मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
योहान
1. जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्दअस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता.
2. तो शब्द सुरूवातीपासूनच देवाबरोबर होता.
3. त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही.
4. त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश (समजबुद्धी, चांगुलपण) असे होते.
5. हा प्रकाश अंधारात प्रकाशतो. पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूतकेले नाही.
6. योहाननावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठवीले.
7. तो लोकांना प्रकाशाविषयी (ख्रिस्ताविषयी) सांगण्यासाठी आला. यासाठी की, योहानाकडून प्रकाश विषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा.
8. योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला.
9. खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो.
10. शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले. परंतु जगाने त्याला ओळखले नाही.
11. तो जगात आला, जे त्याचे स्वत:चे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वत:च्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही.
12. काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला.
13. ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला.
14. शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा (दयाळूपणा) आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता.
15. योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले. योहान म्हणाला, “ज्याच्याविषयी मी सांगत आहे तो हाच. मी म्हणालो, माझ्यानंतर येणारा माझ्याहून थोर आहे, तो मोझ्या अगोदरपासुन आहे.”
16. शब्द (ख्रिस्त) हा कृपा (दयाळूपणा) व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद मिळाले.
17. मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली.
18. कोणाही मनुष्याने आतापर्यत देवाला कधी पाहिले नाही. परंतु एकमेव देव (येशू) जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे.
19. यरूशलेम येथील यहूदी लोकांनी योहानाकडे काही याजक व लेवीह्यांना पाठविले. “तू कोण आहेस?” हे विचारण्यासाठी यहूदी लोकांनी त्यांना पाठविले.
20. योहान अगदी मोकळेपणाने बोलला. त्याने उत्तर देण्यास नकार दिला नाही. तो स्पष्टपणे म्हणाला, ‘मी ख्रिस्तनाही.” योहानाने लोकांना तेच सांगितले.
21. यहूदी लोकांनी योहानाला विचारले, “तर मग तू कोण आहेस? तू एलीयाआहेस काय?” योहानाने उत्तर दिले, “नाही, मी एलीया नाही.” यहूदी लोकांनी विचारले, ‘तू संदेष्टा आहेस काय?” योहानाने म्हटले, ‘नाही, मी संदेष्टा नाही.”
22. यावर यहूदी लोक म्हणाले, “तू कोण आहेस?” तुझ्याविषयी आम्हांला सांग. ज्या लोकांनी आम्हांला पाठविले, त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे हे तू आम्हांला सांग. तू स्वत:ला कोण म्हणवितोस?”
23. योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले,‘मी वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे: ‘प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.’
24. परूशी लोकांनी या यहूदी लोकांना पाठविले होते.
25. हे लोक योहानाला म्हणाले, “तू म्हणतोस की, मी ख्रिस्त नाही; मी एलीया नाही किंवा मी संदेष्टाही नाही, मग तू लोकांचा बाप्तिस्मा का करतोस?”
26. योहानाने उतर दिले, “मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु तुम्हांला माहीत नाही असा एक मनुष्य येथे तुमच्यात आहे.
27. माझ्यानंतर येणारा तो हाच मनुष्य आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याइतकीही माझी लायकी नाही.”
28. यार्देन नदीपलीकडील बेथानी गावात या सर्व गोष्टी घडल्या. योहान तेथेच लोकांचा बाप्तिस्मा करीत असे.
29. दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले. योहान म्हणाला, “पाहा, हा देवाचा कोकरा. जगाचे पाप वाहून नेणारा.
30. याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, ‘माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे. परंतु तो माझ्याहून थोर आहे. तो माझ्या अगोदरपासून आहे. तो सदाजीवी आहे.’
31. तो कोण होता हे मलाही माहीत नव्हते. परंतु मी पाण्याने बाप्तिस्माकरीत आलो यासाठी की, येशू हाच ख्रिस्त आहे हे इस्राएलाला (यहूदी लोकांना) कळावे.”
32. (32-33) नंतर योहान म्हणाला, “ख्रिस्त कोण होता हे मलाही माहीत नव्हते परंतु मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा म्हणून देवाने मला पाठविले. आणि देवाने मला सांगितले, “आत्मा खाली येऊन एका मनुष्यावर स्थिरावताना दिसेल, तोच मनुष्य पवित्र आत्म्यानेबाप्तिस्मा करील.” योहान म्हणाला, “हे होताना मी पाहिले आहे. स्वर्गातून पवीत्र आत्मा खाली उतरताना मी पाहिला. आत्मा कबुतरासारखा दिसत होता. आणि तो त्याच्यावर (येशूवर) येऊन स्थिरावला.
33.
34. म्हणून मी लोकांना सांगतो: ‘तो (येशू) देवाचा पुत्र आहे.’ “
35. दुसऱ्या दिवशी योहान पुन्हा तेथे आला. योहानाबरोबर त्याचे दोन शिष्य होते.
36. योहानाने येशूला जाताना पाहिले, योहान म्हणाला, “पाहा हा देवाचा कोकरा!”
37. योहान हे बोलत असता त्या दोघा शिष्यांनी ऐकले, म्हणून ते योहानाचे शिष्य येशूच्या मागे गेले.
38. येशूने मागे वळून पाहिले तो दोघेजण आपल्यामागे येत आहेत असे त्याला दिसले. येशूने विचारले, “तुम्हांला काय पाहिजे?” ते दोघे म्हणाले, “गुरुजी (रब्बी), तुम्ही कोठे राहता?”
39. येशूने उतर दिले, “माझ्याबरोबर या म्हणजे तुम्हांला दिसेल.” तेव्हा ते दोघेजण येशूबरोबर गेले. येशु राहत होता ती जागा त्यांनी पाहिली. ते त्या दिवशी येशूबरोब तेथे राहिले. त्यावेळी सुमारे दुपारचे चार वाजले होते.
40. येशूविषयी योहानाकडून ऐकल्यावर ते दोघे जण येशूच्या मागे गेले. त्यांच्यापैकी एकाचे नाव अंद्रिया होते. अंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ.
41. अंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की, आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले. अंद्रिया शिमोनाला म्हणाला, “आम्हांला मशीहा सापडला आहे.”
42. शिमोनाला घेऊन अंद्रिया येशूकडे आला. शिमोनाकडे पाहून येशू म्हणाला, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफाम्हणतील.”
43. दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला, येशु त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.”
44. जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता.
45. फिलिप्प नथनेलास भेटला व म्हणाला, “मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्ट्यांनीही लिहिले. तो आम्हांला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे, तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे.”
46. परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला. “नासरेथ! नासरेथमधून काही चांगले निघेल काय?” फिलिप्प म्हणाला, “येऊन पहा.”
47. येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहिले, येशू म्हणाला, “हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही.”
48. “तुम्ही मला कसे ओळखता?” नथनेलाने विचारले. येशूने उत्तर दिले, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता. तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्यााविषयी सांगण्यापूर्वीच.”
49. मग नथनेल येशूला म्हणाला, “रब्बी (गुरूजी) तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्राएलाचे राजे आहात.
50. येशू नथनेलला म्हणाला, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले, असेमी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील!”
51. येशू पुढे म्हणाला, “खरे तेच मी तुला सांगतो. स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्व जण पाहाल. देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.” 52
Total 21 अध्याय, Selected धडा 1 / 21
1 2 3 4 5 6 7 8 9
1 जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्दअस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता. 2 तो शब्द सुरूवातीपासूनच देवाबरोबर होता. 3 त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. 4 त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश (समजबुद्धी, चांगुलपण) असे होते. 5 हा प्रकाश अंधारात प्रकाशतो. पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूतकेले नाही. 6 योहाननावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठवीले. 7 तो लोकांना प्रकाशाविषयी (ख्रिस्ताविषयी) सांगण्यासाठी आला. यासाठी की, योहानाकडून प्रकाश विषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा. 8 योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला. 9 खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो. 10 शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले. परंतु जगाने त्याला ओळखले नाही. 11 तो जगात आला, जे त्याचे स्वत:चे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वत:च्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही. 12 काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला. 13 ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला. 14 शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा (दयाळूपणा) आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. 15 योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले. योहान म्हणाला, “ज्याच्याविषयी मी सांगत आहे तो हाच. मी म्हणालो, माझ्यानंतर येणारा माझ्याहून थोर आहे, तो मोझ्या अगोदरपासुन आहे.” 16 शब्द (ख्रिस्त) हा कृपा (दयाळूपणा) व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद मिळाले. 17 मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली. 18 कोणाही मनुष्याने आतापर्यत देवाला कधी पाहिले नाही. परंतु एकमेव देव (येशू) जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे. 19 यरूशलेम येथील यहूदी लोकांनी योहानाकडे काही याजक व लेवीह्यांना पाठविले. “तू कोण आहेस?” हे विचारण्यासाठी यहूदी लोकांनी त्यांना पाठविले. 20 योहान अगदी मोकळेपणाने बोलला. त्याने उत्तर देण्यास नकार दिला नाही. तो स्पष्टपणे म्हणाला, ‘मी ख्रिस्तनाही.” योहानाने लोकांना तेच सांगितले. 21 यहूदी लोकांनी योहानाला विचारले, “तर मग तू कोण आहेस? तू एलीयाआहेस काय?” योहानाने उत्तर दिले, “नाही, मी एलीया नाही.” यहूदी लोकांनी विचारले, ‘तू संदेष्टा आहेस काय?” योहानाने म्हटले, ‘नाही, मी संदेष्टा नाही.” 22 यावर यहूदी लोक म्हणाले, “तू कोण आहेस?” तुझ्याविषयी आम्हांला सांग. ज्या लोकांनी आम्हांला पाठविले, त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे हे तू आम्हांला सांग. तू स्वत:ला कोण म्हणवितोस?” 23 योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले,‘मी वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे: ‘प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.’ 24 परूशी लोकांनी या यहूदी लोकांना पाठविले होते. 25 हे लोक योहानाला म्हणाले, “तू म्हणतोस की, मी ख्रिस्त नाही; मी एलीया नाही किंवा मी संदेष्टाही नाही, मग तू लोकांचा बाप्तिस्मा का करतोस?” 26 योहानाने उतर दिले, “मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु तुम्हांला माहीत नाही असा एक मनुष्य येथे तुमच्यात आहे. 27 माझ्यानंतर येणारा तो हाच मनुष्य आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याइतकीही माझी लायकी नाही.” 28 यार्देन नदीपलीकडील बेथानी गावात या सर्व गोष्टी घडल्या. योहान तेथेच लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. 29 दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले. योहान म्हणाला, “पाहा, हा देवाचा कोकरा. जगाचे पाप वाहून नेणारा. 30 याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, ‘माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे. परंतु तो माझ्याहून थोर आहे. तो माझ्या अगोदरपासून आहे. तो सदाजीवी आहे.’ 31 तो कोण होता हे मलाही माहीत नव्हते. परंतु मी पाण्याने बाप्तिस्माकरीत आलो यासाठी की, येशू हाच ख्रिस्त आहे हे इस्राएलाला (यहूदी लोकांना) कळावे.” 32 (32-33) नंतर योहान म्हणाला, “ख्रिस्त कोण होता हे मलाही माहीत नव्हते परंतु मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा म्हणून देवाने मला पाठविले. आणि देवाने मला सांगितले, “आत्मा खाली येऊन एका मनुष्यावर स्थिरावताना दिसेल, तोच मनुष्य पवित्र आत्म्यानेबाप्तिस्मा करील.” योहान म्हणाला, “हे होताना मी पाहिले आहे. स्वर्गातून पवीत्र आत्मा खाली उतरताना मी पाहिला. आत्मा कबुतरासारखा दिसत होता. आणि तो त्याच्यावर (येशूवर) येऊन स्थिरावला. 33 34 म्हणून मी लोकांना सांगतो: ‘तो (येशू) देवाचा पुत्र आहे.’ “ 35 दुसऱ्या दिवशी योहान पुन्हा तेथे आला. योहानाबरोबर त्याचे दोन शिष्य होते. 36 योहानाने येशूला जाताना पाहिले, योहान म्हणाला, “पाहा हा देवाचा कोकरा!” 37 योहान हे बोलत असता त्या दोघा शिष्यांनी ऐकले, म्हणून ते योहानाचे शिष्य येशूच्या मागे गेले. 38 येशूने मागे वळून पाहिले तो दोघेजण आपल्यामागे येत आहेत असे त्याला दिसले. येशूने विचारले, “तुम्हांला काय पाहिजे?” ते दोघे म्हणाले, “गुरुजी (रब्बी), तुम्ही कोठे राहता?” 39 येशूने उतर दिले, “माझ्याबरोबर या म्हणजे तुम्हांला दिसेल.” तेव्हा ते दोघेजण येशूबरोबर गेले. येशु राहत होता ती जागा त्यांनी पाहिली. ते त्या दिवशी येशूबरोब तेथे राहिले. त्यावेळी सुमारे दुपारचे चार वाजले होते. 40 येशूविषयी योहानाकडून ऐकल्यावर ते दोघे जण येशूच्या मागे गेले. त्यांच्यापैकी एकाचे नाव अंद्रिया होते. अंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ. 41 अंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की, आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले. अंद्रिया शिमोनाला म्हणाला, “आम्हांला मशीहा सापडला आहे.” 42 शिमोनाला घेऊन अंद्रिया येशूकडे आला. शिमोनाकडे पाहून येशू म्हणाला, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफाम्हणतील.” 43 दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला, येशु त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” 44 जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता. 45 फिलिप्प नथनेलास भेटला व म्हणाला, “मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्ट्यांनीही लिहिले. तो आम्हांला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे, तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे.” 46 परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला. “नासरेथ! नासरेथमधून काही चांगले निघेल काय?” फिलिप्प म्हणाला, “येऊन पहा.” 47 येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहिले, येशू म्हणाला, “हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही.” 48 “तुम्ही मला कसे ओळखता?” नथनेलाने विचारले. येशूने उत्तर दिले, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता. तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्यााविषयी सांगण्यापूर्वीच.” 49 मग नथनेल येशूला म्हणाला, “रब्बी (गुरूजी) तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्राएलाचे राजे आहात. 50 येशू नथनेलला म्हणाला, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले, असेमी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील!” 51 येशू पुढे म्हणाला, “खरे तेच मी तुला सांगतो. स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्व जण पाहाल. देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.” 52
Total 21 अध्याय, Selected धडा 1 / 21
1 2 3 4 5 6 7 8 9
×

Alert

×

Marathi Letters Keypad References