वाटण्याजोगे काहीही नाही. तुला काहीही असाध्य नाही. 18 परमेश्वर, तू हजारो लोकांची निष्ठा सांभाळणारा व त्यांच्यावर कृपा करणारा आहेस. पण तूच वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना करतोस. सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यवान देवा, तुझे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर. 19 परमेश्वर, फार मोठ्या योजना आखतो आणि त्या पार पाडतो. लोक करीत असलेली प्रत्येक कृती तू पाहतोस. तू सत्कृत्ये करणाऱ्यांना बक्षिस देतोस व दुष्कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतोस. म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे फळ देतोस. 20 परमेश्वरा, तू मिसर देशात अद्भुत चमत्कार केलास. आजपावेतोसुद्धा तू अद्भूत चमत्कार केले आहेस. तू हे चमत्कार इस्राएलमध्ये तर केलेच पण जेथे जेथे लोक आहेत तेथे तेथे केलेस. त्यामुळेच तुझी कीर्ती झाली. 21 परमेश्वरा, अद्भूत चमत्कारांच्याआधारे तू इस्राएलच्या लोकांना मिसरमधून बाहेर आणलेस. ह्या गोष्टी तू स्वत:च्या सामर्थ्यवान हाताच्या बळावर केल्यास. तुझे सामर्थ्य विस्मयकारक आहे.! 22 “परमेश्वरा, ही भूमी तू इस्राएलच्या लोकांना दिलीस. फार पूर्वी हीच भूमी तू त्यांच्या पूर्वजांना द्यायचे कबूल केले होतेस. ही फार चांगली भूमी आहे. ह्या चांगल्या भूमीवर अनेक चांगल्या गोष्टी आहेत. 23 इस्राएलचे लोक ह्या देशात आले आणि त्यांनी तो देश आपल्या मालकीचा केला. पण त्या लोकांनी तुझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी तुझ्या शिकवणुकीचा स्वीकार केला नाही. तुझ्या आज्ञेप्रमाणे ते वागले नाहीत. म्हणून तू इस्राएलच्या लोकांच्याबाबत भयंकर गोष्टी घडवून आणल्यास. 24 “आणि आता, शत्रूने नगरीला वेढा घातला आहे. यरुशलेमची तटबंदी ओलांडून जाण्यासाठी व नगरी हस्तगत करण्यासाठी ते उतरंडी रचीत आहेत. युद्ध उपासमार व भयंकर रोगराई यांच्या जोरावर बाबेलचे सैन्य यरुशलेम नगरीचा पराभव करील. आता बाबेलचे सैन्य यरुशलेमवर हल्ला करीत आहे. परमेश्वरा, असे होईल असे तू म्हणाला होतास आणि पाहा आता तसेच घडत आहे. 25 “परमेश्वरा, माझ्या स्वामी, त्या सर्व वाईट गोष्टी घडत आहेत. पण तू मला सांगत आहेस, “यिर्मया, चांदी देऊन शेत विकत घे आणि खरेदीचे साक्षीदार म्हणून काही लोकांना निवड’ बाबेलचे सैन्य नगरी जिंकण्याच्या बेतात असताना, तू मला हे सांगत आहेस. मी माझा पैसा अशा रीतीने वाया का घालवावा?” 26 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 27 “यिर्मया, मी परमेश्वर आहे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाचा मी देव आहे. यिर्मया, मला काहीच अशक्य नाही, हे तुला माहीत आहेच.” 28 परमेश्वर असेही म्हणाला, “मी लवकरच यरुशलेम नगरी बाबेलचे सैन्य आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्यांच्या ताब्यात देईन. ते सैन्य नगरी जिंकेल. 29 बाबेलच्या सैन्याने नगरीवर हल्ला करण्यास अगोदरच सुरवात केली आहे. ते लवकरच नगरीत प्रवेश करतील व आग लावतील. ते नगरी बेचिराख करतील. यरुशलेममधील लोकांनी घरांच्या धाब्यावर दैवत बआल याला नैवेद्य दाखवून मला संतापवले. लोकांनी इतर मूर्तीना पेये अर्पण केली. बाबेलचे सैन्य ती सर्व घरे जाळून टाकेल. 30 मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांवर नजर ठेवली. ते करीत असलेली प्रत्येक गोष्ट वाईट आहे. ते लहान असल्यापासून दुष्कृत्ये करीत आहेत. इस्राएलच्या लोकांनी मला फार संतापविले. त्यांनी स्वत:च्या हाताने तयार केलेल्या मूर्तींची पूजा केल्याने मला अतिशय राग आला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 31 “यरुशलेमच्या उभारणीपासून आतापर्यंत ह्या नगरीतल्या लोकांनी मला संतापविले आहे. त्यांनी मला इतके संतापविले की मला ती नगरी नजरे पुढून नाहीशी केलीच पाहिजे. 32 इस्राएल व यहूदा येथील लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी यरुशलेमचा नाश करीन. लोक, त्यांचे राजे, नेते, त्यांचे याजक आणि संदेष्टे, यहूदातील व यरुशलेममधील लोक यांनी मला फार संतापविले आहे. 33 “त्या लोकांनी मदतीसाठी माझ्याकडे यावे पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली. मी त्यांना शिकविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकले नाही. मी त्यांना नीती शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी लक्ष दिले नाही. 34 त्या लोकांनी त्यांच्या मूर्ती तयार केल्या, मला त्या मूर्तीची चीड येते. त्यानी त्या मूर्ती माझ्या नावावर असलेल्या मंदिरात ठेवल्या. त्यामुळे माझे मंदिर ‘अपवित्र झाले. 35 “बेन-हिन्नोमच्या दरीत त्यांना बआल या दैवतासाठी उच्चस्थाने बांधली. ही पूजास्थाने त्यांनी आपल्या मुलामुलींना जाळून मोलेखला बआलबळी देण्यासाठी बांधली. अशा भयंकर गोष्टी करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. यहूदातील लोक अशा भयंकर गोष्टी करतील, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते. 36 “तुम्ही लोक म्हणत आहात ‘बाबेलचा राजा यरुशलेम जिंकेल ह्या नगरीचा पराभव करण्यासाठी तो युद्ध, उपासमार आणि भयंकर रोगराई ह्यांचा उपयोग करील’ पण परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, 37 “मी इस्राएल व यहूदा यामधील लोकांना त्यांचा देश सोडण्यास बळजबरीने भाग पाडले आहे. मी त्यांच्यावर भयंकर रागावलो आहे. पण मी त्यांना या ठिकाणी परत आणीन. मी त्यांना जेथे जेथे जायला भाग पाडले, तेथून तेथून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना येथे परत आणीन. मी त्यांना शांततेत व सुखरुप राहू देईन. 38 इस्राएलमधील आणि यहूदातील लोक माझे होतील आणि मी त्यांचा देव होईन. 39 त्यांनी खरोखरच एक व्हावे म्हणून मी त्यांच्या मनात तशी इच्छा उत्पन्न करीन. त्यांच्या आयुष्यभर माझ्या उपासनेची खरोखरीची इच्छा हेच त्यांचे एकमेव ध्येय असेल. माझी उपासना आणि आदर केल्याने त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे खरोखरच भले होईल. 40 “‘यहूदातील आणि इस्राएलमधील लोकांबरोबर मी एक करार करीन. तो करार चिरंतन राहील. ह्या कराराप्रमाणे, मी ह्या लोकांकडे कधी पाठ फिरविणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी चांगला वागेन. मी त्यांना माझा आदर करायची भावना देईन. मग ते माझ्यापासून कधीही दूर जाणार नाहीत. 41 ते मला प्रसन्न ठेवतील. त्यांचे भले करण्यात मला मौज वाटेल. मी त्यांना ह्या भूमीत रुजवीन आणि वाढवीन. मी माझ्या अंत:करणापासून हे करीन.”‘ 42 परमेश्वर असे म्हणतो, “मी इस्राएलमधील आणि यहूदातील लोकांवर मोठे अरिष्टही आणीन. मी त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचे कबूल केले आहे. 43 तुम्ही लोक म्हणत आहात, ‘ही जमीन म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी मनुष्यप्राणी वा पशू नाहीत. बाबेलच्या सैन्याने या देशाचा पराभव केला.’ पण भविष्यकाळात, ह्या देशात लोक पुन्हा एकदा शेते खरेदी करतील. 44 लोक आपले धन वापरुन शेते खरेदी करतील. ते करारावर सह्या करतील आणि ते मोहोरबंद करतील. लोक खरेदीखतांवर सह्या करतील, तेव्हा इतर लोक साक्षी असतील. बन्यामीनच्या देशात, लोक पुन्हा जमीन विकत घेतील, यरुशलेम भोवतीच्या प्रदेशातील जमीन ते खरेदी करतील. यहूदातील शहरांत ते शेते विकत घेतील. त्याचप्रमाणे लोक डोगराळ प्रदेश पश्र्चिमेकडील डोंगरपायथा व दक्षिणेकडील वाळवंट येथेही लोक जमीन विकत घेतील. मी तुमच्या लोकांना परत घरी आणीन. मग असे घडून येईन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
Total 52 अध्याय, Selected धडा 32 / 52
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References