1. {#1दिमिष्काविषयी देववाणी }
2. [PS]दिमिष्काविषयीची घोषणा. [PE][PS]पाहा, दिमिष्क हे एक नगर म्हणून राहणार नाही; ते नासाडीचा ढीग होईल. [PE][QS]अरोएराची नगरे पूर्ण सोडून जातील. [QE][QS]ती कळपासाठी पहुडण्याची जागा होईल आणि त्यांना कोणी घाबरवणार नाही. [QE]
3. [QS]एफ्राइमापासून तटबंदीची नगरे नाहीशी होतील. दिमिष्कापासून त्याचे राज्य [QE][QS]आणि अरामाचा अवशेष ही नाहीसे होतील, ही इस्राएल लोकांच्या गौरवासारखी होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. [QE]
4. {#1इस्राएलाचा न्याय } [QS]त्या दिवसात असे होईल की, [QE][QS]याकोबाचे वैभव विरळ होईल आणि त्याचा पुष्ट देह सडपातळ होईल. [QE]
5. [QS]जेव्हा जसे कापणी करणारा उभे धान्य गोळा करताना आणि त्याच्या हाताने कणसे कापतो तसे होईल. [QE][QS]जसे रेफाईमांच्या खोऱ्यात कोणी कणसे टिपतो तसे होईल. [QE]
6. [QS]जसे जेव्हा जैतून झाड हलविले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, [QE][QS]दोन किंवा तीन फळे सर्वाहून उंच शेंड्यावर राहतात, चार किंवा पाच त्याच्या उंचावरच्या फलदायी फांद्यावर राहतात, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो. [QE]
7. [MS] त्या दिवशी लोक आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहतील आणि त्यांचे डोळे इस्राएलाच्या एका पवित्र प्रभूकडे लागतील. [ME]
8.
9. [PS]आपल्या हातांच्या कामाकडे, ते वेद्यांकडे पाहणार नाहीत किंवा आपल्या बोटांनी केलेल्या अशेरा स्तंभ आणि सूर्यमूर्ती याकडे ते पाहणार नाहीत. [PE][QS]त्या दिवसात त्यांची बळकट नगरे डोंगराच्या माथ्यावरील वनराईच्या उतारावर सोडलेल्या ठिकाणांसारखी, [QE][QS]जी ठिकाणे इस्राएल लोकांच्यामुळे त्यांनी सोडली होती त्यासारखी होतील, आणि तेथे ती ओस पडतील. [QE]
10. [QS]कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास आणि आपल्या सामर्थ्याच्या खडकाकडे दुर्लक्ष केले. [QE][QS]यामुळे तू रम्य रोपे लावली आणि निसटून अपरीचीत प्रवासास निघाला. [QE]
11. [QS]त्या दिवशी तू लाविले आणि कुंपण घातले व मशागत केली. लवकरच तुझे बीज वाढले, [QE][QS]परंतु त्याचा हंगाम दुःखाच्या व भारी शोकाच्या दिवशी अयशस्वी होईल. [QE]
12. [QS]समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करणारा पुष्कळ लोकांचा समुदाय [QE][QS]आणि महापुराच्या जलांच्या गोंगाटासारखी गोंगाट करणारी राष्ट्रांची गर्दी यांना हायहाय! [QE]
13. [QS]राष्ट्रे महापुराच्या बहुत जलांच्या गोंगाटाप्रमाणे गोंगाट करतील, [QE][QS]परंतु देव त्यांना धमकावील तेव्हा ते दूर पळतील [QE][QS]आणि वाऱ्यापुढे डोंगरावरच्या भुसासारखे व वादळापुढे धुळीसारखा त्यांचा पाठलाग होईल. [QE]
14. [QS]तेव्हा पाहा, संध्याकाळी दहशत! आणि पहाटेपूर्वी ती नाहीशी होते; [QE][QS]जे आम्हांला लुटतात त्यांचा हा वाटा आहे, आणि जे आम्हास लुबाडतात त्यांचा हिस्सा हाच आहे. [QE]