मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
उत्पत्ति

उत्पत्ति धडा 10

1 शेम, हाम व याफेथ ह्मा नोहाच्या तीन मुलांना जलप्रलयानंतर पुष्कळ मुलगे झाले; त्यांची वंशावळ येणे प्रमाणे:याफेथाचे वंशज 2 याफेथाचे मुलगे; गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते. 3 गोमरचे मुलगे; आष्कनाझ, रीपाथ व तोगार्मा, हे होते. 4 यावानाचे मुलगे; अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम. 5 भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वत:ची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती. 6 हामचे मुलगे याप्रमाणे होते: कूश, मिस्राईम, पूट व कनान 7 कुशाचे मुलगे: सबा, हवीला, साब्ता, रामा, व साव्तका; आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते. 8 कुशाला निम्रोद नावाचा मुलगा होता, तो पृथ्वीवर महाबलवान व पराक्रमी असा वीरपुरुष होता. 9 तो परमेश्वरापुढे बलवान शिकारी झाला म्हणून इतर माणसांची निम्रोदाशी तुलना करुन “तो माणूस, परमेश्वरासमोर बलवान निम्रोद शिकाऱ्यासारखा आहे” असे म्हणण्याची प्रथा आहे. 10 शिनार प्रांतातील बाबेल, एरक, अक्काद व कालहने ही निम्रोदाच्या राज्यातील सुरवातीची शहरे होती. 11 तेथून तो अश्शुरालाही गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईरकालह व रेसन ही शहरे वसवली 12 (रेसन हे शहर, निनवे व मोठे शहर कालह यांच्या दरम्यान आहे.) 13 मिस्राईम याला लूद, अनामीन, लहाकीम, नाप्तुहीम 14 पात्रुस कास्लूह व कप्तोरी हे मुलगे झाले. कास्लूहपासून पलिष्टी लोक आले. 15 कनानाचा पहिला मुलगा सीदोन हा होता; कनान हा हेथचाही बाप होता. कनानापासून उदयास आलेली राष्ट्रे, 16 यबूसी, अमोरी, गिर्गाशी, 17 हिव्वी, आकर्ी, शीनी 18 अर्वादी, समारी व हमाथी ही होती. पुढे कनानाची कुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरली. 19 कनान्यांची सीमा उत्तरे कडील सीदोनापासून दक्षिणेकडील गरारापर्यंत व पश्चिमेकडील गाजापासून तर पूर्वेस सदोम व गमोरा पर्यंत तसेच आदमा पासून व सबोईम पासून व लेशापर्यंत पसरली होती. 20 ही सर्व हाम याची वंशजे होती; हया सर्व वंशजांना स्वत:ची भाषा व देश होते; ती सर्व वेगवेगळी राष्ट्रे झाली. 21 शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो इब्री लोकांचा मुळ पुरुष होता. 22 शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम; 23 अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश हे होते; 24 अर्पक्षदास शेलह झाला, शेलहास एबर झाला: 25 एबर यास दोन मुलगे झाले; एकाचे नाव पेलेग होते. पेलेग म्हणजे वाटणी; कारण याच्याच हयातीत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. 26 यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, 27 हदोराम, ऊजाल, दिक्ला 28 ओबाल, अबीमाएल, शबा, 29 ओफीर, हवीला व योबाब असे मुलगे झाले; हे सगळे यक्तानाचे मुलगे; 30 ते मेशापासून पूर्वेकड़ील डोंगराळ भागात राहात होते. मेशा सफारच्या देशाकडे होते. 31 हे शेमाचे वंशज होते. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे याप्रमाणे त्यांची विभागणी अशी आहे. 32 ही नोहाच्या मुलांची व त्यांच्या वंशजांची, पिढ्या व कुळाप्राणे यादी आहे; त्यांच्या राष्ट्रांप्रमाणे ती आखलेली आहे; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रे झाली.
1 शेम, हाम व याफेथ ह्मा नोहाच्या तीन मुलांना जलप्रलयानंतर पुष्कळ मुलगे झाले; त्यांची वंशावळ येणे प्रमाणे:याफेथाचे वंशज .::. 2 याफेथाचे मुलगे; गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते. .::. 3 गोमरचे मुलगे; आष्कनाझ, रीपाथ व तोगार्मा, हे होते. .::. 4 यावानाचे मुलगे; अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम. .::. 5 भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वत:ची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती. .::. 6 हामचे मुलगे याप्रमाणे होते: कूश, मिस्राईम, पूट व कनान .::. 7 कुशाचे मुलगे: सबा, हवीला, साब्ता, रामा, व साव्तका; आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते. .::. 8 कुशाला निम्रोद नावाचा मुलगा होता, तो पृथ्वीवर महाबलवान व पराक्रमी असा वीरपुरुष होता. .::. 9 तो परमेश्वरापुढे बलवान शिकारी झाला म्हणून इतर माणसांची निम्रोदाशी तुलना करुन “तो माणूस, परमेश्वरासमोर बलवान निम्रोद शिकाऱ्यासारखा आहे” असे म्हणण्याची प्रथा आहे. .::. 10 शिनार प्रांतातील बाबेल, एरक, अक्काद व कालहने ही निम्रोदाच्या राज्यातील सुरवातीची शहरे होती. .::. 11 तेथून तो अश्शुरालाही गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईरकालह व रेसन ही शहरे वसवली .::. 12 (रेसन हे शहर, निनवे व मोठे शहर कालह यांच्या दरम्यान आहे.) .::. 13 मिस्राईम याला लूद, अनामीन, लहाकीम, नाप्तुहीम .::. 14 पात्रुस कास्लूह व कप्तोरी हे मुलगे झाले. कास्लूहपासून पलिष्टी लोक आले. .::. 15 कनानाचा पहिला मुलगा सीदोन हा होता; कनान हा हेथचाही बाप होता. कनानापासून उदयास आलेली राष्ट्रे, .::. 16 यबूसी, अमोरी, गिर्गाशी, .::. 17 हिव्वी, आकर्ी, शीनी .::. 18 अर्वादी, समारी व हमाथी ही होती. पुढे कनानाची कुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरली. .::. 19 कनान्यांची सीमा उत्तरे कडील सीदोनापासून दक्षिणेकडील गरारापर्यंत व पश्चिमेकडील गाजापासून तर पूर्वेस सदोम व गमोरा पर्यंत तसेच आदमा पासून व सबोईम पासून व लेशापर्यंत पसरली होती. .::. 20 ही सर्व हाम याची वंशजे होती; हया सर्व वंशजांना स्वत:ची भाषा व देश होते; ती सर्व वेगवेगळी राष्ट्रे झाली. .::. 21 शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो इब्री लोकांचा मुळ पुरुष होता. .::. 22 शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम; .::. 23 अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश हे होते; .::. 24 अर्पक्षदास शेलह झाला, शेलहास एबर झाला: .::. 25 एबर यास दोन मुलगे झाले; एकाचे नाव पेलेग होते. पेलेग म्हणजे वाटणी; कारण याच्याच हयातीत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. .::. 26 यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, .::. 27 हदोराम, ऊजाल, दिक्ला .::. 28 ओबाल, अबीमाएल, शबा, .::. 29 ओफीर, हवीला व योबाब असे मुलगे झाले; हे सगळे यक्तानाचे मुलगे; .::. 30 ते मेशापासून पूर्वेकड़ील डोंगराळ भागात राहात होते. मेशा सफारच्या देशाकडे होते. .::. 31 हे शेमाचे वंशज होते. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे याप्रमाणे त्यांची विभागणी अशी आहे. .::. 32 ही नोहाच्या मुलांची व त्यांच्या वंशजांची, पिढ्या व कुळाप्राणे यादी आहे; त्यांच्या राष्ट्रांप्रमाणे ती आखलेली आहे; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रे झाली.
  • उत्पत्ति धडा 1  
  • उत्पत्ति धडा 2  
  • उत्पत्ति धडा 3  
  • उत्पत्ति धडा 4  
  • उत्पत्ति धडा 5  
  • उत्पत्ति धडा 6  
  • उत्पत्ति धडा 7  
  • उत्पत्ति धडा 8  
  • उत्पत्ति धडा 9  
  • उत्पत्ति धडा 10  
  • उत्पत्ति धडा 11  
  • उत्पत्ति धडा 12  
  • उत्पत्ति धडा 13  
  • उत्पत्ति धडा 14  
  • उत्पत्ति धडा 15  
  • उत्पत्ति धडा 16  
  • उत्पत्ति धडा 17  
  • उत्पत्ति धडा 18  
  • उत्पत्ति धडा 19  
  • उत्पत्ति धडा 20  
  • उत्पत्ति धडा 21  
  • उत्पत्ति धडा 22  
  • उत्पत्ति धडा 23  
  • उत्पत्ति धडा 24  
  • उत्पत्ति धडा 25  
  • उत्पत्ति धडा 26  
  • उत्पत्ति धडा 27  
  • उत्पत्ति धडा 28  
  • उत्पत्ति धडा 29  
  • उत्पत्ति धडा 30  
  • उत्पत्ति धडा 31  
  • उत्पत्ति धडा 32  
  • उत्पत्ति धडा 33  
  • उत्पत्ति धडा 34  
  • उत्पत्ति धडा 35  
  • उत्पत्ति धडा 36  
  • उत्पत्ति धडा 37  
  • उत्पत्ति धडा 38  
  • उत्पत्ति धडा 39  
  • उत्पत्ति धडा 40  
  • उत्पत्ति धडा 41  
  • उत्पत्ति धडा 42  
  • उत्पत्ति धडा 43  
  • उत्पत्ति धडा 44  
  • उत्पत्ति धडा 45  
  • उत्पत्ति धडा 46  
  • उत्पत्ति धडा 47  
  • उत्पत्ति धडा 48  
  • उत्पत्ति धडा 49  
  • उत्पत्ति धडा 50  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References