मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
यहेज्केल

यहेज्केल धडा 14

संदेष्ट्याचा सल्ला घेण्याऱ्या मूर्तीपूजकांचा न्याय 1 इस्राएलाच्या वडीलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे आले व माझ्यापुढे बसले 2 नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला की, 3 मानवाच्या मुला, या सर्व मानवांनी मूर्तींची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली, त्यांनी आपल्या दृष्टी समोर पापाला अडखळण ठेवले आहे, अशा पापीष्ट लोकांस मी आपल्याला प्रश्न विचारु देईन? 4 याकरिता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो, त्यास माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल. 5 मी इस्राएल घराण्याला परत माघारी आणिन, कारण त्यांच्या मूर्तीपुढे त्यांनी मला अगदी परके केले आहे, असे परमेश्वर देव म्हणतो. 6 तथापि इस्राएल घराण्याशी बोल, प्रभू परमेश्वर देव म्हणतो, मूर्तीपुजेपासून मागे फिरा आणि पश्चाताप करा, आपल्या अमंगळ गोष्टीपासून आपले तोंड फिरवा. 7 इस्राएलाच्या घराण्यातील प्रत्येकजण आणि इस्राएलात जे मला योग्य तेच आहे आणि ज्यांनी मूर्तीपुजेत अशा पापाचा अडखळण धोंडा आपल्या मनापासून आपल्यात वागवला. आणि माझा शोध घेण्यास भविष्यवक्तांकडे येतात, मी परमेश्वर देव आहे स्वतः त्यांना उत्तर देईन. 8 माझे मुख त्याच्या पासून लपवीन, त्यांना चिन्ह व लोकांसाठी निंदेचा विषय करीन आणि माझ्या लोकांमधून त्यांना हुसकावून देईन, तेव्हा त्यांन समजेल की मी परमेश्वर देव आहे. 9 जर कुणी संदेष्टा भुलथापांनी बोलून संदेश देईल तर समजावे की मीच परमेश्वर देव त्यास भ्रमात पाडून संदेश देण्यास भाग पाडले आहे, त्याच्या विरोधात मी माझा हात उचलीन आणि माझ्या इस्राएलातून त्यांना हुसकून देईन 10 ते त्यांच्या घोर अन्यायाचे फळ भोगतील संदेष्ट्यांचा घोर अन्याय आणि ज्यांनी प्रश्न विचारला ते दोघेही घोर अन्यायाचे फळ भोगतील. 11 यासाठी इस्राएल घराणे माझ्यापासून परागंदा होणार नाही ते आपल्या पातकामुळे स्वतःला अशुद्ध करणार नाहीत, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन, असे परमेश्वर देव म्हणतो. देवाने यरूशलेमेस केलेली शिक्षा न्याय्य 12 नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, 13 मानवाच्या मुला, एखाद्या देशाने माझ्या विरोधात पाप केले, त्यांच्या विरोधात मी माझा हात उचलेन, त्यांना अन्नाचा तुटवडा पडेल त्यांच्यावर दुष्काळ आणिन त्यांच्यातून मानव व पशू ह्यांना हुसकून देईन. 14 जरी देशात नोहा दानीएल आणि ईयोब हे तिघे असेल तरी पुरे ते त्यांच्या धार्मीकतेमुळे वाचतील असे परमेश्वर प्रभू म्हणतो. 15 जर मी देशात क्रुर हिंस्र पशू पाठविले आणि जमीन नापीक झाली क्रुर पशुमुळे कोणी मनुष्य जाणारे येणार नसल्यामुळे देश निर्जन होईल. 16 जरी त्यामध्ये ते तिघे असले तरी त्याचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही. मात्र त्याचा स्वतःचा बचाव होईल, मात्र देश ओसाड होईल असे परमेश्वर देव म्हणतो. 17 जर मी देशा विरुध्द तलवार चालवीली आणि म्हणालो, देशातील दोन्ही मनुष्य आणि पशू नष्ट करीन. 18 जरी हे तीन मनुष्य देशात असतील असे परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही, मात्र त्यांच्या जीवाचा बचाव होईल. 19 जर मी देशावर क्रोध मरी पाठवीली, त्यांचे रक्त सांडल्यामुळे मनुष्य आणि पशू हे नष्ट करीन. 20 जरी देशात नोहा, दानीएल आणि ईयोब असले प्रभू परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांच्या मुलगा मुलगी यांचा बचाव करु शकणार नाही पण ते त्यांच्या धार्मिकतेने स्वतःचा बचाव करतील. 21 कारण प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी निश्चित शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे. दुष्काळ, तलवार, जंगली पशु, मरी ही माझी चार हत्यार यरूशलेमेच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल, तेव्हा त्यांचा बचाव कसा होईल असे परमेश्वर देव म्हणतो. 22 त्यांच्यामध्ये तरी काही उरलेले राहतील, त्यांच्या मुला मुलींना मी बाहेर आणिन, पाहा ते तुम्हाकडे येतील; तुम्ही त्यांचे मार्ग आणि काम पाहाल; तेव्हा यरूशलेमेवर संकट आणल्याबद्दल त्यांना दिलासा देईन. 23 तेव्हा त्यांचे मार्ग आणि कार्य पाहून तुम्हास दिलासा मिळेल, त्यांचे मी जे काही केले ते सगळे मी निरर्थक केले नाही. हे तुम्हास कळेल असे परमेश्वर देव म्हणतो.
1. {#1संदेष्ट्याचा सल्ला घेण्याऱ्या मूर्तीपूजकांचा न्याय } इस्राएलाच्या वडीलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे आले व माझ्यापुढे बसले 2. नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला की, 3. मानवाच्या मुला, या सर्व मानवांनी मूर्तींची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली, त्यांनी आपल्या दृष्टी समोर पापाला अडखळण ठेवले आहे, अशा पापीष्ट लोकांस मी आपल्याला प्रश्न विचारु देईन? 4. याकरिता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो, त्यास माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल. 5. मी इस्राएल घराण्याला परत माघारी आणिन, कारण त्यांच्या मूर्तीपुढे त्यांनी मला अगदी परके केले आहे, असे परमेश्वर देव म्हणतो. 6. तथापि इस्राएल घराण्याशी बोल, प्रभू परमेश्वर देव म्हणतो, मूर्तीपुजेपासून मागे फिरा आणि पश्चाताप करा, आपल्या अमंगळ गोष्टीपासून आपले तोंड फिरवा. 7. इस्राएलाच्या घराण्यातील प्रत्येकजण आणि इस्राएलात जे मला योग्य तेच आहे आणि ज्यांनी मूर्तीपुजेत अशा पापाचा अडखळण धोंडा आपल्या मनापासून आपल्यात वागवला. आणि माझा शोध घेण्यास भविष्यवक्तांकडे येतात, मी परमेश्वर देव आहे स्वतः त्यांना उत्तर देईन. 8. माझे मुख त्याच्या पासून लपवीन, त्यांना चिन्ह व लोकांसाठी निंदेचा विषय करीन आणि माझ्या लोकांमधून त्यांना हुसकावून देईन, तेव्हा त्यांन समजेल की मी परमेश्वर देव आहे. 9. जर कुणी संदेष्टा भुलथापांनी बोलून संदेश देईल तर समजावे की मीच परमेश्वर देव त्यास भ्रमात पाडून संदेश देण्यास भाग पाडले आहे, त्याच्या विरोधात मी माझा हात उचलीन आणि माझ्या इस्राएलातून त्यांना हुसकून देईन 10. ते त्यांच्या घोर अन्यायाचे फळ भोगतील संदेष्ट्यांचा घोर अन्याय आणि ज्यांनी प्रश्न विचारला ते दोघेही घोर अन्यायाचे फळ भोगतील. 11. यासाठी इस्राएल घराणे माझ्यापासून परागंदा होणार नाही ते आपल्या पातकामुळे स्वतःला अशुद्ध करणार नाहीत, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन, असे परमेश्वर देव म्हणतो. 12. {#1देवाने यरूशलेमेस केलेली शिक्षा न्याय्य } नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, 13. मानवाच्या मुला, एखाद्या देशाने माझ्या विरोधात पाप केले, त्यांच्या विरोधात मी माझा हात उचलेन, त्यांना अन्नाचा तुटवडा पडेल त्यांच्यावर दुष्काळ आणिन त्यांच्यातून मानव व पशू ह्यांना हुसकून देईन. 14. जरी देशात नोहा दानीएल आणि ईयोब हे तिघे असेल तरी पुरे ते त्यांच्या धार्मीकतेमुळे वाचतील असे परमेश्वर प्रभू म्हणतो. 15. जर मी देशात क्रुर हिंस्र पशू पाठविले आणि जमीन नापीक झाली क्रुर पशुमुळे कोणी मनुष्य जाणारे येणार नसल्यामुळे देश निर्जन होईल. 16. जरी त्यामध्ये ते तिघे असले तरी त्याचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही. मात्र त्याचा स्वतःचा बचाव होईल, मात्र देश ओसाड होईल असे परमेश्वर देव म्हणतो. 17. जर मी देशा विरुध्द तलवार चालवीली आणि म्हणालो, देशातील दोन्ही मनुष्य आणि पशू नष्ट करीन. 18. जरी हे तीन मनुष्य देशात असतील असे परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही, मात्र त्यांच्या जीवाचा बचाव होईल. 19. जर मी देशावर क्रोध मरी पाठवीली, त्यांचे रक्त सांडल्यामुळे मनुष्य आणि पशू हे नष्ट करीन. 20. जरी देशात नोहा, दानीएल आणि ईयोब असले प्रभू परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांच्या मुलगा मुलगी यांचा बचाव करु शकणार नाही पण ते त्यांच्या धार्मिकतेने स्वतःचा बचाव करतील. 21. कारण प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी निश्चित शिक्षा करण्यासाठी चार प्रकारच्या त्रासदायक गोष्टी पाठवणार आहे. दुष्काळ, तलवार, जंगली पशु, मरी ही माझी चार हत्यार यरूशलेमेच्या मनुष्य आणि प्राणी यांना नष्ट करेल, तेव्हा त्यांचा बचाव कसा होईल असे परमेश्वर देव म्हणतो. 22. त्यांच्यामध्ये तरी काही उरलेले राहतील, त्यांच्या मुला मुलींना मी बाहेर आणिन, पाहा ते तुम्हाकडे येतील; तुम्ही त्यांचे मार्ग आणि काम पाहाल; तेव्हा यरूशलेमेवर संकट आणल्याबद्दल त्यांना दिलासा देईन. 23. तेव्हा त्यांचे मार्ग आणि कार्य पाहून तुम्हास दिलासा मिळेल, त्यांचे मी जे काही केले ते सगळे मी निरर्थक केले नाही. हे तुम्हास कळेल असे परमेश्वर देव म्हणतो.
  • यहेज्केल धडा 1  
  • यहेज्केल धडा 2  
  • यहेज्केल धडा 3  
  • यहेज्केल धडा 4  
  • यहेज्केल धडा 5  
  • यहेज्केल धडा 6  
  • यहेज्केल धडा 7  
  • यहेज्केल धडा 8  
  • यहेज्केल धडा 9  
  • यहेज्केल धडा 10  
  • यहेज्केल धडा 11  
  • यहेज्केल धडा 12  
  • यहेज्केल धडा 13  
  • यहेज्केल धडा 14  
  • यहेज्केल धडा 15  
  • यहेज्केल धडा 16  
  • यहेज्केल धडा 17  
  • यहेज्केल धडा 18  
  • यहेज्केल धडा 19  
  • यहेज्केल धडा 20  
  • यहेज्केल धडा 21  
  • यहेज्केल धडा 22  
  • यहेज्केल धडा 23  
  • यहेज्केल धडा 24  
  • यहेज्केल धडा 25  
  • यहेज्केल धडा 26  
  • यहेज्केल धडा 27  
  • यहेज्केल धडा 28  
  • यहेज्केल धडा 29  
  • यहेज्केल धडा 30  
  • यहेज्केल धडा 31  
  • यहेज्केल धडा 32  
  • यहेज्केल धडा 33  
  • यहेज्केल धडा 34  
  • यहेज्केल धडा 35  
  • यहेज्केल धडा 36  
  • यहेज्केल धडा 37  
  • यहेज्केल धडा 38  
  • यहेज्केल धडा 39  
  • यहेज्केल धडा 40  
  • यहेज्केल धडा 41  
  • यहेज्केल धडा 42  
  • यहेज्केल धडा 43  
  • यहेज्केल धडा 44  
  • यहेज्केल धडा 45  
  • यहेज्केल धडा 46  
  • यहेज्केल धडा 47  
  • यहेज्केल धडा 48  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References