मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यहेज्केल

यहेज्केल धडा 31

फारोचे व त्याच्या लोकांचे भवितव्य 1 बाबेलातील बंदिवासाच्या अकराव्या वर्षी, तिसऱ्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, 2 “मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो आणि त्याच्यासभोवती असलेले त्याचे सेवक, यांना सांग, तू आपल्या मोठेपणात कोणासारखा आहेस? 3 पाहा! अश्शूर लबानोनात सुंदर फांद्याचा, व दाट छायेचा व उंच उंचीचा गंधसरू असा होता. आणि त्याचा शेंडा फांद्यावर होता. 4 पुष्कळ जलांनी त्यास उंच वाढवले. खोल जलांनी त्यास खूप मोठे केले. त्याच्या प्रदेशाभोवती सर्व नद्या वाहत होत्या त्यांचे पाट शेतातील सर्व झाडास जाऊन पसरत होते. 5 म्हणून ते झाड शेतातील इतर कोणत्याही झाडांपेक्षा उंचीने मोठे होते आणि त्याच्या फांद्या बहुत झाल्या. त्यास भरपूर पाणी मिळाल्याने फार फांद्या फुटल्या, त्याच्या फांद्या लांब वाढल्या. 6 आकाशातील प्रत्येक पक्षी त्याच्या फांद्यांमध्ये आपली घरटी करीत. त्याच्या खांद्याच्या खाली सर्व वनपशू पिल्लांना जन्म देत. त्याच्या सावली खाली सर्व मोठी राष्ट्रे राहत. 7 वृक्ष फारच सुंदर होता. त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने त्याचा विस्तार मोठा झाला, त्याच्या फांद्या लांब झाल्या. 8 देवाच्या बागेतील, देवदारूने त्यास झाकून टाकिता येईना! सुरूच्या झाडामधील फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या व अर्मोन झाडे त्याच्या मुख्य फांद्याची बरोबरी करू न शकणाऱ्या होत्या. देवाच्या बागेतील कोणतेच झाड सुंदरतेत त्याच्यासारखे नव्हते. 9 मी त्यास खूप फांद्या देऊन सुंदर बनविले. आणि देवाच्या एदेन बागेतील सर्व झाडे होती ती त्यांचा द्वेष करीत. 10 यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतोः कारण त्याने आपणाला उंच केले आहे आणि तो वाढून आपल्या फांद्याच्या शेंड्याने ढगाला भिडला आहे व त्या उंचीने त्याचे हृदय उंचावले आहे. 11 म्हणून मी त्यास पकडून एका बलिष्ट राष्ट्राच्या राज्यकर्त्याच्या स्वाधीन करीन. हा राज्यकर्ता त्याच्याविरुध्द कृती करून आणि त्याच्या दुष्टतेमुळे त्यास दूर काढून टाकीन. 12 सर्व राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्यास तोडून व नंतर त्यास सोडून दिले. त्याच्या फांद्या डोंगरावर व खोऱ्यात पडल्या आहेत आणि त्याच्या मुख्य फांद्या पृथ्वीवरील सर्व प्रवाहात मोडून पडल्या आहेत. मग पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत आणि त्यास सोडले आहे. 13 त्या पडलेल्या झाडावर आकाशातील सर्व पक्षी जमतात आणि शेतातील सर्व पशू त्याच्या फांद्यावरती बसतात. 14 आता, पाण्याजवळील कोणत्याही झाडाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये. आपल्या शेंड्याने ढगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नये. कारण सर्व पाणी पिणाऱ्यानी, आपल्या उंचीने उंचावू नये. कारण त्या सर्वास मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवजात जाते तिच्यात त्यासही जावयास लाविले आहे. 15 प्रभू परमेश्वर असे म्हणतोः ज्या दिवशी जेव्हा तो मृत्युलोकांत गेला, त्यादिवशी मी पृथ्वीवर शोक आणला. मी त्याच्याकरता जलाशय झाकला आणि समुद्राचे पाणी मागे धरून ठेवले. मी महाजले रोखली आणि त्याच्यासाठी लबानोनाला शोक करायला लावले. त्याच्यासाठी शेतातील सर्व झाडे म्लान झाली. 16 गर्तेत जाणाऱ्याबरोबर मी त्यास अधोलोकी लोटून दिले तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रांस थरथर कांपविले; आणि मी तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व झाडे, पाण्याने पोसलेले निवडक व अति सुंदर असे लबानोनाचे झाडाचे समाधान झाले! म्हणून शेतातील सर्व झाडांनी त्याच्यासाठी शोक केला. 17 जी कोणी राष्ट्रे त्यांच्या छायेत राहत होती. ते त्याचे बलवान बाहू असे होते तेही त्यांच्याबरोबर तलवारीने वधले होते त्यांच्याकडे खाली अधोलोकात गेले. 18 तू वैभवाने व मोठेपणाने एदेनेमधल्या झाडांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनांतल्या झाडांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमुदाय यांची अशी गति होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
फारोचे व त्याच्या लोकांचे भवितव्य 1 बाबेलातील बंदिवासाच्या अकराव्या वर्षी, तिसऱ्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, .::. 2 “मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो आणि त्याच्यासभोवती असलेले त्याचे सेवक, यांना सांग, तू आपल्या मोठेपणात कोणासारखा आहेस? .::. 3 पाहा! अश्शूर लबानोनात सुंदर फांद्याचा, व दाट छायेचा व उंच उंचीचा गंधसरू असा होता. आणि त्याचा शेंडा फांद्यावर होता. .::. 4 पुष्कळ जलांनी त्यास उंच वाढवले. खोल जलांनी त्यास खूप मोठे केले. त्याच्या प्रदेशाभोवती सर्व नद्या वाहत होत्या त्यांचे पाट शेतातील सर्व झाडास जाऊन पसरत होते. .::. 5 म्हणून ते झाड शेतातील इतर कोणत्याही झाडांपेक्षा उंचीने मोठे होते आणि त्याच्या फांद्या बहुत झाल्या. त्यास भरपूर पाणी मिळाल्याने फार फांद्या फुटल्या, त्याच्या फांद्या लांब वाढल्या. .::. 6 आकाशातील प्रत्येक पक्षी त्याच्या फांद्यांमध्ये आपली घरटी करीत. त्याच्या खांद्याच्या खाली सर्व वनपशू पिल्लांना जन्म देत. त्याच्या सावली खाली सर्व मोठी राष्ट्रे राहत. .::. 7 वृक्ष फारच सुंदर होता. त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने त्याचा विस्तार मोठा झाला, त्याच्या फांद्या लांब झाल्या. .::. 8 देवाच्या बागेतील, देवदारूने त्यास झाकून टाकिता येईना! सुरूच्या झाडामधील फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या व अर्मोन झाडे त्याच्या मुख्य फांद्याची बरोबरी करू न शकणाऱ्या होत्या. देवाच्या बागेतील कोणतेच झाड सुंदरतेत त्याच्यासारखे नव्हते. .::. 9 मी त्यास खूप फांद्या देऊन सुंदर बनविले. आणि देवाच्या एदेन बागेतील सर्व झाडे होती ती त्यांचा द्वेष करीत. .::. 10 यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतोः कारण त्याने आपणाला उंच केले आहे आणि तो वाढून आपल्या फांद्याच्या शेंड्याने ढगाला भिडला आहे व त्या उंचीने त्याचे हृदय उंचावले आहे. .::. 11 म्हणून मी त्यास पकडून एका बलिष्ट राष्ट्राच्या राज्यकर्त्याच्या स्वाधीन करीन. हा राज्यकर्ता त्याच्याविरुध्द कृती करून आणि त्याच्या दुष्टतेमुळे त्यास दूर काढून टाकीन. .::. 12 सर्व राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्यास तोडून व नंतर त्यास सोडून दिले. त्याच्या फांद्या डोंगरावर व खोऱ्यात पडल्या आहेत आणि त्याच्या मुख्य फांद्या पृथ्वीवरील सर्व प्रवाहात मोडून पडल्या आहेत. मग पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत आणि त्यास सोडले आहे. .::. 13 त्या पडलेल्या झाडावर आकाशातील सर्व पक्षी जमतात आणि शेतातील सर्व पशू त्याच्या फांद्यावरती बसतात. .::. 14 आता, पाण्याजवळील कोणत्याही झाडाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये. आपल्या शेंड्याने ढगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नये. कारण सर्व पाणी पिणाऱ्यानी, आपल्या उंचीने उंचावू नये. कारण त्या सर्वास मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवजात जाते तिच्यात त्यासही जावयास लाविले आहे. .::. 15 प्रभू परमेश्वर असे म्हणतोः ज्या दिवशी जेव्हा तो मृत्युलोकांत गेला, त्यादिवशी मी पृथ्वीवर शोक आणला. मी त्याच्याकरता जलाशय झाकला आणि समुद्राचे पाणी मागे धरून ठेवले. मी महाजले रोखली आणि त्याच्यासाठी लबानोनाला शोक करायला लावले. त्याच्यासाठी शेतातील सर्व झाडे म्लान झाली. .::. 16 गर्तेत जाणाऱ्याबरोबर मी त्यास अधोलोकी लोटून दिले तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रांस थरथर कांपविले; आणि मी तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व झाडे, पाण्याने पोसलेले निवडक व अति सुंदर असे लबानोनाचे झाडाचे समाधान झाले! म्हणून शेतातील सर्व झाडांनी त्याच्यासाठी शोक केला. .::. 17 जी कोणी राष्ट्रे त्यांच्या छायेत राहत होती. ते त्याचे बलवान बाहू असे होते तेही त्यांच्याबरोबर तलवारीने वधले होते त्यांच्याकडे खाली अधोलोकात गेले. .::. 18 तू वैभवाने व मोठेपणाने एदेनेमधल्या झाडांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनांतल्या झाडांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमुदाय यांची अशी गति होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
  • यहेज्केल धडा 1  
  • यहेज्केल धडा 2  
  • यहेज्केल धडा 3  
  • यहेज्केल धडा 4  
  • यहेज्केल धडा 5  
  • यहेज्केल धडा 6  
  • यहेज्केल धडा 7  
  • यहेज्केल धडा 8  
  • यहेज्केल धडा 9  
  • यहेज्केल धडा 10  
  • यहेज्केल धडा 11  
  • यहेज्केल धडा 12  
  • यहेज्केल धडा 13  
  • यहेज्केल धडा 14  
  • यहेज्केल धडा 15  
  • यहेज्केल धडा 16  
  • यहेज्केल धडा 17  
  • यहेज्केल धडा 18  
  • यहेज्केल धडा 19  
  • यहेज्केल धडा 20  
  • यहेज्केल धडा 21  
  • यहेज्केल धडा 22  
  • यहेज्केल धडा 23  
  • यहेज्केल धडा 24  
  • यहेज्केल धडा 25  
  • यहेज्केल धडा 26  
  • यहेज्केल धडा 27  
  • यहेज्केल धडा 28  
  • यहेज्केल धडा 29  
  • यहेज्केल धडा 30  
  • यहेज्केल धडा 31  
  • यहेज्केल धडा 32  
  • यहेज्केल धडा 33  
  • यहेज्केल धडा 34  
  • यहेज्केल धडा 35  
  • यहेज्केल धडा 36  
  • यहेज्केल धडा 37  
  • यहेज्केल धडा 38  
  • यहेज्केल धडा 39  
  • यहेज्केल धडा 40  
  • यहेज्केल धडा 41  
  • यहेज्केल धडा 42  
  • यहेज्केल धडा 43  
  • यहेज्केल धडा 44  
  • यहेज्केल धडा 45  
  • यहेज्केल धडा 46  
  • यहेज्केल धडा 47  
  • यहेज्केल धडा 48  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References