मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
उत्पत्ति

उत्पत्ति धडा 5

1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला. 2 देवाने त्यांस नर व नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला व त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले. 3 आदाम एकशेतीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले; 4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. 5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. 6 शेथ एकशेंपाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश नांवाचा मुलगा झाला. 7 अनोशच्या जन्मानंतर शेथ आठशेंसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 8 शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला. 9 अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान नावाचा मुलगा झाला; 10 केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 11 अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. 12 केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल नावाचा मुलगा झाला; 13 महललेल झाल्यावर केनान आठशेंचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 14 केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. 15 महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद नावाचा मुलगा झाला; 16 यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेंतीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 17 महललेल एकंदर आठशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. 18 यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख नावाचा मुलगा झाला; 19 हनोख झाल्यावर यारेद आठशें वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 20 यारेद एकंदर नऊशे बासष्ट वर्षे जगला; त्या नंतर तो मरण पावला. 21 हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला; 22 मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशें वर्षे देवाबरोबर चालला व त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 23 हनोख एकंदर तीनशें पासष्ट वर्षे जगला; 24 एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले. 25 मथुशलह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख नावांचा मुलगा झाला; 26 लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेंब्याऐंशी वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 27 मथुशलह एकंदर नऊशें एकुणसत्तर वर्षे जगला; त्यानांतर तो मरण पावला. 28 लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला; 29 त्याने त्याचे नाव नोहा (म्हणजे विसावा) असे ठेवले. लामेख म्हाणाला, “देवाने भूमिला शाप दिल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप काष्ट करावे लागतात; परंतु नोहा आपल्याला विसावा देईल.” 30 नोहा झाल्यावर लामेख पाचशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; 31 लामेख एकंदर सातशें सत्याहत्तर वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. 32 नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम व याफेथ नावाचे मुलगे झाले.
1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला. .::. 2 देवाने त्यांस नर व नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला व त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले. .::. 3 आदाम एकशेतीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले; .::. 4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. .::. 5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. .::. 6 शेथ एकशेंपाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश नांवाचा मुलगा झाला. .::. 7 अनोशच्या जन्मानंतर शेथ आठशेंसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; .::. 8 शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला. .::. 9 अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान नावाचा मुलगा झाला; .::. 10 केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; .::. 11 अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. .::. 12 केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल नावाचा मुलगा झाला; .::. 13 महललेल झाल्यावर केनान आठशेंचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; .::. 14 केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. .::. 15 महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद नावाचा मुलगा झाला; .::. 16 यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेंतीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; .::. 17 महललेल एकंदर आठशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. .::. 18 यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख नावाचा मुलगा झाला; .::. 19 हनोख झाल्यावर यारेद आठशें वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; .::. 20 यारेद एकंदर नऊशे बासष्ट वर्षे जगला; त्या नंतर तो मरण पावला. .::. 21 हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला; .::. 22 मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशें वर्षे देवाबरोबर चालला व त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; .::. 23 हनोख एकंदर तीनशें पासष्ट वर्षे जगला; .::. 24 एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले. .::. 25 मथुशलह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख नावांचा मुलगा झाला; .::. 26 लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेंब्याऐंशी वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; .::. 27 मथुशलह एकंदर नऊशें एकुणसत्तर वर्षे जगला; त्यानांतर तो मरण पावला. .::. 28 लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला; .::. 29 त्याने त्याचे नाव नोहा (म्हणजे विसावा) असे ठेवले. लामेख म्हाणाला, “देवाने भूमिला शाप दिल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप काष्ट करावे लागतात; परंतु नोहा आपल्याला विसावा देईल.” .::. 30 नोहा झाल्यावर लामेख पाचशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या; .::. 31 लामेख एकंदर सातशें सत्याहत्तर वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. .::. 32 नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम व याफेथ नावाचे मुलगे झाले.
  • उत्पत्ति धडा 1  
  • उत्पत्ति धडा 2  
  • उत्पत्ति धडा 3  
  • उत्पत्ति धडा 4  
  • उत्पत्ति धडा 5  
  • उत्पत्ति धडा 6  
  • उत्पत्ति धडा 7  
  • उत्पत्ति धडा 8  
  • उत्पत्ति धडा 9  
  • उत्पत्ति धडा 10  
  • उत्पत्ति धडा 11  
  • उत्पत्ति धडा 12  
  • उत्पत्ति धडा 13  
  • उत्पत्ति धडा 14  
  • उत्पत्ति धडा 15  
  • उत्पत्ति धडा 16  
  • उत्पत्ति धडा 17  
  • उत्पत्ति धडा 18  
  • उत्पत्ति धडा 19  
  • उत्पत्ति धडा 20  
  • उत्पत्ति धडा 21  
  • उत्पत्ति धडा 22  
  • उत्पत्ति धडा 23  
  • उत्पत्ति धडा 24  
  • उत्पत्ति धडा 25  
  • उत्पत्ति धडा 26  
  • उत्पत्ति धडा 27  
  • उत्पत्ति धडा 28  
  • उत्पत्ति धडा 29  
  • उत्पत्ति धडा 30  
  • उत्पत्ति धडा 31  
  • उत्पत्ति धडा 32  
  • उत्पत्ति धडा 33  
  • उत्पत्ति धडा 34  
  • उत्पत्ति धडा 35  
  • उत्पत्ति धडा 36  
  • उत्पत्ति धडा 37  
  • उत्पत्ति धडा 38  
  • उत्पत्ति धडा 39  
  • उत्पत्ति धडा 40  
  • उत्पत्ति धडा 41  
  • उत्पत्ति धडा 42  
  • उत्पत्ति धडा 43  
  • उत्पत्ति धडा 44  
  • उत्पत्ति धडा 45  
  • उत्पत्ति धडा 46  
  • उत्पत्ति धडा 47  
  • उत्पत्ति धडा 48  
  • उत्पत्ति धडा 49  
  • उत्पत्ति धडा 50  
×

Alert

×

Marathi Letters Keypad References